आनंद माडगूळकर युट्युब चॅनेल
आनंद माडगूळकर यांच्या युट्युब चॅनेलवर गदिमांच्या अनेक किस्स्यांचा, आठवणींचा धमाल मनोरंजनाचा ठेवा उपलब्ध आहे, त्या विश्वात रमण्यासाठी आनंद माडगूळकरांच्या युट्युब चॅनेलला आताच भेट द्या. […]
आनंद माडगूळकर यांच्या युट्युब चॅनेलवर गदिमांच्या अनेक किस्स्यांचा, आठवणींचा धमाल मनोरंजनाचा ठेवा उपलब्ध आहे, त्या विश्वात रमण्यासाठी आनंद माडगूळकरांच्या युट्युब चॅनेलला आताच भेट द्या. […]
आपल्या हिमतीवर उभे रहाण्यापासून ते xxला लावून पळण्यापर्यंत पायांचा मानवी जीवनात भक्कम पाया आहे. गोष्टींना पाय फुटून त्या नाहीशा होणे किंवा तोंडात पाय (Foot in mouth) घालण्यापर्यंत आपण ऐकलं आहे, पण पायाला तोंड फुटलेलं अजून ऐकिवात नाही म्हणून हा प्रपंच! पाळण्यातले इवले इवले पाय नाचरे निखळ, नितळ निष्पापसे मखमली गोबरे निवांत शांत, भाबडे पहुडले बहुतसे सारे […]
मार्गांधारे वर्तावि । विश्व हे मोहोरे लावावे ।। या ज्ञानदेवांच्या उक्तीप्रमाणे पू. स्वामी स्वरुपानंदाचे जीवन होते. सहज बोलण्यातून, अत्यंत हळुवारपणे ते साधकाला मार्गर्शन करीत असत. या सर्वांतून सर्वांच्या साधनेला गती मिळत असे. मानवी जीवन हे निवृत्ती व प्रवृत्तीच्या किनाऱ्यातून वाहत असते. साधकही या गतिमान जीवनात हेलकावे घेत असतो. तेव्हा आपले ज्ञानेश्वरी, दासबोध, श्रीमद्भागवतासारखे ग्रंथ, संतांचे अभंग, […]
तुमचं आमचं नातं कधी एका जन्माचं गुलाम नव्हतं ऋणं आपली फेडता फेडता बंध पावले गाढ दृढता ॥ १ ॥ मनाचा कुठला कोपरा काही जिथे तुमचा ठसा नाही तुमच्या लावल्या वळणांनी सरळ झाले मार्ग जीवनी ॥ २ ॥ दुर्धर दुर्गमशा वाटेवरती काजळलेल्या निराशराती संस्कारांचा दीप सोबतीला आशीर्वादाचा कवडसा ओला ॥ ३ ॥ तुम्ही आम्हा दिलं नाही असं […]
मराठी भाषा मोठी गमतीदार आहे, शब्दांचे अर्थ तुम्ही कोणत्या भावनेनं तो शब्द वापरताय यावरही अवलंबून असतात. ‘ठेकेदार’ या शब्दाला खरंतर एक नकारात्मक, उपहासात्मक अर्थ चिकटलेला आहे. पण या लेखनाच्या शीर्षकात मात्र तो अतिशय कौतुकाने, आपलेपणाने वापरला आहे. ठाणे शहरात जेव्हा बंदिस्त नाट्यगृहच नव्हते, तेव्हा स्टेज बांधण्यापासून ते रस्त्यावर फिरून नाटकाच्या जाहिराती वाटण्यापर्यंत साऱ्या जबाबदाऱ्या अत्यंत नियोजनपूर्वक […]
आईची आठवण अशी कधी सुटलीच नाही खरं सांगू, माझी नाळ कधी तुटलीच नाही झाडापासून फांदी वेगळी कशी, असावे सूर्याहून तेज अस्तित्वाची नांदी आईवेगळी नव्हती तेव्हा किंवा आज आतड्यांचा पीळ आम्ही कधी उलगडू दिलाच नाही ॥ पाठीवरला स्पर्श असो वा नजरेतली माया मार्गदर्शी, उत्प्रेरकही, पाठीशी आश्वासक छाया आनंदाच्या झंकारांनाही अंतर्नाद आई हा राही ॥ कुणा कळावा वा […]
घरातील सांप्रदायिक वातावरणामुळे पारमार्थिक संस्कार लहानपणापासून झाले होते. ते अलौकिक बुद्धिमत्तेमुळे विविध विषयांत पारंगत होत होते. रामचंद्रांना संस्कृत विषयात रस होता. एकीकडे त्यांचे आध्यात्मिक विषयांचे वाचन, श्रवण, मनन, निदिध्यास सुरु होते, तर दुसरीकडे त्यांच्या शैक्षणिक जडणघडणीच्या काळात पारतंत्र्याच्या जोखडाखाली सापडलेल्या भारत देशात स्वातंत्र्याचे वारे वाहत होते. तरुणाई नवचैतन्याने भारुन गेली होती. […]
अण्णाभाऊ साठे सध्या आपल्यामध्ये नाहीत परंतु त्यांचे साहित्य आज अमर आहे. साहित्यिक कधी मरत नसतो तो पुस्तक रूपाने अमर असतो. पाच वर्षांनी मंत्री संत्री बदलतील पण साहित्यिकाचे पुस्तक अथवा नाव बदलत नाही. साहित्यिकाचे नाव पिढ्यानपिढ्या जिवंत राहते वाचन संस्कृती जपत असताना. भरपूर साहित्यिकांची पुस्तके वाचाव यास मिळाली त्यापैकी अण्णाभाऊ साठे, बाबा कदम, बाबुराव अर्नाळकर, विश्वास पाटील, रणजीत देसाई, प्राध्यापक […]
पुढे पडणाऱ्या प्रत्येक पावलाला एक लयबद्ध ताल आहे जाणिवेच्या तेवत्या ज्योतीला भावनेचं संतत तेल आहे जीवनाच्या अभंगाला, मनाच्या मृदुंगाला आईचा स्पर्श आहे हरएक श्वासात, प्रत्येक निश्वासात आईचा आभास आहे मनाच्या पापुद्रयांना जपणारा नितांत विश्वास आहे हृदयाच्या स्पंदनांना, काळजाच्या वेदनांना, आईचा स्पर्श आहे. आयुष्याच्या विवंचनांची, विटंबनांची, कुचंबणांची चढाओढ आहे निर्ढावलेल्या पाषाणशिळांना उद्धाराची आतुर ओढ आहे आश्वस्त मनांना, […]
21व्या शतकात ठाणे शहराने आपले हात-पाय पसरवले. कधी काळी जंगलातून जाणारा घोडबंदर रोड आता भरवस्तीत आला आहे. या वाढत्या ठाण्यातील रसिकांच्या कलातृप्तीसाठी निर्माण झालं डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह! या सगळ्या बदललेल्या परिस्थितीत वाढलेल्या ठाण्यासाठी एक नवे सांस्कृतिक केंद्र निर्माण होणं अपरिहार्य होतं. या अपरिहार्यतेमधून 6 डिसेंबर 2012 रोजी ‘ठाणे आर्ट गिल्ड’ अर्थात TAG या संस्थेची स्थापना झाली. कलेच्या माध्यमातून कलेचा प्रसार हेच ध्येय समोर ठेवून टॅगचा जन्म झाला. अर्थात ‘ठाणे आर्ट गिल्ड’ ही संस्था केवळ कलावंतांची नसून, सर्व रसिकांसाठी आहे. […]
Copyright © Marathisrushti.com 1995-2025 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Smart Solutions