आपल्या हक्काचा दिव्यातील राक्षस

लहानपणी सर्वाना गोष्टी ऐकायला किंवा वाचायला आवडतात. गोष्टीमधून आपण एका नवीन दुनियेची सफर करून येतो. जसे आपण मोठे होतो, तसे आपण कामामध्ये अडकत जातो आणि लहानपणातील गोष्टीच्या दुनियेतून बाहेर पडून वास्तविक दुनियेत रमून जातो. लहानपणी आपल्याला वडीलधारी मंडळी अनेक वेगवेगळ्या गोष्टी सांगतात. उदा. रामायण, महाभारत, इसापनीती, अलीबाबा आणि चाळीस चोर, सिंड्रेला, बोधपर इत्यादी. ह्या सगळ्यामध्ये आपला लहान जीव रमून जातो. मुलांना वाटतं, आपण पण रामासारखं रावणाला मारावं किंवा चोरांना पकडावं किंवा आपल्याकडे सिंड्रेला सारखा बूट असावा असे विविध कल्पनांमध्ये मुले रममाण होऊन जातात.

Image result for दिव्यातील राक्षस

सगळ्यात आवडती गोष्ट म्हणजे अलादिनाच्या “जादूच्या दिव्यातील राक्षसाची”. अलादिनला जसा जादूचा दिवा मिळतो आणि तो घासला कि, त्यातून जीन अर्थात राक्षस बाहेर पडून त्याला विचारतो, “क्या हुकूम है मेरे आका” म्हणजेच “काय आज्ञा आहे माझ्या मालका”. आणि तो राक्षस अलादिनाच्या तीन इच्छा पूर्ण करतो. सगळ्यांना ही गोष्ट आठवत असेल. मग लहान असो वा मोठी माणसे प्रत्येकालाच हा जादूच्या दिव्यातील राक्षस हवाहवासा वाटतो. प्रत्येकाला वाटतं, की माझी प्रत्येक इच्छा पूर्ण झाली पाहिजे.

मग काय वाटतं तुम्हाला जर हा जादूच्या दिव्यातील राक्षस तुम्हाला मिळाला तर तुम्ही काय कराल?

आपल्या कुठल्याही इच्छा पूर्ण कराल?

नक्की कसा वापर कराल त्याचा तुमच्या आयुष्यात?

खरं पाहता, तुमच्याकडे कायमस्वरूपी दिव्यातील राक्षस तुमच्याबरोबर आहे. तो म्हणजे “आकर्षणाचा सिद्धांत”. दिव्यातील अलौकिक शक्ती म्हणजेच “आकर्षणाचा सिद्धांत किंवा नियम” होय.

“आकर्षणाचा सिद्धांत” म्हणजे नक्की काय?

आकर्षणाच्या सिद्धांतानुसार, समान गोष्टी एकमेकांकडे आकर्षित होतात. म्हणूनच जेव्हा आपण एखादी गोष्ट मनात आणतो, तेव्हा त्यासारख्याच अन्य गोष्टी स्वतःकडे आकर्षित करतो.

विचारांमध्ये चुंबकीय आकर्षणशक्ती असते आणि प्रत्येक विचाराची एक लहर म्हणजेच फ्रिक्वेन्सी असते. जेव्हा आपण मनात एखादा विचार आणतो तेव्हा तो विचार आपण ब्रह्मांडात पसरवतो आणि एखाद्या चुंबकाप्रमाणे आपण समान लहरींची गोष्ट आकर्षित करतो.

कुणीही कितीही नकार दिला, तरी कळत नकळत आपण आकर्षणाचा सिद्धांत पावलोपावली वापरत असतो. जेव्हा आपण नकळतपणे त्याचा वापर करतो तेव्हाही तो त्याचे फळ आपल्याला देतो आणि जेव्हा आपण जाणून त्याचा वापर आपल्या आयुष्यात करतो तेव्हा आपण आपलं आयुष्य आपल्या मनाप्रमाणे घडवू शकतो.

ह्याचा अर्थ दिव्यातील अलौकिक शक्ती म्हणजेच आकर्षणाचा सिद्धांत किंवा नियम आहे. हा नियम सदैव कार्यरत असतो. त्या नियमाला सकारात्मकता किंवा नकारात्मकता कळत नाही, त्याला फक्त मनात आलेला विचार त्यानुसार समान परिस्थिती आकर्षून घेणं हे कळतं आणि त्यानुसार आपण एखादी परिस्थिती आपल्या जीवनात आकर्षून घेतो. म्हणूनच आपण आपले विचार नेहमी चाचपले पाहिजेत. जेव्हा आपण नकारात्मक विचारांनी स्वतःला घेरून टाकतो तेव्हा तशीच परिस्थिती आपण आकर्षित करतो.

ह्यासाठीच आपण आपल्या मनाला योग्य आणि सकारात्मक विचाराचं वळण लावणे महत्त्वपूर्ण ठरते.

गीतेमध्ये सांगितले आहेच “जे पेराल ते उगवेल”.

अर्थात कुठलाही विचार करताना जाणीवपूर्वक करणे गरजेचे ठरते. नाहीतर कळत नकळत आपण आपले आयुष्य कठीण करून ठेवतो. आकर्षणाचा नियम योग्यरितीने वापरून आपण आपल्या आयुष्याचे नक्कीच शिल्पकार बनू शकतो.

प्रख्यात लेखिका रॉन्डा बर्न ह्यांच्या इंग्रजीमधील “द सिक्रेट” आणि मराठीमध्ये “रहस्य” ह्या पुस्तकामध्ये आकर्षणाच्या सिद्धांताबद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे. प्रत्येकाने हे पुस्तक अथवा ह्याचा विडिओ जरूर पाहावा आणि आपल्या आयुष्यात नक्कीच योग्य आणि चांगला बदल घडून आणण्यासाठी तयार असावे.

आपल्याकडे चोवीस तास असलेल्या ह्या दिव्यातील शक्तीचा आपण आपले आयुष्य चांगल्या पद्धतीने घडवायला नक्कीच वापरू शकतो.

— संकेत प्रसादे

संकेत रमेश प्रसादे
About संकेत रमेश प्रसादे 36 Articles
संकेत प्रसादे हे एक प्रसिद्ध लेखक, ब्लॉगर, प्रशिक्षक, समुपदेशक आणि युटूबर आहेत. त्यांची आतापर्यंत २ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. तसेच ते नवराष्ट्र ह्या दैनिकामध्ये मानसिक आणि शारीरिक आरोग्यासंबंधी लिखाण करतात. मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्याबद्दल ते आपल्या लिखाणांमधून तसेच कार्यक्रमांमधून लोकांमध्ये जनजागृती निर्माण करतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

पर्वतीच्या टेकडीवरची लेणी

पर्वताई देवीच्या नावावरुन टेकडीस पर्वती हे नाव पडले, पुण्याच्या अनेक ...

रत्नागिरी जिल्ह्यातील नारळ संशोधन केंद्र

रत्नागिरी तालुक्यात भाट्ये येथे नारळ संशोधन केंद्र आहे. हे केंद्र ...

सातारा जिल्ह्यातील पवनऊर्जा प्रकल्प

महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्हा पवनऊर्जा जिल्हा म्हणून प्रसिध्द आहे तो ...

सातवाहनकालीन कर्‍हाड

महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील कर्‍हाड हे प्राचीन शहर सातवाहनकालीन आहे. सातवाहनकालीन ...

Loading…