नवीन लेखन...
संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

सामाजिक नेत्या, लेखीका, संपादक विद्या बाळ

विद्या बाळ या स्त्रियांचं आत्मभान जागृत करण्याचं आणि समाजाला स्त्रियांसंदर्भात सजग आणि संवेदनशील बनवण्याचं कार्य करण्यात अग्रेसर असणाऱ्या प्रमुख सामाजिक नेत्या आहेत. त्यांचा जन्म १२ जानेवारी १९३७ रोजी झाला. ‘स्त्री’ व ‘मिळून साऱ्याजणी’ या मासिकांमधून सातत्याने लेख लिहून त्यांनी स्त्रियांमध्ये स्वत्वाची भावना चेतवली आहे. स्त्र‌ियांना समृद्ध जीवन जगता यावे, यासाठी पुरुषभान येण्याची आवश्यकता आहे,’ असे आग्रही प्रतिपादन करतानाच ते प्रत्यक्षात […]

गायक महेश काळे

शास्त्रीय संगीताच्या रसिकांसाठी महेश काळे हे सुपरिचित नाव. त्यांचा जन्म १२ जानेवारी १९७६ रोजी झाला. ‘कटय़ार काळजात घुसली’ या चित्रपटातील गाण्यांमुळं हे नाव सर्वदूर पोहोचलं. विशेषत: तरुणाईच्या गळ्यातला ताईत म्हणून ओळखलं जाऊ लागलं. महेशचा गेल्या एक तपाचा हा प्रवास, हो तपच! तपश्चर्या, साधना या खेरीज दुसरा कुठलाही शब्द योजता येणार नाही अशी मेहनत करूनच महेशने हे यश मिळवलं आहे. […]

आंतरराष्ट्रीय किर्ती प्राप्त केलेले चित्रपट व रंगमंच कलाकार अमरीश पुरी

मोगॅम्बो खूश हुआ’…’त्या’ भारदस्त आवाजातील हे तीन शब्द कानांवर पडले की समोरच्याचा थरकाप झालाच म्हणून समजा. त्यांचा जन्म २२ जून १९३२ रोजी झाला. ‘मि. इंडिया’ या सिनेमात मा.अमरिश पुरी यांनी साकारलेली मोगॅम्बोची व्यक्तिरेखा विसरणे केवळ अशक्य. अशा एकापेक्षा एक सरस खलनायकी व्यक्तिरेखा, चरित्र भूमिका साकारणारे मा.अमरीश पुरी हे जुन्या काळातले प्रसिद्ध हिंदी चित्रपट कलाकार मा.मदन पुरी यांचे धाकटे भाऊ. […]

बॉलिवूड निर्माता, दिग्दर्शक, लेखक,ओ.पी. रल्हन

ओ पी रल्हन यांनी १९६० ते १९८० मध्ये त्यांनी अनेक हिट चित्रपट दिले. त्याच्या चित्रपटात अनेक नवीन कलाकारांना स्थान दिले. त्यांनी फूल और पत्थर धर्मेंद्रला त्याच्या पहिल्या चित्रपट स्टार केले. काही लोक देव आनंद ने झीनत अमानला हरे रामा हरे कृष्णा या चित्रपटातून आणले असा गैरसमज आहे पण झीनत अमान ओ पी रल्हन यांनी प्रथम त्याच्या […]

अष्टपैलू संगीतकार सी. रामचंद्र

सी. रामचंद्र यांचे पूर्ण नाव रामचंद्र चितळीकर, ‘सी. रामचंद्र’ हे नाव त्यांनी सिने दिग्दर्शक जयंत देसाई ह्यांच्या सूचनेवरुन धारण केले. त्यांचा जन्म १२ जानेवारी १९१८ रोजी झाला. आपल्या निकटवर्तीय व आप्तेइष्टांमध्ये ते ‘अण्णा’ या नावाने प्रसिद्घ होते. त्यांचे वडील रेल्वेत नोकरीस होते. त्यामुळे त्यांच्या वडिलांची ठिकठिकाणी बदली होत.त्यांचे बालपण डोंगरगड, नागपूर, विलासपूर, गोंदिया अशा निरनिराळ्या ठिकाणी गेले. […]

