नवीन लेखन...

अशा ह्या दोन पुजा – दुसर्‍या मित्राची पुजा

अशा ह्या दोन पुजा

१ — पुढे चालू–

दुसऱ्या मित्राची पुजा—

५              वसंतराव माझे दुसरे मित्र. त्याचे सर्व विचार पुरोगामी होते. जे जे नाविण्य समोर येत असे, ते आत्मसात करण्याचा त्यांचा प्रयत्न असे. माणसाने सतत नवीन कल्पना,           योजना यांचा प्रथम अभ्यास करावा.  होवू घातलेला बदल हा कसा आहे, यावर निरीक्षण करावे. तो फक्त केवळ बदल करावे म्हणून नसावा. कांही तरी वेगळेच करावे हा हेतू नसावा. बदलाकरीता बदल ही संकल्पना नसावी. कारण कोणतीही कित्येक वर्षे चालत आलेली कल्पना, रुढी, समज, व्यवहार याचा प्रथम अभ्यास व्हावा. काळाच्या चक्रगती प्रमाणे, वेळ, पैसा, प्रयत्न व परिणाम ह्या त्या चालू रुढीने किती व्याप्त केला, हे समजून घेतले पाहिजे. त्यामधील तत्त्वज्ञान व त्याला साध्य करण्याचा मार्ग, ह्या दोन भिन्न बाबी आहेत. ध्येय चांगले असू शकेल. परंतू त्याला प्राप्त करण्याचा मार्ग हे काळाच्या बदलाप्रमाणे बदलावेच लागतात. पूर्वी व्यवहारामध्ये गोधन, सुवर्णधन हा प्रकार असे. तो संपूर्ण बदलून गेला. व्यवहाराची कसोटी पैशावर होवू लागली. आता तर वस्तूंचे मूल्यमापन करुन त्या वस्तूंची अदलाबदल हाच व्यवहार बनू लागला. ही काळाची गरज बनू लागली. तेंव्हा जीवनाच्या चक्रगतीत बदल ही परिस्थितीची गरज बनते. मूळ हेतू, मूळ उद्देश हा धागा मात्र कायम ठेवला जातो.

मी एकदा वसंताकडे गेलो होतो,  तो बैठकीत आराम खूर्चीवर बसला होता. मला बघताच त्याने माझे स्वागत केले व बसण्यास सांगितले. आम्हास दोघांना एका कामासाठी जावयाचे होते.

“बस मी देवपुजा संपवितो. मग आपण २० मिनीटानंतर निघूत”  मी त्याची वाट बघत बसलो. परंतु वसंता तेथेच बसला होता. देवघरांत वगैरे गेला नाही. वा समोर कोणतीही मूर्ती वा देवाची प्रतीमा नव्हती. तो शांत डोळे मिटून बसला होता. त्याच्यामध्ये मला कोणत्याच हालचाली दिसल्या नाहीत. किंवा जवळपास कोणतेही दैनंदिन पुजा साहित्य नव्हते. माझे लक्ष्य त्याच्याकडे होते व त्याचे लक्ष मला माहित नाही. डोळे मिटून तो शांत होता. जवळ जवळ २० मिनिटे. नंतर त्याने चेहऱ्यावरुन देहावरुन स्वत:चा हात फिरवला व फक्त नमस्कार केला. डोळे उघडले व म्हणाला “चल आता आपण जाऊत. मी बाहेर जाण्याचे कपडे घालतो.”   मला ते सारे नाविन्य वाटले. मी तसा उत्सुक होतो.

“अरे तू देवपूजा करणार होतास ना? काय झाले त्याचे. का फक्त ध्यानच लावून बसला होतास” “नाही तीच तर माझी मानस पूजा होती. ध्यान धारणा मी सकाळी

2     उठल्यानंतर व रात्री झोपण्यापूर्वी करतो. पूजा मात्र स्नान, फराळ ही सारी दैनंदीन गोष्टी झाल्यानंतर करतो.”     मानस पूजेबद्दल तो सांगू लागला. “माझ्या मानस पूजेला कोणतेच बंधन वा नियम नाहीत. मी प्रथम माझी व घरातील इतरांची दैनंदीन सोय बघतो, जाणतो आणि नंतरच माझ्या पूजेचा आराखडा करतो. इतर सर्व बाबी प्रथम व पूजा ही संकल्पना नंतर. आपल्या सोईनुसार.  परंतु पुजा ही नियमीत, दररोज होतेच.

