नवीन लेखन...

अनुभूती

आणि एका रात्री अचानक, तब्येत बिघडली आहे, तू लगेच ये असा त्यांचा मला फोन आला होता. पण दुर्दैवाने मी पोचण्यापूर्वीच त्यांनी या जगाचा निरोप घेतला होता. ह्याच सगळ्या आठवणींनी माझ्या मनाची चलबिचल झाली होती आणि रस्ता संपता संपत नव्हता.

खरे तर आज आम्ही सगळे म्हणजे मी, सुधीर, वाहिनी व मुले बरोबरच होतो. सुधीरने गावातल्या वृद्धाश्रमाला काका-काकींच्या नावे भरपूर देणगी दिली होती. गावातल्या शाळेमध्ये मुलांसाठी बारा computers दिले होते. कित्येक वर्षानंतर तो जवळजवळ महिनाभर गावात राहिला होता. सगळ्या बँकांची कागदपत्रे, इतर प्रॉपर्टीचे कागद त्याच्या नावावर करून घेत होता. बहुतेक रोज रात्री आम्ही भेटतच होतो. जुन्या आठवणी काढून गप्पात रंगून जात होतो. वृध्श्रामामध्ये आणि शाळेमध्ये त्याने जे काही दान केले होते त्यासाठी गावातल्या लोकांनी आज त्याचा सत्कार केला होता. त्याच्या अनुपस्थितीमध्ये ह्या दिलेल्या रकमेचा किंवा वस्तूंचा योग्य वापर होतो आहे ह्यावर देखरेख ठेवण्याचे काम मी आणि मीनलने करण्याचा त्याने निर्णय घेतला होता. त्यासाठी जरुरी असलेल्या पेपर्सवर सह्या करण्यासाठी आम्ही दिवसभर एकत्रच होतो आणि तसा तो खूष दिसत होता. मग अचानक काय झाले असावे? असा विचार माझ्या मनात सारखा डोकावत होता.

समोरच्या घरात दिसणाऱ्या लाईटच्या उजेडाने माझ्या विचारांची शृंखला तोडली. मी घाई-घाईने गाडीतून उतरून दाराकडे जवळ-जवळ धावतच गेलो. सुधीरनेच दार उघडले. त्याला पाहिल्यावर मला एकदम हायसे झाले.
काय रे काय झाले? मी विचारले.

काही समजत नाही परंतु खूप अस्वस्थ झालो आहे. झोपही येत नाही. असे कधीच झाले नाही म्हणून तुला फोन केला. सुधीर म्हणाला.
ठीक आहे, चल बघू या झोप इथे. मी म्हणालो. राजू visit bag घेऊन आलाच. सुधीरला व्यवस्थित तपासले. थोडे B.P. जास्त होते, पण इतकेही जास्त नव्हते की ज्यामुळे तो अस्वस्थ होईल. मी विचार करत होतो, ह्याला काय झाले असावे? आता जवळ-जवळ पहाटेचे पाच वाजले होते. वाहिनी म्हणाल्या, जरा गरम चहा करून आणते. तो प्यायल्यावर याला बहुतेक बरे वाटेल. एवढा वेळ त्याने मला इथून हलूनच दिले नाही. तुम्ही आता त्याच्याजवळ बसा मी येते. असे म्हणून त्या किचनमध्ये गेल्या.

माझे सुधीरच्या डोळ्यांकडे लक्ष गेले. ते पाण्याने भरलेले होते. चेहरा देखील उतरून गेलेला दिसत होता. मी विचारले, सुधीर नेमके काय होत आहे तुला? मला इतका problem दिसत नाही. पण तुला तसे काही वाटत असेल तर आपण हॉस्पिटलला जाऊ या.

नाही रे तसे नाही, पण आईबाबांची खूप आठवण येते. असे म्हणून तो रडायलाच लागला. अचानक हे बघून मी स्तब्धच झालो. त्याच्या पाठीवर हात ठेवत त्याला म्हणालो, शांत हो. हे अगदी स्वाभाविक आहे. बस इथे. वाहिनी चहा घेऊन आल्या आहेत, आपण चहा घेऊ या.