प्रतिभावंत गायक शिवपुत्र सिद्धरामय्या कोमकली उर्फ कुमार गंधर्व

कुमार गंधर्व नावाची ही जादूच अशी आगळीवेगळी होती. त्यांचे मूळ नाव शिवपुत्र सिद्धरामय्या कोमकली. त्यांचा जन्म ८ एप्रिल १९२४ साली बेळगावजवळच्या सुळेभावी खेड्यात कानडी कुटुंबात झाला. लहान वयातच त्यांनी आपल्या गायकीची चमक दाखवली. आपल्या आगळ्यावेगळ्या शैलीने त्यांनी रसिकांवर अक्षरशः गारुड केले. घराणेशाहीच्या चौकटीत बंदिस्त व्हायला त्यांनी साफ नकार दिला. त्याऐवजी आपली स्वतःची गानशैली जनमानसात रुढ केली. ‘कुमार गंधर्व’ […]

जेष्ठ रंगकर्मी गोपीनाथ सावकार

गोपीनाथ सावकार यांनी संगीत रंगभूमीच्या पडत्या काळात मराठी रंगभूमीवर सातत्याने संगीत नाटकं सादर केली. त्यांचा जन्म १२ जानेवारी १९१० रोजी झाला. ‘भावबंधन’, ‘शाकुंतल’, ‘सुवर्णतुला’, ‘ययाती देवयानी’ अशा अनेक संगीत नाटकांचे दजेर्दार प्रयोग सादर करून त्यांनी संगीत नाटकाचा प्रेक्षक टिकवून ठेवायचा जवळ जवळ एकहाती प्रयत्न केला. ‘संगीत ययाती आणि देवयानी’ हे नाटक गोपीनाथ सावकार यांनी त्यांच्या ‘कलामंदिर’ या नाटय़संस्थेतर्फे २० […]

लेखिका, दिग्दर्शिका सुमित्रा भावे

सुमित्रा भावे या माहेरच्या सुमित्रा उमराणी. सुमित्रा भावे या मुळच्या पुण्याच्या. त्यांचा जन्म १२ जानेवारी १९४३ रोजी पुणे येथे झाला. आगरकर हायस्कुलमधुन त्यांनी माध्यमिक शिक्षण तर फर्ग्युसन महाविद्यालयातुन त्यांनी कला शाखेची पदवी घेतल्यानंतर मुंबईच्या टाटा समाजविज्ञान संस्थेतुन समाजकार्याचे पदव्युत्तर शिक्षण घेतले. कविता लेखन, रांगोळी, चित्रकला असे छंद जोपासत त्यांनी विद्यार्थी दशेत गुरु रोहिणी भाटे यांच्याकडे नृत्याचे शिक्षण […]

बासरी वादक, लेखक पंडीत अरविंद रामचंद्र गजेंद्रगडकर

तरुणपणी वाद्यसंगीताकडे आकृष्ट झालेल्या गजेंदगडकर यांनी प्रख्यात बासरीवादक पन्नालाल घोष आणि मुरलीधर शास्त्री यांच्याकडे बासरीवादनाचे शास्त्रोक्त शिक्षण घेतले होते. त्यांचा जन्म ११ जानेवारी १९२८ रोजी नाशिक येथे झाला. बासरीवादनाच्या पलिकडे संगीतकार आणि संगीत समीक्षक अशीही गजेंदगडकर यांची ओळख होती. स्वरमंडल या वाद्याचे वादन करणारे ते एकमेव कलाकार होते. सारंगी आणि व्हायोलिन वगळता सर्व प्रकारची वाद्ये वाजवण्यात त्यांचा हातखंडा होता. ऑल […]

आर.डी. बर्मन यांचे रिदम ऍरेंजर मारुतीराव कीर

मारुतीराव कीर यांनी आपले करियर तबला वादक म्हणून सुरू केले. त्यांचे गुरु होते भानुदास मानकामे, भैरव प्रसाद, सुंदर प्रसाद आणि उस्ताद गेमखान साहब होते. मारुती राव कीर यांनी शंकर जयकिशन यांच्या व्यतिरिक्त जवळजवळ सर्व संगीत दिग्दर्शकांच्या बरोबर काम केले. जवळजवळ सर्व जुन्या मराठी चित्रपटांमधून आणि नॉन-फिल्मच्या गाण्यांमध्ये मारुती राव कीर यांनी तबला वाजवला आहे. मारुती राव […]

1 261 262 263 264 265 424
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..