६            वेळेचे त्यासाठी कोणतेही बंधन घातलेले नाही. ” आधी पोटोबा आणि मग विठोबा ” म्हणतात त्याप्रमाणे. परंतु जेव्हा ते कार्य वा पुजाविधी मी हाती घेतो, तेव्हा त्या थोड्यावेळात इतर सारे विसरुन जातो. त्याक्षणी फक्त पुजेला प्राधान्य असते. बालपणापासून देवपूजेचे संस्कार पडलेले आहेत. बघून, ऐकून, वाचून इत्यादी. इतरांचे बघत आलो. वडीलधाऱ्याकडून ते करताना बघीतले. त्यांनी बरेच श्लोक, संस्कृत वाक्ये, सुभाषिते इत्यादी पाठ करवून घेतले. पूजा विधीमध्ये ते म्हटले जाई. हे सारे माझ्या अंगवळनी पडलेले होते. आता तर ते सारे सहजगत्या मुखातून येत होते. मात्र वयाप्रमाणे आजतागायात त्यांचे अर्थ समजले नाही. कळले नाही. माझ्याकडून तसा दुर्दैवाने प्रयत्नही झाला नाही. तो व्हावयास हवा.

संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज हे नितांत ईश्वर भक्त, पांडूरंग प्रेमी होते. त्यांच्या भक्ती व प्रेमाबद्दल सर्व सामान्यांना प्रचंड आदर आहे. परंतू ते पूजा विधी, कर्मकांड कधीच करीत नसे. ते फक्त मानस पूजा करीत असत. ‘मानस पूजेची’ संकल्पना त्यांच्याच अधिकार वाणी मधून सुरु झाली. सारी पूजा, सर्व पुजाविधी मनाच्या संकल्पने मधूनच करा. प्रत्यक्ष कोणतीही कृती करण्याची गरज नाही. शेवटी देह व मनाचा हा सारा खेळ असतो ना. देहाला शुचिर्भूत करा, स्थिर करा व शांत सोईच्या आसनावर बसा. जवळपास काही नको. पूजा विधी साहित्य, न समोर कोणती प्रतिमा. सारे सारे काल्पनीक असावे. परंतु मनाच्या धारणेमध्ये त्याची गुंतवणूक इतकी व्हावी की काहीही नसून, समोर सर्व काही सभोवताली आहे ही संकल्पना, हा भास व्हावा. त्यातच मन एकाग्र करावे. मनास त्या देवपूजेच्या भावनेत संपूर्ण गुंतवून टाकावे. शेवटी शारिरीक हालचाली, तुमचे दिसणारे, ऐकू येणारे हावभाव या सर्वाहून श्रेष्ठ व महत्त्वाचे असते ते तुमचे विचार व तुमच्या भावना. जर भाव तेथे देव ही संकल्पना असेल तर सर्व पूजा विधीत फक्त भाव भक्ती प्रेम याच आत्मीक बाबी  पूर्ण कराव्यात.

मानसिक पुजेतपण पंचमोचार अर्थात पाच विधी दाखविल्या आहेत. व दुसरे शेडपषोचार अर्थात १६ विधीने युक्त. प्रत्येक विधीला त्या त्या प्रमाणे मंत्र आहेत. त्यात योग्य पाठांतर, योग्य उच्चार व नंतर त्याप्रमाणे विधीपूर्वक व्हावेत ही अपेक्षा. शिवाय प्रत्येक विधीसाठी काही पदार्थांची, सामुग्रीची आवश्यकता असते. मात्र सारे काल्पनीक. ती आहेत असे समजून. जसे हळद, कुंकू, गंध, अक्षता, पंचामृत, फुले, फळे, नैवेद्य, आरतीचे सामान

3   इत्यादी सारे काही. ही पूजा दाखविण्यासाठी, बघण्यासाठी वा काहीतरी शारिरीक हालचालीने केलेली वाटू नये. खरा आनंद भक्ती-भाव प्रेम एकरुप होण्यातच मिळतो. जो  पूजेचा गाभा आहे. त्यातच शिरावे व ते मनानेच. फक्त मनानेच कल्पनेमध्ये सर्व परिपूर्णता असते. त्याला अंत नाही. जेवढे विचार, जेवढी इच्छा उत्पन्न होईल तेवढी कल्पनेने ती साकार करता येते.

७           मी वसंताला विचारले तू मानसपूजा करतो म्हणजे नक्की काय करतो.

तो सांगू लागला, या सर्व  विधीमध्ये अपेक्षा असती तुमचे भाव, भक्ती, एकाग्रता, मनाची शांतता आणि समर्पण. खरे म्हणजे सर्व पूजा कर्मकांडामधील हा दुसराच भाग अत्यंत महत्त्वाचा व पुजेचा पायाच आहे, गाभा आहे, उद्देश आहे.

