प्रीती

मावळतेय माझी प्रीती मावळणारी  हीच  निराशा देत असते आश्वासन की  उगवण्याची  आशा मी  क्षणक्षण  भंगलो त्या  ढगाआड  दडलो दुःखाला  पाठीशी  घेत सुखाच्या  शोधात हिंडलो सुखाच्या  शोधात  सुद्धा मानवतेचा अर्थ  आहे इथे  कोणालाच  काहीनाही सगळं  काही  व्यर्थ  आहे मावळतेय माझी प्रीती मावळणारी  हीच  निराशा देत असते आश्वासन की  उगवण्याची  आशा …., — कुसुमानंद