एका महासिद्धाचे जीवनदर्शन
स्वामी स्वरूपानंद आत्मज्ञानी होते. आत्मज्ञानी मनूष्य ब्रह्मज्ञानाच्या तेजोवलयात वास करीत असतो. तसे स्वामी होत. म्हणून जनात असूनही ते जनावेगळे होते. हाडामांसाचा देह त्यांनी धारण केला होता. तथापि त्याच्या बंधनात ते वावरले नाहीत. किंबहुना हाडामांसाचा देह ज्या पंचतत्त्वांपासून निर्माण होतो त्या पंचतत्त्वाशी त्यांनी एकरूपता साधलेली होती. त्यामुळे ते श्रीमंतीचे वैभवही भोगत होते आणि दीन दरिद्री दुःखी, दुबळ्यांची आर्तताही आत्मीयतेने जाणत होते. एक विराट विलक्षण तथा सहज, सामान्य या सगळ्यांची राखण करून प्रेमाने ओतप्रोत भरलेले जीवन ते जगत होते. […]