मी या सर्व क्रियामधला फक्त दुसराच भागाला प्राधान्य देण्याचा प्रयत्न करतो. ईश्वराची प्रमुख कल्पना, निरगुण, निराकार, सर्वव्यापी, सर्वज्ञ अशा पद्धतीने केलेली आहे. प्रत्येकाच्या समज शक्ती व लक्ष केंद्रीत होण्यासाठी त्याला सगुण रुप दिलेले आहे. त्यातून या पूजा विधीची संकल्पना. ईश्वर जरी महान, भव्य, दिव्य असला तरी मी त्याला सखा वा मित्र समजतो. ज्यात असेल आदरयुक्त प्रेम व जिव्हाळा आपल्या कोणत्याही खऱ्या मित्रावर आपले          जसे कोणतीही अपेक्षा न बाळगता प्रेम करतो तसेच त्या ईश्वर सख्यावर प्रेम करावे. मित्र म्हटला तर त्याला आपण आपल्या घरी बोलावतो, त्याचं स्वागत करतो, त्याला योग्य आसन देतो, त्याला राहण्याचा आग्रह करतो. त्याच्या स्नानादी गोष्टीची व्यवस्था करतो, त्याला प्रेमाने कपडे देतो, अत्तर, सुवासिक गंधांनी त्याला आनंदीत करण्याचा प्रयत्न करतो, त्याला चांगले दुध देतो, त्याला उत्तम मिष्ठान्न असलेले जेवण देतो. त्याला प्रेमाने आलिंगन देतो. त्याचा सहवास सदैव लाभावा ही इच्छा व्यक्त करतो. हे सर्व साधारण प्रत्येकजण आपल्या प्रेमळ, आवडत्या मित्राबद्दल करण्यास उस्तुक असतो. त्याच्याविषयी असलेली आपली जवळीक व्यक्त करण्याचा हा प्रकार असतो. पुजाविधीमध्ये अजून दुसरे काय असते. ह्यात ही प्रथम ईश्वराला सगुण रुपात समजले जाते. त्याला सखा व प्रेमळ मित्र समजले जाते. समोर असलेली मूर्ती हीच त्या ईश्वराचे स्वरुप समजले जाते. कारण जर निर्गुण समजले तर समोर लक्ष केंद्रीत करण्यात अडचणी येतील म्हणून त्याला मूर्तीरुपी आकार दिला गेला. त्याच मूर्तीवर वर सांगितलेल्या विधीमुक्त बाबी करणेच पुजा ठरते. त्यात देण्याचे आवाहन, आग्रह, आसन, स्नान, कपडे (वस्त्र), आहार, नैवैद्य या सर्वांचा अर्थ तसाच होतो. माझ्या मानस पुजे मध्येसुद्धा हेच सारे १६ विधी असतील. परंतु सर्व काही विचार, कल्पना यांना जागृत ठेवून करावयाचे असते. देवाचीच कल्पना, आवाहनाचीच कल्पना, आसनाचीच कल्पना, फळ, पुष्प, नेवैद्य, उदबत्ती, आरती इत्यादी कल्पनेच्या राज्यातच करावयाचे असते. शिवाय जर हे कल्पनायुक्त असेल तर विचाराची झेपही आकाशाला भिडणारीच असावी. चांगले, वाहते पाणी, गंगाजल, समुद्रातील (रत्नाकर) पाणी, सर्व प्रकारची सुवासिक फुले, उत्तम आहार,

4   पंचपक्वानाचा इत्यादी जर सर्व सामुग्रीची अस्तित्व कल्पनेमधून असतील तर त्यात कोणताही कमीपणा, अडचण नसावी.

सर्व विधी व समर्पण हे विचार, कल्पना करीत भाव भक्ती व प्रेम यांनी युक्त करावे. एक वेगळाच आनंद मिळतो. या सर्व क्रियांमध्ये विचारांपेक्षा भावनेला जास्त समर्पित करावे.

८            मानसपुजेचा हाच तर गाभा असेल. फक्त आनंद व समाधान प्रत्यक्ष विधी विरहीत. मात्र सारे सारे तेच तसेच. सर्वात सर्वात महत्त्वाचे म्हणजे ती मानस पुजा तुम्ही त्या निरगुण, निराकार, सर्वसाक्षी, सर्वव्यापी, अनंत अशा मूळतत्त्वाला समर्पित करणार. त्यातून त्यांच्या मनाला पटेल तेच व्यक्त करीत पुढे जाणार.

देवपुजे विषयी वसंतराव पुढे सांगु लागले.

