नवीन लेखन...
संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

बोलपटाच्या सुरवातीची काही वर्षं गाजवणारी मराठी अभिनेत्री स्नेहप्रभा प्रधान

बोलपटाच्या सुरवातीची काही वर्षं गाजवणारी मराठी अभिनेत्री स्नेहप्रभा प्रधान यांचा जन्म १९२० साली झाला. स्नेहप्रभा प्रधान यांचे दहा वर्षांपर्यंतचे त्यांचे बालपण नागपूर, पुणे, मुंबई, कलकत्ता, लाहोर आणि अन्य शहरांत गेले. परिणामी १८ वर्षाच्या होईपर्यंत त्यांना चार भाषा अस्खलित बोलता येऊ लागल्या. त्यांना कुत्र्या-मांजराचे आणि अन्य प्राण्यांचे खूप प्रेम होते. आपण डॉक्टर बनावे अशी त्यांची फार इच्छा होती. […]

बॉलीवूड मधील ट्रेजेडी किंग मुहम्मद युसुफ खान उर्फ दिलीप कुमार

बॉलीवूड मधील ट्रेजेडी किंग मुहम्मद युसुफ खान उर्फ दिलीप कुमार यांचा जन्म ११ डिसेंबर १९२२ रोजी मध्ये पेशावर येथे झाला. हिंदी चित्रपटांमध्ये अभिनयाची तहज़ीब आणि तरक्की असलेले अभिनेते म्हणजे दिलीपकुमार. पेशावरमधील किस्सा खवानी बाजारात एका फळविक्रेत्या पठाण कुटुंबात जन्माला आलेल्या युसूफ खान यांनी कधीही हिंदी चित्रपटसृष्टीत अभिनय करण्याचे स्वप्न पाहिले नव्हते. वडिलांनी व्यवसायाचे बस्तान बसविल्यानंतर इतर कुटुंबीयांसोबत […]

अहमद फराज

‘मेरा कलम तो अमानत है मेरे लोगों की, मेरा कलम तो अदालत मेरे जमीर की है’ किंवा ‘अब के हम बिछडे तो शायद कभी ख्वाबों में मिले, जिस तरह सूखे हुए फूल किताबों में मिले’ लिहिणारे शायर अहमद फराज. ऊर्दू शायर अहमद फराज यांचा जन्म १२ डिसेंबर १९३१ रोजी नौशेहरा (पाकिस्तान) येथे झाला. प्रेमातील मिलन, विरह, प्रतीक्षा […]

मराठीतील श्रेष्ठ दर्जाचे गीतकार व भावकवी भा. रा. तांबे

मराठीतील श्रेष्ठ दर्जाचे गीतकार व भावकवी भा. रा. तांबे यांचा जन्म २७ ऑक्टोबर १८७४ रोजी मध्य प्रदेशातील मुगावली येथे झाला. भा.रा.तांबे हे मराठीतील श्रेष्ठ दर्जाचे गीतकार व भावकवी म्हणून प्रसिद्ध होते. केशवसुत यांच्यानंतरचे मराठीतील महत्वाचे कवी म्हणून त्यांचा उल्लेख केला जातो. भा.रा.तांबे यांचे संपूर्ण नाव भास्कर रामचंद्र तांबे असे होते. ते ग्वाल्हेर संस्थानाचे राजकवी होते. म्हणून राजकवी […]

बॉलिवूडची ब्युटी क्वीन अभिनेत्री ऐश्वर्या राय

सौंदर्याचं दुसरं नाव ऐश्वर्या राय आहे. हे सौंदर्याचं ऐश्वर्य जन्माला आलं तेही एका दाक्षिणात्य कुटुंबातच. मूळची ती मल्याळम. पण तिचा जन्म कर्नाटकातील मंगळूरचा. […]

