नवीन लेखन...
Sanket
About Sanket
संकेत प्रसादे हे एक प्रसिद्ध लेखक, ब्लॉगर, प्रशिक्षक, समुपदेशक आणि युटूबर आहेत. त्यांची आतापर्यंत २ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. तसेच ते नवराष्ट्र ह्या दैनिकामध्ये मानसिक आणि शारीरिक आरोग्यासंबंधी लिखाण करतात. मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्याबद्दल ते आपल्या लिखाणांमधून तसेच कार्यक्रमांमधून लोकांमध्ये जनजागृती निर्माण करतात.

रात्रीच्या जेवणातील ‘या’ चूकांमुळे वाढतो लठ्ठपणा

आपल्या प्रत्येक दिवसाची सुरूवात ही पोटभर नाश्ता करून झाली पाहिजे, संतुलित पोषण आहाराचा दुपारच्या जेवणामध्ये समावेश आणि रात्रीचे जेवण पचायला हलके व दिवसापेक्षा कमी प्रमाणात घेतले पाहिजे. […]

राग आलाय? शांत होण्यासाठी हे करून पहा

जर एखादी गोष्ट मनासारखी घडली नाही तर कमी अधिक प्रमाणात रागही येतो आणि माणसाला राग येणं ही नैसर्गिक गोष्ट आहे. पण हा राग जर तीव्र असेल तर काही विपरीतही घडू शकते, भांडणे मारामाऱ्या होऊ शकतात एकूणच काय तर वातावरण बिघडतंच, पण शरीरावरही वाईट परिणाम होतो. […]

केळी खाणे ठरते आरोग्यासाठी हितकारक

नैसर्गिकरित्या ऊर्जा वाढवणारी केळी आपण नियमितपणे योग्य प्रमाणात सेवन करणे फायदेशीर ठरते. म्हणूनच आपल्याकडे पूर्वापार उपवासाला केळी खाण्याची पद्धत आहे. प्रसादाला पण केळ्याचा मान असतो. कुठल्याही मंगलकार्यात आपण केळ्याचे खांब दरवाजाला बांधायची पद्धत आहे. असे हे बहुगुणी केळं आपल्या आहारात योग्य प्रमाणात समाविष्ट करणं, आपल्या आरोग्यासाठी हितकारक ठरते. […]

तुमच्याही मुलांना लठ्ठपणाची समस्या सतावतेय?

लहान मुले हे नेहमीच मोठ्यांना फॉलो करतात आणि त्यामुळेच लहान मुलांमध्येही लठ्ठपणाचं प्रमाण वाढत चाललं आहे. आई-वडिलांची व्यस्त जीवनशैली, मुलांची खाण्यापिण्याची निवड, जंक फूड आणि तासंतास मोबाईलचा वापर ही सध्या लहान मुलांचा लठ्ठपणा वाढण्यामागची महत्वाची कारणं आहेत. म्हणून आज मी ह्या सगळ्यावर कशाप्रकारे मात करता येईल ह्यासंबंधी काही टिप्स येथे देणार आहे. […]

पोटाचे आरोग्य सुधारण्यासाठी…

सध्याच्या फास्ट लाइफमध्ये बऱ्याच जणांना पोटाच्या तक्रारींना सामोरे जावे लागत आहे, पण ह्याचे जर मूळ कारण शोधले तर बऱ्याचदा आपल्या चुकीच्या आणि अवेळी खाण्याच्या पद्धतीमुळे पोटाच्या समस्या ह्या जास्त प्रमाणात होतात. जर ह्यावर यशस्वीरीत्या मात कराची असेल तर प्रोबायोटिक्स पोटाचे आरोग्य आणि आकार चांगला ठेवण्यासाठी अतिशय उत्तम पर्याय आहे. परंतु, म्हणून त्याचा अतिरेक करणे योग्य नाही. पोटाचे आरोग्य सुधारण्यासाठी दैनंदिन जीवनात करण्याच्या काही गोष्टी…. […]

आपल्या हक्काचा दिव्यातील राक्षस

लहानपणी सर्वाना गोष्टी ऐकायला किंवा वाचायला आवडतात. गोष्टीमधून आपण एका नवीन दुनियेची सफर करून येतो. जसे आपण मोठे होतो, तसे आपण कामामध्ये अडकत जातो आणि लहानपणातील गोष्टीच्या दुनियेतून बाहेर पडून वास्तविक दुनियेत रमून जातो. […]

गॅस आणि ऍसिडिटीपासून कशी मिळवाल सुटका?

असे नेहमीच म्हणतात की प्रत्येक माणसाच्या आनंदाचा मार्ग हा त्याच्या पोटातून जातो. पण ह्याच आनंदावर विरझण घालण्याचे काम आपल्या हल्लीच्या चुकीच्या आणि वेळीअवेळी खाण्याच्या सवयीमुळे तयार होणारा गॅस करतो. म्हणूनच हल्ली अनेकांना गॅसच्या समस्येने ग्रासलेले दिसून येते. बरेच लोकं गॅस ही किरकोळ गोष्ट आहे असे मानतात. […]

योग्य विचारातून वैभवसंपन्न व्हा

एक गोष्ट कायम लक्षात ठेवा की तुम्हीसुद्धा योग्य विचारांनी अशा प्रकारचे वैभव मिळवू शकता. पॅरामेश्वराचीसुद्धा प्रत्येकाच्या बाबतीत हीच इच्छा असते. […]

सकारात्मक दृष्टीकोन

जेव्हा आपला दृष्टिकोन सकारात्मक असतो तेव्हा आपण तक्रारी न करता, आहे त्या परिस्थितीचा आपल्या ध्येयाप्रती सदुपयोग करून घेऊ शकतो. कितीही कठीण काळ असला तरी त्यावर मात करून आपण आपलं भविष्य घडवू शकतो. जेव्हा आपण सकारात्मक लहरी आपल्या जीवनात निर्माण करतो तेव्हा आपण सकारात्मक घटना आपल्या आयुष्यात आकर्षित करतो आणि त्याचा आपल्या ध्येयाप्रती उपयोग होतो. […]

1 4 5 6 7 8
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..