संवाद आघाडीच्या उद्योजकांशी
देशाच्या आर्थिक विकासात वेगवेगळ्या उद्योगांचा वाटा मोठा आहे. या उद्योजकांची वाटचाल कशी झाली याविषयी सर्वसामान्यांना कुतुहल असते. अनेक उद्योजकांची वाटचाल संघर्षमय होती. प्रतिकूल परिस्थितीवर मात करून त्यांनी यश मिळवले आणि देशातील आघाडीचे उद्योजक म्हणून स्थान मिळवले. अशा काही आघाडीच्या उद्योजकांशी संवाद साधून ज्येष्ठ पत्रकार वीर संघवी यांच्या लेखणीतून ‘नवभारताचे शिल्पकार’ हे पुस्तक साकारलं आहे. […]