नवीन लेखन...
संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

कमल हासन

आज ७ नोव्हेंबर..आज तमिळ, हिंदी अभिनेता, पटकथालेखक व दिग्दर्शक कमल हासन यांचा वाढदिवस. जन्म:- ७ नोव्हेंबर १९५४ कमल हासन यांनी हिंदी, तामिळ, तेलुगु, मल्याळम आणि कन्नड या भाषांतील अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले आहे. १९६० मध्ये त्यांना कलथुर कन्नामा या चित्रपटातील भूमिकेसाठी पहिला राष्ट्रीय बालकलाकार पुरस्कार मिळाला. या चित्रपटातील भूमिकेसाठी वयाच्या चौथ्या वर्षी त्यांचा राष्ट्रपतींकडून सन्मान […]

भाऊबीज

कार्तिक शुद्ध द्वितीयेस भाऊबीज हा सण साजरा केला जातो. या दिवशी यम आपली बहीण यमुना हिच्या घरी जेवायला गेला म्हणून या दिवसाला ‘यमद्वितीया’ असे नाव मिळाले असे मानले जाते. हा दिवस म्हणजे शरद ऋतूतील कार्तिक मासातील द्वितीया. द्वितीयेचा चंद्र आकर्षक व वर्धमानता दाखवणारा आहे. तेव्हा बिजेच्या कोरीप्रमाणे बंधुप्रेमाचे वर्धन होत राहो’, ही त्यामागची भूमिका आहे. आपल्या […]

संजीव कुमार

आज ६ नोव्हेंबर.. आज हिंदी चित्रसृष्टीतील सशक्त अभिनेता म्हणून ज्यांना ओळखलेजाते अशा संजीव कुमार यांची पुण्यतिथी जन्म: ९ जुलै १९३८ संजीव कुमार या टोपणनावाने प्रसिद्ध असलेले श्री हरिहर जरीवाला या प्रतिभासंपन्न आणि सृजनशील अभिनेत्याने हिंदी सिनेमातील नायकाच्या पारंपरिक चौकटीला छेद देत स्वतःची वेगळी शैली चित्रसृष्टीत रूढ केली. सुमारे २५ वर्षांच्या चित्रपट कारकीर्दीत त्यांनी १५० पेक्षाही जास्त चित्रपटांमध्ये […]

भालबा केळकर

आज ६ नोव्हेंबर.. आज प्राध्यापक भालचंद्र वामन केळकर ऊर्फ मा.भालबा केळकर यांची पुण्यतिथी भालबा केळकर यांचा जन्म २३ सप्टेंबर १९२० रोजी झाला. हे मराठी लेखक, नाट्यअभिनेते व रसायनशास्त्राचे प्राध्यापक होते. त्यांनी प्रोग्रेसिव्ह ड्रॅमॅटिक असोसिएशन ही नाट्यसंस्था स्थापली. ते पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात रसायनशास्त्राचे अध्यापन केले. भालबा केळकरांनी बालनाट्येआणि नभोनाट्ये लिहिली. त्यांच्या बालनाट्यांमध्ये शास्त्रीय विषय रंजकतेने मांडलेले असत. १९६१ साली प्रोग्रेसिव्ह ड्रॅमॅटिक असोसिएशन […]

दिनकर द. पाटील

आज ६ नोव्हेंबर..आज चित्रपट दिग्दर्शक, पटकथा व संवाद लेखक मा.दिनकर द. पाटील यांची जयंती. दिनकर द. पाटील यांचा जन्म ६ नोव्हेंबर १९१५ रोजी झाला. ‘राम राम पाव्हणं’ या चित्रपटापासून मा.दिनकर द. पाटील यांनी चित्रनिर्मितीत पाऊल टाकले. त्यांच्या ‘उदय कला चित्र’ व ‘दिनकर चित्र’ तर्फे नंतर त्यांनी ‘पाटलाचा पोर’, ‘तारका’, ‘मूठभर चणे’, ‘कुलदैवत’, ‘भैरवी’ अशा अनेक चित्रपटांची निर्मिती केली. दिनकर पाटलांनी आपल्या पन्नास वर्षांच्या […]