देवपुजा याचा मूळ गाभा कोणता तर त्या ईश्वरीशक्तीला आदर, सत्कार, भक्ती हे समर्पण करणे. ईश्वराविषयी प्रेम व्यक्त करणे. त्याच्यासमोर अहंकाराच्या भावनांची थोडी देखील छाया पडता कामा नये. जे मानवी षड्‍रिपू आहेत ते मानसाच्या मनावर ताबा करुन असतात. त्यांना दूर सारुन केवळ प्रेम व भक्ती याचा संगम करण्याचा प्रयत्न असावा. हीच भावना त्या ईश्वराचे चरणी अर्पित व्हावी. हा मूळ हेतू असावा. तुमचे मन, तुमचा विचार, तुमच्या भावना ह्या तो तुमच्यापेक्षाही सूक्ष्म रितीने जाणतो. तोच तर त्याचा करता करविता आहे ना! त्याला तुमच्या श्वासापासून प्रत्येक हालचालीची संपूर्ण जाण असते. त्याला काहीतरी देण्यासाठी गळ घालतात. कोणताही विचार वा भावना यांची पूर्तता करण्यासाठी विनवितात. आपण करीत असलेली भक्ती, पूजा, आदर हे पणाला लावतात. केल्या गेलेल्या सेवेचे मूल्य त्याच्याकडून मागतात.  काहीतरी भौगोलिक, वस्तूनिष्ठ वा संसारिक गोष्ट मिळावी हाच त्यांचा अट्टाहास असतो. सुदैवाने काही मिळाले तर आनंदीत होतात व जर न मिळाले तर निराश होतात. बोल देखील लावतात. काही तर त्याला नावे ठेवून तो दयाहीन असल्याचा ठपका पण ठेवतात. ही सारे मानवी विचारांची मानसिकता असते.  ईश्वर हा काही न मागताच योग्य ते देतो.

ईश्वरी पूजेचा हेतू काही का असेना एक मात्र होण्यास मदत होते.  ते म्हणजे मनावर चांगले संस्कार होण्याची शक्यता असते. मानवी षडरिपूना  ईश्वर प्रेम भक्ती ही सतत दाबून ठेवीत असते.

देवपूज ही मनातून अंतरात्म्यातून उत्पन्न व्हावी लागते. It Should be from the bottom of heart.  वरवरचे, देखाव्याचे नसावे. तरच त्या भक्तीच्या प्रेमाच्या लहरी, त्यांच्यापर्यंत हलक्या होऊन वर जातात. मात्र जेव्हा त्यामध्ये देखाव्याची सुप्त भावना, उद्देश, मागणी, हेतू इत्यादी असतात, त्या लहरी जड होतात.  व तुमच्याच देहाभवती घुटमळत राहतात. कशा त्या जडत्व प्राप्त लहरी ईश्वराकडे जातील. तुमच्या मग तो प्रयत्न

5     कोणतीही साध्य न होणारी साधना बनते. फक्त वेळेचा व आयुष्याचा एक प्रकारे अपव्यय होतो. दुर्दैवाने याची जाणीव त्या व्यक्तीला केव्हाच येत नाही. त्याचे सारे श्रम वाया जातात. तो एखाद्या घान्याच्या बैलाप्रमाणे फक्त चक्रगतीने त्याच जागेवर फिरत राहतो. प्रवास खूप पण जेथल्या तिथेच. हाती केलेल्या श्रमाचे कोणतेच साध्य मिळत नाही.

९         ईश्वराला आपला सखा समजा. हेच तर धनुर्धर अर्जून समजत होता. श्री कृष्णाच्या देवत्वाची महानतेची, दिव्यत्वाची त्याला संपूर्ण जाणीव होती.  आणि तरीही तो श्रीकृष्णाला आपला सखा अर्थात मित्र समजत होता. हेच प्रेमाचे नाते त्याला मानसिक व दैवीक बळ देत होते. तो त्या ईश्वरावर जसे प्रेम करी, तसाच त्रागा वा राग पण व्यक्त करी. हेच खरे प्रेमाचे बंधन होते. प्रत्येकजण आपल्या आईला अशाच प्रेम बंधनाच्या नात्याने संबोधीत असतो. ज्यामध्ये असते प्रेम, अधिकार, आदर व हक्क ह्या समीश्र भावना. खरे आणि खूप खोलवर रुजलेले हे जिव्हाळ्याचे संबंध असतात. असेच आपले संबंध, त्या ईश्वराकडे बघण्याचा दृष्टीकोण असाच असावा. ही भावना आदराबरोबर जवळीकपणा निर्माण करते.

ही तर न संपणारी कथाच असेल ना?

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

bknagapurkar@gmail.com

 

 

 

 

 

 

 

Avatar
About डॉ. भगवान नागापूरकर 2132 Articles
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..