वहिनिंनी आणलेला चहा आम्ही तिघांनी बसून शांतपणे घेतला. आता जरा सुधीर शांत झाला होता. डोळ्यातले अश्रू पण कमी झाले होते. मनाने ही थोडा मोकळा झाला होता.

बघ ना सचिन, आज आईबाबा नसताना मी कामे पूर्ण करण्यासाठी महिनाभर इथे राहिलो आहे रे. आई डोळ्यात पाणी आणून बोलवत होती तेंव्हा मला कधी कळलेच नाही कि आईबाबांना माझ्या इथे त्यांच्या सोबत राहण्याने किती आनंद झाला असता. कदाचित त्यांच्या उतारवयातील आयुष्यात ते सगळ्यात जास्त आनंदाचे क्षण असते. त्यांच्या जीवात जीव होता तो पर्यंत माझ्यासाठी त्यांनी इथली एक-एक वस्तू सांभाळली. अरे, काल कपाट साफ करताना माझा लहानपणीचा स्वेटर, शाळेचा युनिफोर्म, मी लहानपणी काढलेली चित्रे, कितीतरी वस्तू व्यवस्थित ठेवलेल्या मिळाल्या. आणि हा बघ, हा बॉल आठवतोय तुला, ह्याने आपण खेळत होतो. असे बोलत तो आतल्या खोलीतून पिवळ्या रंगाचा टेनिस बॉल घेऊन आला. त्या हातातल्या बॉलकडे पाहून त्याला अश्रू अनावर होत होते. मी आणि वाहिनी शांतपणे त्याच्याकडे बघतच होतो. वाहिनी त्याला काहीतरी समजविण्याचा प्रयत्न करणार इतक्यात मी त्यांना डोळ्यांनीच शांत बसा, काही बोलू नका असे खुणावले.

डोळे पुसता पुसता त्याने परत बोलावयास सुरवात केली, पाहिलेस सचिन, माझ्या सगळ्या आठवणी ते सांभाळून ठेवत होते आणि मी….. माझ्या मधेच इतका मग्न होतो की त्यांच्याजवळ माझे येऊन रहाणे किती आवश्यक होते ह्याचा विचार देखील केला नाही. माझ्या दृष्टीने त्यांना पैसे पाठवणे महत्वाचे वाटत होते. लहानपणी पाहिलेले बाबांचे ते कष्ट डोळ्यासमोर सतत उभे राहायचे. आणि आईची घर चालवताना होणारी तारांबळ दिसत राहायची. म्हणून खूप पैसे पाठवत होतो. एकाच विचाराने, की माझ्या आईबाबांना कष्ट पडू नयेत. अरे सचिन, काय सांगू तुला, आज हे सगळे पैसे मी जे दान केलेत ना, ते सगळे पैसे मी त्यांना पाठवलेले होते. बँकेत ते तसेच जमा होते. शिवाय ह्या बघ ह्या समोर सगळ्या F.D. दिसत आहेत ना त्या, हे घर, ती मामाची शेताची जागा हे सगळे ते माझ्यासाठी ठेऊन गेलेत. अरे स्वयंपाकवाल्या मावशी सांगत होत्या, बाबा त्यांना सांगत होते की त्यांच्या नंतर मला सख्खे कोणी नाही आणि मला काही लागले तर मी कुठे जाईन? हा विचार करूनच हे सगळे त्याच्यासाठी ठेवतोय. देव करो, त्याला आमच्यासारखे कष्ट ना पडो. आणि मी, मी का नाही असा विचार केला की मी त्यांचा एकाच मुलगा आहे. मी जर त्यांच्याजवळ राहिलो नाही तर त्यांच्याजवळ कोण राहील? कोणाला ते सुधीर म्हणून हाक मारतील? असे बोलत तो खिडकीजवळ जाऊन उगवत्या दिवसाची वाट बघत उभा राहिला. डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहात. मी स्तब्ध होऊन ऐकत होतो. वहिनींच्या डोळ्यातून देहील अश्रुधारा वाहत होत्या.