“गंधर्व भूषण” जयराम शिलेदार

आज ६ नोव्हेंबर..आज “गंधर्व भूषण” जयराम शिलेदार यांची पुण्यतिथी. जयराम शिलेदार यांचा जन्म ६ डिसेंबर १९१६ रोजी झाला. जयराम शिलेदार म्हणजे संगीतनाट्य इतिहासातील सोनेरी पान. चित्रपट आणि नाटक या दोन्ही क्षेत्रांत सारखीच चमकदार कामगिरी करणाऱ्या थोड्या कलावंतांमध्ये “गंधर्वभूषण‘ जयराम शिलेदार यांचे नाव आजही मोठ्या आदराने घेतले जाते.  घरचा सराफीचा व्यवसाय चांगला चालत होता. आजोबांच्या हातून घडलेल्या तोडे, बाजूबंद, पैंजणादी अलंकारांना […]

मराठी रंगभुमी दिवस

आज ५ नोव्हेंबर.. आज मराठी रंगभुमी दिवस १८४३ साली विष्णुदास भावे यांनी ‘संगीत सीतास्वयंवर ‘ नाटकाचा प्रयोग सदर करून मराठी रंगभूमीची प्राणप्रतिष्ठा केली. १५० हून अधिक वर्षांची समृद्ध परंपरा लाभलेल्या मराठी रंगभूमीवर अनेक प्रयोग केले गेले ,आणि आजही अनेक नवे प्रयोग सातत्याने होत आहेत मा.विष्णूदास भावे यांनी ’सीता स्वयंवर’ हे मराठीतील पहिले नाटक रंगमंचावर आणुन मराठी रंगभूमीची […]

भूपेन हजारिका

आज ५ नोव्हेंबर..आज आसामी संगीताचे पितामह भूपेन हजारिका यांची पुण्यतिथी. भूपेन हजारिका यांचा जन्म ८ सप्टेंबर १९२६ रोजी झाला. मा. हजारिका यांचा सदिया येथे एका शिक्षकाच्या कुटुंबात त्यांचा जन्म झाला. शिक्षणात उत्तम गती असलेल्या हजारिका यांनी बनारस हिंदू विद्यापीठातून बी.ए. व एम. ए. केले. अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठातून त्यांनी मास कम्युनिकेशन विषयातील पीएचडी केली. शिकागो विद्यापीठाची त्यांना लिस्ले फेलोशीप मिळाली होती. […]

बॉलीवुडचा आयर्न मॅन, अभिनेता मिलिंद सोमण

मिलिंद सोमण यांचा जन्म ४ नोव्हेंबर १९६५ रोजी स्कॉटलंडमध्ये झाला. तो पहिली सात वर्षे इंग्लंडमध्ये राहिला. नंतर त्याचे कुटुंब भारतात स्थलांतरित झाले. मिलिंदला कारकीर्दीच्या सुरूवातीला जलतरणपटू व्हायचे होते. त्याने विद्युत अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले आहे. व्यायामाने कमावलेली पिळदार शरीरयष्टी लाभलेल्या मिलींदला ठाकरसी फॅब्रिक्सची पहिली जाहिरात मॉडेल म्हणून मिळाली आणि त्याचे आयुष्यच बदलून गेले. गायिका अलिशा चिनॉय हिच्या मेड इन इंडिया या संगीत व्हिडीओत केलेल्या […]

अप्पासाहेब पटवर्धन

कोकणचे गांधी’ म्हणून प्रसिद्ध असलेेल अप्पासाहेब पटवर्धन यांचा जन्म ४ नोव्हेंबर १८९४ रोजी झाला. अप्पासाहेब हे देशभरात मुख्यत: रचनात्मक कामाबद्दल ओळखले जातात. त्यांनी ‘कुणबी सेवा संघ’ काढला. ते ‘चरखा संघा’चे तर अध्यक्षच झाले होते. त्यांनी रत्नागिरीत सूतकताई व ग्रामोद्योग प्रसाराचे बहुमोल काम केले. त्यांनीच जिल्ह्यात काँग्रेसची मुहूर्तमेढ रोवली. ते जिल्हा काँग्रसचे अध्यक्षही होते. ते स्वातंत्र्य चळवळीत सुमारे साडेतीन वर्षें तुरुंगात होते. त्यांनी त्यांना […]

1 410 411 412 413 414 424
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..