आशयगर्भ आणि भावतरल कविता लिहिणा‍रे कविवर्य वा. रा. कांत

कविवर्य कांतांनी दोन पारतंत्र्यं पाहिली ती म्हणजे एक इंग्रजांचं व दुसरं कांत कुटुंब जिथं रहात होतं, त्या मराठवाडा भूमीवरचं निजामांचं जुलमी पारतंत्र्य. त्यांचा जन्म ६ ऑक्टोबर १९१३ रोजी झाला. जिथं मराठी भाषा बोलण्यासही बंदी होती. अशा परिस्थितीतही कांतांचं काव्यलेखन स्वतःच्याच स्फूर्तिदायक व स्वातंत्र्यांचं स्फुल्लिंग उजळीत समृद्ध होत होतं. पारतंत्र्यातच प्रसिद्ध झालेला कविवर्य कांतांचा ‘रुद्रवीणा’ हा काव्यसंग्रह […]

दुर्गा पूजेची सुरवात

बंगाली संस्कृतीत नवरात्रात ‘दुर्गा पूजे’ची विशेष परंपरा आहे. नवरात्राच्या सातव्या दिवसापासून ते विजयादशमीपर्यंत दुर्गादेवीची आराधना बंगाली संस्कृतीत केली जाते. बंगाली समाजात देवी दुग्रेला विशेष महत्त्व असून तिला ‘दुर्गा माँ’ असे संबोधले जाते. नवरात्रीच्या दिवसात दुर्गा पूजा करण्याची बंगाली समाजाची विशेष परंपरा आहे. साधारण महाराष्ट्रात नवरात्रीच्या पहिल्या म्हणजे घटस्थापनेच्या दिवशी घटाची स्थापना करून मग नऊ दिवसाच्या नऊ […]

नवरात्रीचा साहवा दिवस

आज नवरात्रीचा रंग हिरवा आजचा विषय हिरव्या रंगाची ब्रोकोली ‘स्प्राऊटिंग ब्रोकोली’ हे जरी या भाजीचे नाव असलेतरी ‘ब्रोकोली’ या नावाने आपण ओळखतो. ब्रोकोली मुळातंच अनोळखी आणि विदेशी भाजी. ब्रोकोली ही भाजी हिरव्या फ्लॉवरसारखी दिसते. ही भाजी कुरकुरीत व चविष्ट आहे म्हणून या भाजीचा प्रामुख्याने सॅलडमध्ये वापर केला जातो. ब्रोकोलीच्या रॉयल ग्रीन, एव्हरग्रीन, युनिव्हर्सल, डॅन्यूब, अव्हेला, युग्रीन, […]

ललिता पंचमी

ललिता पंचमीचे दिवशी व्रत ते उपांगललिता हो अर्ध्यपाद्यपूजनें तुजला भवानी रतविती हो ॥ रात्रीचे समयी करिती जागरण हरिकथा हो आनंदे प्रेम तें आले सद्‌भावे क्रीडतां हो ।।उदो।। नवरात्रीतल्या पाचव्या दिवसाला ललिता पंचमी (महालय), श्री ललिता पंचमी म्हणजे आश्विन शुक्ल पंचमी ला उपांग ललिता व्रत करावयाचे आहे. हे काम्य व्रत आहे. ललिता देवी ही या व्रताची देवता […]

नवरात्रीचा पाचवा दिवस

आज नवरात्रीचा रंग पिवळा आजचा विषय पिवळ्या रंगाची हळद आयुर्वेदातील हळद हे एक महत्त्वाचा घटक आहे. हळदीला आयुर्वेदामध्ये ” हरिद्रा ” म्हणतात. हळदीला आर्थिक, धार्मिक, औषधी व सामाजिकदृष्टया अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. पूर्वी हळद केवळ जंगलात मिळत असे. दक्षिण पूर्व आशियाई देशात तिचे जास्त वास्तव्य आढळत असे. त्या काळात जंगलात आढळणारी हळद भारतात फक्त औषधांसाठीच वापरली […]

1 204 205 206 207 208 423
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..