पाच-दहा मिनिटाने माझ्याजवळ बसून परत त्याने बोलायला सुरुवात केली, बघ सचिन, आत्ता ह्या क्षणी माझ्याकडे हे सगळे आहे.पण ते दोघे नाहीत. त्यांच्या न होण्याचे दुःख मला खूप जाणवते आहे. त्यांना सुद्धा असेच झाले असेल का रे? त्यांच्या जवळ देखील हे सगळे होते परंतु मी नव्हतो. आज मी माझी ही व्यथा तुम्हा दोघांजवळ बोलत आहे, त्यांनी कोणाला सांगितले असेल रे? आणि परत त्याचे डोळे भरून आले. मी आणि वाहिनी शांतपणे त्याच्याकडे बघत होतो. त्याला समजाविण्याची अमच्य दोघांचीही मनस्थिती नव्हती.

कोकिळेच्या कुहू-कुहू आवाजाने पाहत झाल्याची चाहूल दिली होती. थोड्याच वेळात झाडावर पक्षांचा किलबिलाट सुरु झाला होता. सूर्याची कोवळी किरणे खिडकीतून घरात प्रवेशली होती. कावळे कर्कश्य आवाजात काव-काव ओरडत होते. रात्रीची भयाण शांतता संपुष्टात आली होती.

हळूहळू सुधीरही सावरत होता. मी आता परत गेल्यानंतर माझ्या आजूबाजूच्या सगळ्या लोकांना माझ्या मनाची परिस्थिती सांगणार आहे. मी आयुष्यात किती मोठा failure आहे याचे उदाहरण देणार आहे. माझ्यासारखी चूक त्यांच्याकडून होऊ नये एवढीच इच्छा. आणि मी निश्चय केला आहे, शक्य तितक्या लवकर मी इथे परत निघून येणार आहे. माझ्या मुलांच्या वागण्यात अशी चूक होऊ नये असा प्रयत्न मी जरूर करीन. सचिन, मी नक्की परत येईन. तू इथेच असशील, आपण परत आपल्या जुन्या दिवसांची आठवण करुन इथेच जगू या. निदान आईबाबा जिथे असतील तिथून मी घरी परत आलो हे बघून खूष होतील. असे म्हणत डोळ्यातील आसवांसकट थोडासा हसला.
तितक्यात मीनलचा फोन आला. ती काळजी करत होती. घड्याळात पहिले, सात वाजले होते. तिला फोनवर सांगितले, काळजी करू नकोस, आमच्या सगळ्यांचाच ब्रेकफास्ट तयार कर आम्ही सगळे घरीच येतो. सुधीर नाही म्हणत होता पण तसाच जबरदस्तीने त्यांना सगळ्यांना बरोबर घेऊन घरी आलो होतो,
आमच्या सगळ्यांच्या गप्पा-गोष्टीत तो रात्रीचे दुःख बहुतेक विसरला असावा. नंतर तो घरी गेल्यावर शांत झोपला होता. वहिनींचा तसा फोन आला होता.

सकाळच्या त्या सगळ्या गोंधळात रात्री काय घडले हे मीनल बरोबर बोलताच आले नव्हते. clinic ची वेळ झाल्यामुळे तयार होऊन सरळच clinic मध्ये पोहोचलो.

दुपारी clinic मधून घरी येताना मी मीनलचे नागपूरचे तिकीट काढून घेऊन आलो. तिच्या हातात ते दिल्यावर ती माझ्याकडे, हे काय? अशा प्रश्नार्थक नजरेने बघू लागली.

मी तिला म्हणालो, मीनल तुला तुझे आईबाबा किती दिवसांपासून बोलवत आहेत ना, जा त्यांच्याजवळ ८-१० दिवस तरी राहून ये. इथे मी आणि राजू दोघे मिळून मुले आणि आईबाबांना manage करतो. Go & enjoy.

ती एकदम खुदकन हसली आणि तिचे डोळे आनंदाने चमकले. पण तिच्या त्या मोठ्या मोठ्या काळ्याभोर डोळ्यातले कुतूहल मात्र तसेच कायम होते. माझ्या या अचानक झालेल्या हृदय परिवर्तनाचे कारण तिला समजत नव्हते.

सौ वैजयंती गुप्ते.
9638393779.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..