नवीन लेखन...

अर्जुनने घडवला इतिहास

विडहॅम चॅम्पियनशिप गोल्फ स्पर्धा जिकून अर्जुन अटवाल युएस पीजीए टूर जिकणारा पहिला भारतीय गोल्फपटू ठरला आहे. त्याने तीन शॉट्सनी आघाडी घेऊन अंतिम फेरीत प्रवेश मिळवला. गेल्या वर्षी दुखापतीमुळे अर्जुनला युएस पीजीए टूरमध्ये अपयश आले होते. यंदा नेटाने खेळ करत त्याने यशावर शिक्कामोर्तब केले. फ्लोरिडामध्ये राहणार्‍या अर्जुन अटवालला टायगर वुड्सकडून मोलाचे मार्गदर्शन मिळाले आहे.

गेल्या काही दिवसांमध्ये भारतीय क्रीडाक्षेत्राला सुवर्णयश अनुभवायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी तेजस्विनी सावंतने जागतिक नेमबाजी स्पर्धेत प्रोन प्रकारात सुवर्णपदकावर शिक्कामोर्तब करत देशाची मान उंचावली. जागतिक क्रमवारीत दुसरा क्रमांक पटकावणारी सायना नेहवाल करोडो भारतीयांच्या अपेक्षा घेऊन जागतिक बॅडमिटन स्पर्धेत उतरली आहे. यापाठोपाठ अर्जुन अटवाल या गोल्फपटूने भारतीय क्रीडाक्षेत्राच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला. त्याने विडहॅम चॅम्पियनशीप ट्रॉफी जिंकत विक्रम केला. अमेरिकी पीजीए टूर किताब पटकावणारा अर्जुन पहिला भारतीय गोल्फपटू ठरला. भारतासाठी इतिहास रचणार्‍या अर्जुन अटवालने एलिट टूरचे कार्ड मिळवले.खराब कामगिरीमुळे पहिल्यांदा अर्जुन अटवाल पीजीए कार्डमधून बाहेर पडला होता. मात्र, अंतिम सामन्यात तीन शॉटची आघाडी घेऊन तो स्पर्धेत परतला आणि या संधीचे त्याने सोने केले. ‘युएसए पीजीए टूर’च्या विजेतेपदाबरोबरच त्याने ९,१८,००० डॉलरचे बक्षिस मिळवले. भारतीय खेळाडूने मिळवलेले हे दुसर्‍या क्रमांकाचे जास्त किमतीचे बक्षिस आहे. याआधी विश्वनाथन आनंदला २०१० च्या जागतिक बुद्धिबळ स्पर्धेमध्ये १.२ मिलियन डॉलर्सचे बक्षिस मिळाले होते. त्यानंतर अर्जुनने बाजी मारली आहे. विशेष म्हणजे सेजफील्ड कंट*ी क्लबमध्ये मिळालेल्या यशामुळे या वर्षातील पीजीए टूर आणि पुढील दोन वर्षांमधील पीजीए टूरमध्ये अर्जुनला थेट प्रवेश मिळणार आहे. अटवालचा संघसहकारी जीव मिल्खा सिगनेही स्पर्धेचा शेवट चांगला केला. त्याने या स्पर्धेत १८ वे स्थान पटकावले. ओरॅलँडोस्थित अटवाल पात्रता फेरीतून पीजीए टूर जिकणारा गेल्या २४ वर्षांमधील पहिला खेळाडू ठरला आहे.

