नवीन लेखन...
Avatar
About डॉ. भगवान नागापूरकर
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

अपूर्ण जीवन

सोडून दे अहंकार तुझा, लाचार आहेस आपल्या परि, पूर्ण जीवन तुला न मिळे, न्यूनता राहते कांहीं तरी ।।१।। धनराशी मोजत असतां, वेळ तुजला मिळत नसे, शरीर संपदा हाती नसूनी, मन सदा विचलित असे ।।२।। शांत झोपला कामगार , दगडावरी ठेवूनी डोके. देह सुदृढ असूनी त्याचा, पैशासाठी झुरतां देखे ।।३।। उणीवतेचा कांटा सलूनी, बाधा येत असे आनंदी, […]

सर्प आणि उंदीर यांचे द्वंद

हैदराबाद येथे एक सर्पालय बघण्यास गेलो होतो. अनेक जातींचे सर्प कांच- घरात ठेवलेले होते. त्यांना खेकडे, बेडूक, उंदीर, वा छोटे जिवंत प्राणी खाण्यासाठी सापाच्या दालनात सोडले जात होते. फक्त भुकेला सर्प हा आपल्या भक्षावर तुटून पडतो. नसता तो भक्ष जीवना मारत नसतो. एक सर्प दालनात एका उंदराला सोडले होते. सर्प बराच मोठा होता. सापाचे हालके हालकेपुढे […]

उपयोगीता हेच मूल्य

चष्मा लावूनी करीत होतां, ज्ञानेश्वरीतील पारायण, दृष्टीमधले दोष काढले, चाळशीचा आधार घेवून ।।१।। फुटूनी गेला एके दिवशीं, चष्मा त्याच्या हातामधूनी, पारायणे ती बंद पडली, दृष्टीस त्याच्या बाध येऊनी ।।२।। चालत असता सरळपणे, दैनंदिनीचे कार्यक्रम, खीळ पाडूनी बंद पाडी, क्षुल्लक वस्तू क्षुल्लक दाम ।।३।। वस्तूचे मूल्य ठरते, तिच्या उपयोगिते वरती, तोलण्यास धन न लागे, मूल्य मापन जेंव्हां […]

पूजा तयारी

रोज सकाळीं प्रात: समयीं, पूजा करी देवाची । पूजे मधल्या विधीत, चूक न होई कधी त्याची ।। स्नान करोनी नेसूनी सोंवळे, देव घरांत जाई । भाळी लावूनी गंध टिळा, मंत्रपाठ गाई ।। सहयोग देई पत्नी, पूजा कर्मामध्ये त्याला । आधींच उठोनी झाडूनी घेई, स्वच्छ करी देव घराला ।। करूनी सडा संमार्जन तेथें, सारवोनी घेई जागा । […]

काजळी धरल्या वाती

तेवत होती ज्योत दिव्याची, प्रकाश देऊनी सर्व जनां, आनंदी करण्या आनंद वाटे, तगमग दिसे तिच्या मना ।।१।। शांत जळते केंव्हां तरी, भडकून उठते कधी कधी, फडफड करीत मंदावते, इच्छा दाखवी घेण्या समाधी ।।२।। जगदंबेच्या प्रतिमेवरती, प्रकाश टाकुनी हास्य टिपते, हास्य बघूनी त्या देवीचे, चरण स्पर्शण्या झेपावते ।।३।। अजाणपणाच्या खेळामधली, स्वप्न तरंगे दिसती, दिव्यामधले तेल संपता, काजळी […]

विष्ठा

विष्ठा बघूनी थुंकलो, घाण वाटली मजला, अमंगल संबोधूनी, लाखोली देई तिजला ।।१।। संतापूनी मजवर , कान उघडणी केली, तुझ्याचमुळें मूर्खा मी, अमंगळ ती ठरली।।२।। आकर्षक रूप माझे, लाडू करंज्यानें युक्त कपाटातूनी काढूनी, केले सारे तूंच फस्त ।।३।। परि मिळतां तुझा तो, अमंगळ सहवास, रूप माझे पालटूनी, मिळे हा नरकवास ।।४।। डॉ. भगवान नागापूरकर संपर्क – ९००४०७९८५० […]

उदरांतील शेषशायी

मातेच्या उदरांत झोपला, शेषशायी भगवान वेड्यापरी त्यास शोधीतो, सागरी जाऊन शेषशायीचे चित्र बघतां, साम्य ते दिसेल उदरामधल्या बालकांतही, सारे तेच आढळेल शेषापरी वेटोळे असुनी, ‘ नाळ ‘ तयाला म्हणती क्षारयुक्त पाण्यामध्यें, बालक ते निद्रिस्त असती बालकाच्या नाभी मधुनी, येई कमलाकृती भाग जीवनसत्व त्यावर असुनी, ब्रह्मापरी दिसे अंग ‘ सो हं ‘ निनादुनी सांगे, ‘ मीच तोच […]

मर्यादा

मर्यादेचा बांध घालूनी, मर्यादेतचि जगती सारे । अनंत असता ईश्वर , मर्यादा घाली त्यास बिचारे ।। जाण जगाची होई इंद्रियांनी, त्याला असती मर्यादा । विचार सारे झेपावती, ज्ञान शक्ती बधूनी सदा ।। अथांग वाटे विश्वमंडळ, दाही दिशांचा भव्य पसारा । ईश्वर आहे थोर त्याहूनी, मोजमापाच्या उठती नजरा ।। कशास करीतो तुलना सारी, भव्य दिव्यता आम्हा दाखवूनी […]

नियतीचा फटका

भोपाळ येथे विषारी वायुमुळे एका रात्रीत सहस्त्रावधी लोक मृत्यूमुखी पडले. ४.१२.८४ ची रात्र… एक भयानक रात्र अशी, सहस्त्रावधींचा घेई बळी । नियतीच्या खेळामधली, कुणा न समजे ही खेळी ।।१।। मध्यरात्र होऊन गेली, वातावरण शांत होते । गादीवरती पडून सारे, स्वप्ने रंगवीत होते ।।२।। तोच अचानक विषारी वायू, पसरला त्या वातावरणी । हालचालींना वाव न देता, श्वास रोखीले स्वप्न […]

मेघ- गर्वहरण

अंहकाराचा पेटून वणवा, थैमान घातिले त्या मेघांनी । तांडव नृत्यापरि भासली, पाऊले त्यांची दाही दिशांनी ।।१।। अक्राळ विक्राळ घन दाट, नी रंग काळाभोर दिसला । सूर्यालाही लपवित असता, गर्वाचा भाव चमकला ।।२।। पृथ्वीवरती छाया पसरवूनी, चाहूल देई आगमनाची । तोफेसम गडगडाट करूनी, चमक दाखवी दिव्यत्वाची ।।३।। मानवप्राणी तसेच जीवाणे, टक लावती नभाकडे । रूप भयानक बघून […]

1 175 176 177 178 179 214
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..