नवीन लेखन...
Avatar
About निलेश बामणे
Poet & Writer Editor - Marathi magzine Sahitya Upekshitanche
Contact: Facebook

आठवण

बरेच दिवस झाले काही लिहिले नाही तुझ्या आठवणीत… तुझी ती आठवणच हरविली नाही ना ? माझ्या आठवणीत… कित्येक कविता मी सहज रचल्या आहेत तुझ्या आठवणीत… कित्येक कविता मी सहज सोडल्या आहेत तुझ्या आठवणीत… माझ्या आयुष्यातील कित्येक वर्षे वाया गेली तुझ्या आठवणीत… मी राहात होतो तुझ्या नाजूक हृदयातील माझ्या आठवणीत… आठवणीतील माझी तू तुझा मी राहतील जगाच्या […]

प्रेम

प्रेम कसं ! हळुवार यायला हवं तुमच्या आयुष्यात जशी कडक उन्हात तुमच्या अंगाची लाही लाही होत असताना एखादी वाऱ्याची हलकीशी झुळूक येते तशी… प्रेम कस ! आनंदात ,बागडत आणि उडत यायला हवं तुमच्या आयुष्यात तुम्हाला एक नाजूक , सुंदर आणि आकर्षक फुल समजून एखाद्या रंगीबेरंगी फुलपाखरासारखं… प्रेम कसं ! स्वप्नात नसतानाही व्हावं त्यात गुंतून पडावं पण […]

जाणीव

माझ्या कविता,माझ्या कथा माझ्या नसतात,त्या तिच्या असतात त्या जगाला,तिच्या असण्याची माझ्या आजूबाजूला, आणि माझ्या अस्तित्वातील जगण्यात तिच्या भूमिकेची जाणीव करून देत असतात… ©कवी – निलेश बामणे

तुझ्यासाठी काही ही

तुझ्यासाठी काही ही करणार नाही मी माझ्या विचारांशी तडजोड तुझ्यासाठी करणार नाही मी तुझ्यासाठी काही ही करणार नाही मी तुझ्यासाठी माझा जीव कधीच देणार नाही मी तुझ्यासाठी काही ही करणार नाही मी तुझ्यासाठी माझ्या नात्यांचा बळी देणार नाही मी तुझ्यासाठी काही ही करणार नाही मी पण तुझ्या प्रेमाला कधीच नकार देणार नाही मी तुझ्यासाठी काही ही […]

कळते मला

तुझे रुसने कळते मला रागावनेही कळते तुझे टाळणे कळते मला प्रेमही कळते तुझे झुरणे कळते मला दुःखही कळते तुझी व्यथा कळते मला वेदनाही कळते तुझी अगतिकता कळते मला समर्पणही कळते तुझ्यातील तू कळते मला माझ्यातीलही कळते तुझी इच्छा कळते मला मनही कळते तू माझी कळते मला तुलाही कळते मी तुझा कळते मला जगलाही कळते आता सारेच […]

वाटत राहत…

वाटत राहत तुझ्याशी खूप बोलावं भरभरून जगातील अकल्पित गूढ आणि चमत्कारी विषयांवर पण ओठातून शब्दच बाहेर पडत नाही तुझा अबोला कधी विनाकारण तुटत नाही मला ज्ञान असताना भूत भविष्य वर्तमानाचे तुझ्याशी बोलावे असे काही घडत नाही आज ना उद्या जगाला उत्तरे हवी तुझ्या माझ्या नात्याची त्या नात्यातील गुढतेची कारण आपले नाते खरचं साधे नाही © निलेश […]

निर्भया…शॉर्ट फिल्म

  सीन नं – 1     वेळ – रात्रीची     ठिकाण – निर्जन रस्ता ( बॅकग्राऊंडला रातकीड्यांचा वैगरे आवाज येतोय ) एक तरुणी ( जॉब वरून आलेली ) रस्त्याने हातात मोबाईल घेऊन चालतेय. ती दोन चार पावले चालल्यानंतर तिचा मोबाईल वाचतो … ती तरुणीः- मोबाईलवर… हा ! आई बोल अगं ! आज ऑफीसमध्ये जरा जास्तच काम होत त्यात […]

होळी…

होळी रे होळी ! पुरणाची पोळी ! ही आरोळी हल्ली तितकीशी ऐकायला मिळत नाही म्हणून आपल्या संस्कृतीतील होळीचे महत्व कमी झालेले आहे असे मानण्याचे काही कारण नाही. महाराष्ट्रात खास करून कोकणात होळी या उत्सवाला असाधारण महत्व आहे. होळी हा सण त्यांच्या जगण्याचा अविभाज्य भाग बनलेला आहे. होळी हा एकमेव सण आहे जो कोकणातील लोकांच्या उत्साहाचा प्रतीक […]

आय लव्ह यु …

विजय ! एक  सर्वसामान्य दिसणारा माणूस एका बऱ्यापैकी महाग असणाऱ्या हॉटेलात कोणीतरी येण्याची वाट पहात झुरका मारत चहा पित असतो पण  कपाने ! बशीने चहा पिणे त्याच्या गावातच नव्हते. गरम गरम चहाचा कप तो मिनिटात रिकामा करत असे पण येथे वेळ काढायचा होता म्हणून तो थेंब थेंब चहा पीत होता. चहा पिता पिता आजूबाजूचेच नव्हे तर […]

1 17 18 19 20 21 43
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..