या आधी फ्रेड वॅड्सवर्थने १९८६ मध्ये सदर्न ओपनमध्ये ही कामगिरी केली होती.विडहॅम चॅम्पियनशिप गोल्फ स्पर्धा कल्यानंतर अर्जुन अटवालचा आनंद गगनात मावत नव्हता. यशाबद्दल आनंद व्यक्त करताना अर्जुन म्हणाला, ‘माझा अजूनही या घटनेवर विश्वास बसत नाहीये. ही स्पर्धा जिकण्याचे स्वप्न मी गेल्या तीन वर्षांपासून पाहत होतो. या यशामुळे माझे स्वप्न पूर्ण झाले आहे. यश मिळत नव्हते तोपर्यंत आपल्या स्वतःकडून काही अपेक्षा असतात. आज या अपेक्षा पूर्ण झाल्या आहेत. वास्तविक, तीन शॉटने आघाडी घेतल्यानंतरही मी यशाबद्दल साशंक होतो. त्यामुळे नैराश्यही आले होते. मात्र, विजेतेपदामुळे निराशेचे सावट पूर्णपणे नाहीसे झाले.’ आतापर्यंत अर्जुन अटवालने आशियाई, युरोपियन आणि राष्ट*ीय स्पर्धा जिकल्या आहेत. या स्पर्धांच्या निमित्ताने अर्जुनने या आधीही यशाची चव चाखली आहे. मात्र, विडहॅम चॅम्पियनशिप गोल्फ स्पर्धेतील यशाचा आनंद काही वेगळाच आहे.गेल्या वर्षी एका अपघातामध्ये जखमी झाल्याने अर्जुन अटवालला युएस पीजीए टूरमध्ये सहभागी होता आले नव्हते. गेल्या महिन्यातही दोन्ही खांदे दुखावल्याने त्याला या स्पर्धेपासून दूर रहावे लागले होते. या पार्श्वभूमीवर यंदा मिळालेल्या यशामुळे अर्जुनला खूप आनंद झाला आहे. प्रतिक्रिया व्यक्त करताना तो म्हणतो, ‘अडथळे आणि यश यामध्ये एक पुसटशी रेष असते. ती रेष ओळखत मात करता आली तर यश आपलेच असते. मला आजपर्यंत बर्‍याच दुखापतींचा आणि अडचणींचा सामना करावा लागला. त्यातूनच मी शिकत गेलो. इतर क्रीडाप्रकारांच्या तुलनेत गोल्फमध्ये पराभवाचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे पराभव कसा पत्करायचा हे माहित नसेल तर गोल्फ या खेळाचा त्याग करणेच योग्य ठरेल.’ गेल्या महिन्यात पीजीए टूरमध्ये आलेल्या अपयशाबद्दल अर्जुन म्हणतो, ‘गेल्या महिन्यात अपयश आल्यामुळे मी खचलो होतो. खांदेदुखी पूर्ण बरी झालेली नसतानाही स्पर्धेत सहभागी झाल्याचा मला पश्चाताप झाला. पण, नैराश्य झटकून नव्या  प्रयत्न सुरू करण्याचे ठरवले आणि यशाचे ध्येय गाठण्याचा प्रयत्न केला. प्रत्येक वेळी मला माझ्या खूप चांगली मैत्रीण असलेल्या पत्नीची, सोनाची साथ लाभली. तिने मला भूतकाळ विसरून वर्तमानात जगायला शिकवले.’अर्जुन अटवालचा जन्म २० मार्च १९७३ मध्ये पश्चिम बंगालमधील असानसोल येथे शिख कुटूंबात झाला. वयाच्या १४ व्या वर्षापासूनच त्याने रॉयल कोलकाता गोल्फ क्लबमध्ये गोल्फ खेळायला सुरूवात केली. त्याचे दोन वर्षे शालेय शिक्षणासाठी अमेरिकेला गेला होता. तिथे अर्जुनने ट*ेस्पर क्लार्क हायस्कुलमध्ये शिक्षण घेतले. या काळात त्याने गोल्फमधील बारकावे समजून घेतले आणि याच खेळामध्ये कारकीर्द करण्याचा निर्णय घेतला. आई-वडिलांनीही त्याच्या या निर्णयाला पाठिबा दिला. १९९५ मध्ये अर्जुन अटवालने व्यावसायिक कारकिर्दीला सुरूवात केली. काही काळातच आपल्या खेळातील कौशल्याने त्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. २००२ मध्ये त्याने कॅलटेक्स सिगापूर स्पर्धेत विजेतेपद पटकावले. २००३ मध्ये हिरो होंडा मास्टर्स स्पर्धा जिकत मिलियन युएस डॉलर्सचे बक्षिस मिळवणारा तो पहिला भारतीय ठरला. जीव मिल्खा सिगनंतर युरोपियन टूरचे सदस्यत्व मिळवणारा अर्जुन दुसरा भारतीय गोल्फपटू होता.२००३ मध्ये कार्ल्सबर्ग मलेशियन ओपन स्पर्धा जिकत त्याने दुसरी युरोपियन टूर जिकली. त्यानंतर त्याची घोडदौड आजपर्यंत अविरत सुरू आहे.युएस पीजीए टूरमधील यशामुळे अर्जुनच्या घोडदौडीत भर पडली आहे. ५० वर्षांची परंपरा असलेली ही जगातील सर्वात प्रतिष्ठेची टूर मानली जाते. अर्जुन अटवाल कोलकात्यामध्ये लहानाचा मोठा झाला असला तरी सध्या तो फ्लोरिडामध्ये राहतो. तिथे गोल्फ जगतातील सम्राट टायगर वुड्स त्याचा शेजारी आहे. आयसेलवर्थ क्लबमध्ये ते दोघे एकत्र सराव करतात. अर्जुनला टायगर वुड्सकडून सतत मोलाचे मार्गदर्शन मिळत. या यशामध्येही त्याचा मोलाचा वाटा असल्याने अर्जुन सांगतो. या यशामुळे जागतिक क्रमवारीत अर्जुनने ४५० व्या क्रमांकावरून १८२ व्या क्रमांकावर उडी मारली आहे. विडहॅम चॅम्पियनशिप गोल्फ स्पर्धेतील यशानंतर अर्जुन अटवाल पुढील आठवडा कुटूंबाबरोबर व्यतीत करणार आहे. त्याला कुटुंबियांबरोबर यशाचा आनंद साजरा करायचा आहे.

फॅक्ट फाईल – अर्जुन अटवाल

  • १९९९ – ‘विल्स इंडियन ओपन’ मध्ये आशियाई टूरमधील पहिले विजेतेपद
  • २००३ – ‘फिनिक्स डिनॅस्टी कप’च्या वेळी आशियाई संघाचे सदस्यत्त्व.
  • २००३ – ‘एशियन टूर ऑर्डर ऑफ मेरिट’ किताब जिकला.
  • २००४ – युएस पीजीए टूरचे कार्ड मिळवणारा पहिला भारतीय गोल्फपटू.
  • २००५ – गोल्फच्या विश्वकरंडक स्पर्धेत ज्योती रंधवाबरोबर भारताचे प्रतिनिधित्त्व केले. स्पर्धेत भारताला नववे स्थान.
  • २००५ – ‘बेलसाऊथ क्लासिक’चे जेतेपद पटकावत पीजीए टूरमध्ये सलग यश मिळवण्याची कामगिरी.
  • २००६ – एचएसबीसी चॅम्पियनशिपमध्ये १२ वे स्थान.
  • २००८ – ‘मेबँक मलेशियन ओपन’ चे विजेतेपद.
  • २०१० – टेविस्टॉक चषकात दुसर्‍या क्रमांकाचे स्थान पटकावले.

 

— संचेती सातपुते

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..