नवीन लेखन...
संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

आशा भोसले यांच्याशी संबंधित २५ रंजक गोष्टी

1) ‘मेलडी क्वीन’ अर्थात आशा भोसले यांनी 1943 मध्ये कारकीर्दीची सुरुवात केली आणि तेव्हापासून आजपर्यंत त्यांचं गायन सुरुच आहे. 2) 1948 रोजी प्रदर्शित झालेल्या ‘चुनरिया’ या सिनेमातून त्यांनी हिंदी सिनेमांमध्ये गायला सुरुवात केली. संगीतकार हंसराज बहल यांनी ‘सावन आया’ गाण्यासाठी आशाबाईंना संधी दिली होती. 3) आशा भोसले यांनी आतापर्यंत एक हजारांहून अधिक गाणी गायली आहेत. 4) […]

कविवर्य वामन रामराव कांत म्हणजेच वा. रा. कांत

बगळ्यांची माळ फुले अजुनि अंबरात असे सर्वांच्या ओठी असलेले गीत लिहिणारे कविवर्य वामन रामराव कांत म्हणजेच वा. रा. कांत यांची पुण्यतिथी ८ सप्टेंबर रोजी झाली. आशयगर्भ आणि भावतरल कविता लिहिणा‍ऱ्या कविवर्य कांतांनी दोन पारतंत्र्यं पाहिली ती म्हणजे एक इंग्रजांचं व दुसरं कांत कुटुंब जिथं रहात होतं, त्या मराठवाडा भूमीवरचं निजामांचं जुलमी पारतंत्र्य. जिथं मराठी भाषा बोलण्यासही बंदी होती. अशा परिस्थितीतही कांतांचं […]

गौरीचे आगमन

भाद्रपद महिन्यात शुक्ल पक्षाच्या चतुर्थीला महाराष्ट्रात व देशातही गणपतीची स्थापना होते. प्रत्येक घरात प्रथेप्रमाणे गणपतीची प्राणप्रतिष्ठापणा केली जाते दहा दिवसांनंतर विसर्जन होते. चतुर्थीनंतर गणेशाची माता पार्वती-म्हणजेच गौरी चे त्यापाठोपाठ आगमन होत आहे. पश्चिम महाराष्ट्रात गौरी-गणपती, तर मराठवाड्यात महालक्ष्मी असे म्हणतात. महालक्ष्मीचा हा सण तीन दिवस असतो व तो घरोघर साजरा केला जातो. खडय़ाची, कलशाची, मुखवटय़ाची अशा […]

पहिल्या भारतीय महिला शास्त्रज्ञ डॉ. कमलाबाई सोहोनी

भारताच्या पहिल्या महिला शास्त्रज्ञ डॉक्टर मा.कमलाबाई सोहोनी (जैवरसायनशास्त्रज्ञ व आहारशास्त्रातील तज्ज्ञ) यांची आज पुण्यतिथी त्यांचा जन्म १८ जुलै १९११ रोजी झाला. दुर्गाबाई भागवत आणि कमलाबाई सोहोनी. दोघी सख्या बहिणी. मोठया दुर्गाबाईने साहित्यविश्व व्यापले तर धाकटया कमळाबाईने अवघे विज्ञानविश्व आपलेसे केले. या दोघी बहिणी अहमदनगरला आत्या सीताबाई भागवत यांच्याबरोबर राहून शिकत असताना, पंचक्रोशीतल्या मुली खेळायला त्यांना हाक मारीत ती ‘दुर्गाकमळा’ या जोडनावाने. […]

ऋषीपंचमी

गणेश चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे भाद्रपद शुध्द पंचमीस स्त्रिया हे व्रत करतात . आपल्या श्रेष्ठ ऋषीच्या सत्विकतेला , त्यांच्या अंगी असलेल्या उदात्त गुणांना विनम्रतेने अभिवादन करून त्यांचे पूजन करण्याचे हे व्रत आहे . त्यामुळे समाजातील सर्व घटकांनी हे व्रत अंगीकारून वैदिक , तत्वज्ञान , वैदिक धर्म आणि वैदिक संस्कृती ज्यांनी निर्माण केली त्या ज्ञान निष्ठांना , […]

आज ५ सप्टेंबर – शिक्षक दिन

`गुरु ब्रह्मा, गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः। गुरुः साक्षात परब्रह्म तस्मैः श्री गुरुवेः नमः।` आज डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस… हाच दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. डॉ. राधाकृष्णन हे भारताचे दुसरे राष्ट्रपती होते व प्रथम ते शिक्षक होते. ते ‘नीतिशास्त्र’ या विषयाचे प्राध्यापक होते. शिक्षक हा समाजाचा निर्माण कर्ता आहे. छोट्या बालकाचे देशाचा उत्कृष्ट नागरिक म्हणून […]

⁠⁠⁠गणपतीसाठी मोदक प्रिय म्हणूनच नैवद्याला मोदक करतात का?

उत्तर. नाही…  यामागे फक्त गणेशाला प्रिय एवढेच त्याचे महत्त्व नाही. भाद्रपद महिना हा वास्तविक पावसाळ्याचा जोर संपत येत शरद ऋतूतील ऊष्म्याकडे घेऊन जाणारा काळ. लवकरच अश्विन महिन्यातील शारदीय नवरात्र येईल आणि त्याच बरोबर शरदाचे कडक ऊन ज्याला सर्वसामान्य भाषेत ‘अॉक्टोबर हीट’ असे म्हणतात तो काळ सुरू होईल. किंबहुना यंदा पाऊस कमी झाल्याने ऊन्हाचा जोर वाढलेला आत्ताच […]

मावा मोदक

साहित्य : पाव किलो मावा, ८५ ग्रॅम बारीक साखर, १ चमचा वेलची पूड ,केशर अगर केशरी रंग. मोदकात भरण्यासाठी काजू, बदाम, पिस्ता पूड अगर बेदाणे हे सारे आपल्या आवडीवर आहे. कृती : मावा मिळून घेवून त्यात साखर मिसळावी .कल्हई केलेले पितळेचे पातेले घेवून त्यात मावा घालून मंद गस वर ढवळत राहावे.मधून मधून गोळी होत आली का […]

पांढरे शुभ्र रव्याचे मोदक

साहित्य : २ वाटी ओल्या नारळाचं खोबरं, २ वाटी साखर, १ चमचा वेलदोडे पुड, ४-५ कुसकरलेले पेढे, २-३ केळी, ६ वाट्या रवा, ७ वाट्या पाणी, १ चमचा डालडा, अर्धा चमचा मीठ. कृती : ओल्या नारळाचं खोबरं, साखर वेलदोडे पुड, पेढे आणि केळी यांचं सारण बनवून घ्यावं. एका भांड्यात पाणी गरम करून त्यात मीठ आणि डालडा टाकावा. […]

आजचा विषय मोदक….

मोदक म्हटलं की लगेच आठवते ते तांदुळाच्या पिठाच्या गरम उकडीचे, मऊसूत, चाफेकळी नाकाच्या, सुबक पाकळ्यांच्या, भरपूर गूळ-खोबरे-वेलचीयुक्त सारणाच्या मोदकांचा – साजूक तुपाच्या धारेबरोबर – शब्द-स्पर्श-रूप-रस-गंध असा सर्वांगांनी आस्वाद असलेला हे उकडीचे मोदक जे गणपती आल्यावर पहिल्या जेवणात नैवेद्ध म्हणून असतातच. प्रत्येक घरात गृहिणीनी बनवलेले मोदक, याची एक वेगळीच चव असते. काही जणी तर साचा न वापरता […]

1 229 230 231 232
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..