नवीन लेखन...
Avatar
About डॉ. भगवान नागापूरकर
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

जगणें अटळ असतां

वाट कुणाची बघतो आम्हीं, ठाऊक असते सर्वांना, मृत्यू हा अटळ असूनी, केव्हांही येई अवचित क्षणा ।।१।।   आगमनाचा काळ त्याचा, कल्पनेनें ठरविला जातो, अचूक जरी शक्य नसले, विचार त्यावरी करीता येतो ।।२।।   जीवन म्हणती त्या काळाला, जगणे आले मृत्यू येई तो, जगण्यापुढे पर्याय नसतां, सुसह्य करण्या प्रयत्न होतो ।।३।।   तन मनाला सुख देऊनी, जीवन […]

स्थिर वा अस्थिर

स्थिर आहे जग म्हणूनी, अस्थिर आम्ही जगू शकतो । अस्थिर आहे जग म्हणून, स्थिर आम्ही जगू शकतो ।।१।।   पोटासाठी वणवण फिरे, शोधीत कण कण अन्नाचे । थकला देह विसावा घेई, कुशीत राहूनी धरणीचे ।।२।।   धरणी फिरते रवि भोवतीं, ऋतूचक्र हे बदलीत जाते । जगण्यामधला प्राण बनूनी, चैतन्य सारे फुलवून आणते ।।३।।   पूरक बनती […]

पतंग

एक पतंग वरी चालला, डोलत आकाशीं भाळी त्याच्या यश कोरले, झेप घेई ती कशी ।। भरारी घेई पतंग ज्याला, आधार दोरीचा जाणीव होई येतां प्रसंग, त्याला कटण्याचा ।। धरतीवरी कोसळत असतां, दृष्टी टाकी आकाशीं इतर पतंग बघूनी बोलला, तोच स्वतःशीं ।। ” नभांग मोठे दाही दिशा त्या, संचारा स्वैरपणें आठवण ठेवा त्या शक्तीची, ज्याच्यामुळें जगणें ” […]

भिकारीण

मधूर आवाज मिळूनी, उपकार झाले तिजवर, सुंदर गाणे गाऊनी, आनंदीत करी इतर ।।१।। हातपाय दुबळे होते, दृष्टी नव्हती तिजला, कष्ट करण्या शक्ति नव्हती, कसा मिळेल घास तिला ।।२।। परि ती होती आनंदी, गाण्याच्या ओघांत, उचलित होती पैसे, पडता तिच्या पदरांत ।।३।। जरी झाला देह दुर्बल, जगण्याची होती आंस मनी, मिळालेल्या आवाजाला, समजे ती ऋणी ।।४।। डॉ. […]

पुण्ण्याचा साठा

खिशांत माझ्या पडली होती, सुटी नाणी काही, वस्तूंची ती खरेदी करण्या, सर्व बाजार पाही ।।१।। सराफ्याच्या दुकानी दिसला, एक हिऱ्याचा हार, डोळे माझे चमकूनी गेले, फिरती गरगर ।।२।। दाम विक्रीचे जाणूनी घेता, हताश मी झालो, हातातील धनाचे मोजमाप, करू मी न शकलो ।।३।। दोन वेळची पूजा करूनी, जप माळ जपती, खूप साचले पुण्य आपले, हे कांहीं […]

नियतीची चाकोरी

अथांग सारे विश्व हे, असंख्य त्याचे व्यवहार । कसे चालते अविरत, कुणा न कधी कळणार ।। खंड न पडता केव्हाही, सूर्य-चंद्र येई आकाशी । वादळ वारा ऋतू बदले, चूक न होई त्यांत जराशी ।। घटना घडे पुन्हा पुन्हा, आकार रूपे बदलत । हर घटनेचे वलय, फिरे एकची चाकोरीत ।। प्रत्येक कालक्रमणाच्या आखून, दिल्या मर्यादा । ठेवी […]

दया प्रेम भाव

दया प्रेम हे भाव मनी, जागृत कर तू भगवंता । तुला जाणण्या कामी येईल, हृदयामधली आद्रता ।।१।। शुष्क मन हे कुणा न जाणे, धगधगणारे राही सदा । शोधत असता ओलावा हा, निराश होई अनेकदा ।।२।। पाझर फुटण्या प्रेमाचा , भाव लागती एकवटूनी । उचंबळणारे ह्रदय तेथे, चटकन येईल मग दाटूनी ।।३।। दया प्रेम या भावांमध्ये, दडला […]

मच्छरांचे साम्राज्य

नुकत्याच एका बातमीने संपूर्ण मुंबईकरांना हादरुन सोडले. डासांची संख्या प्रचंड झालेली आहे. सर्वत्र मलेरीयाचा प्रादुर्भाव झालेला आहे. मृतांची संख्याही खूप वाढलेली आहे. सर्व अधुनिक वैद्यकिय शास्त्र आपल्या शक्तिनीशी त्याचा प्रतिकार करताना दिसला. कांही दिवस यश, वा कांही दिवस अपयश अर्थात रोगाचा फैलाव जास्त झाल्याचे कळून येते. जागतीक आरोग्य संघटना ( World Health Organization ) हीने देखील […]

भक्ष्य

नदीकाठच्या कपारीमध्ये, बेडूक बसला दबा धरूनी, उडणाऱ्या माशीवरते, लक्ष सारे केंद्रीत करूनी ।।१।। नजीक येऊनी त्या माशीचे, भक्ष त्याने करूनी टाकले, परि दुर्दैव त्याचे बघा कसे, सर्पानेही त्यास पकडले ।।२।। बेडूक गिळूनी सर्प चालला, हलके हलके वनामधूनी, झेप मारूनी आकाशी नेले, घारीने त्याला चोंचित धरूनी ।।३।। ‘भक्ष्य बनने’ दुजा करीता, मृत्यूची ही चालते श्रृखंला, जनक असता […]

जाळी

धागा धागा विणून, केली तयार जाळी । गोलाकार नि बहुकोनी घरे, पडली निर निराळी ।।१।। स्थिर सुबक घरे, जसा स्थितप्रज्ञ वाटे । सर्व दिशांचा तणाव, न दिसे कुणा कोठे ।।२।। तुटेल फुटेल तरी, सैलपणा येणे नाही । जर ढिला झालाच तर, जाळी दिसणार नाही ।।३।। जगे तो अभिमानानें, मान ठेवूनीया ताठ । संसारामधील क्लेश, झेलीत होती […]

1 165 166 167 168 169 214
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..