बासरी वादक, लेखक पंडीत अरविंद रामचंद्र गजेंद्रगडकर

तरुणपणी वाद्यसंगीताकडे आकृष्ट झालेल्या गजेंदगडकर यांनी प्रख्यात बासरीवादक पन्नालाल घोष आणि मुरलीधर शास्त्री यांच्याकडे बासरीवादनाचे शास्त्रोक्त शिक्षण घेतले होते. त्यांचा जन्म ११ जानेवारी १९२८ रोजी नाशिक येथे झाला. बासरीवादनाच्या पलिकडे संगीतकार आणि संगीत समीक्षक अशीही गजेंदगडकर यांची ओळख होती. स्वरमंडल या वाद्याचे वादन करणारे ते एकमेव कलाकार होते. सारंगी आणि व्हायोलिन वगळता सर्व प्रकारची वाद्ये वाजवण्यात त्यांचा हातखंडा होता.

ऑल इंडिया रेडिओमध्ये प्रोड्यूसर म्हणून काम करताना गजेंदगडकर यांना गंगूबाई हनगल, कुमार गंधर्व, मल्लिकार्जुन मन्सूर यांच्यासारख्या अनेक श्रेष्ठ गायकांचा सहवास लाभला. कल्पकता आणि सतत नव्याचा ध्यास घेतलेल्या गजेंदगडकर यांनी ७५व्या वाढदिवशी बासरीवर ७७ राग वाजवण्याचा कार्यक्रम दोन सत्रांत सादर केला होता. वादन आणि सादरीकरण यापुरतीच कला मर्यादित राहू नये असा त्यांचा आग्रह होता. नव्या पिढीचे कलाकार आणि वादक घडवण्यासाठी त्यांनी नेहमीच धडपड केली.

अरविंद गजेंद्रगडकर हे बासरीवादना बरोबरच लेखन करत असत आणि त्यांनी प्रामुख्याने संगीतविषयक लेखन केलं आहे. अरविंद गजेंद्रगडकर हे एक जोतिषीही होते. असे सूर! अशी माणसं!, सूरसावल्या, स्वरसंगम, स्वरांची स्मरणयात्रा, स्वरांच्या बनात, आलाप विशारद, The Indian Flute, तबला विशारद, ५० राग – आलाप, गती, बासरी वादन, वाद्यवादनाचे संपूर्ण गाइड, संगीतशास्त्राचे गाइड, हार्मोनियम गाइड आणि मोरू परतुनी आला ही कादंबरी अशी त्यांची पुस्तकं प्रसिद्ध आहेत. पत्रकार निखिल गजेंदगडकर हे त्यांचे चिरंजीव.

पं.अरविंद गजेंद्रगडकर यांचे ३० मे २०१० रोजी निधन झाले.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेटसंजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 1749 लेख
श्री संजीव वेलणकर हे पुणे येथील कॅटरिंग व्यावसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती या विषयांवर ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

महाराष्ट्राची आयटी अनुकूल शहरे

भारतीय माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील व्यावसायिक संघटना नेस्कॉमच्या (नॅशनल असोसिएशन ऑफ ...

श्रध्दास्थान मुक्तागिरी

विदर्भातील अमरावती जिल्हयात मुक्तागिरी हे निसर्गरम्य तसेच जैनधर्मीयांचे महत्त्वाचे धार्मिक ...

करवीरनगरी अर्थात कोल्हापूर

करवीरनगरी अर्थात कोल्हापूर जिल्ह्यास ऐतिहासिक, सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक वारसा लाभलेला ...

अंबेजोगाई

अंबेजोगाई बीड जिल्ह्यातील एक शहर आहे. १३व्या शतकात स्वामी मुकुंदराज ...

Loading…