लोककला व लोकसंस्कृती या विषयांवर लिहिणार्याी नावाजलेल्या मराठी लेखिका डॉ.सरोजिनी कृष्णराव बाबर
डॉ.सरोजिनी कृष्णराव बाबर यांनी मुंबई विद्यापीठातून बी.ए. पदवी मिळवली. पुढे त्यांनी एम.ए. व पीएच्.डी. पदव्याही मिळवल्या. “Contribuiton of Women writers in Marathi Literature” या प्रबंधावर त्यांनी पीएच्.डी. ही पदवी संपादन केली. त्यांचा जन्म ७ जानेवारी १९२० रोजी झाला. स्वातंत्र्यपूर्व काळात स्वातंत्र्य चळवळीत त्यांनी भाग घेतला होता. महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीचा प्रगाढ अभ्यास त्यांनी त्यांच्या आयुष्यभर केला. सरोजिनी बाबर […]
