Web
Analytics
अनुभवाचे शहाणपण – Marathisrushti Articles

अनुभवाचे शहाणपण

बदलून गेले जीवन   अर्थ कळल्यानंतर
परिस्थितीची आली जाण   जाग आल्या नंतर  ।।१।।

श्रीमंतीच्या नादानें   ऐषआरामी झालो
पैशाच्या गर्वाने   माणुसकी विसरलो   ।।२।।

तारुण्यातील उर्मीने   अहंकारी बनविले
शरिरातील गुर्मीने   निर्दयी मज ठरविले   ।।३।।

धंद्यामध्ये येता खोट   निराश अति झालो
गरिबीची चालतां वाट   प्रेमळ मी बनलो   ।।४।।

देह बनला दुर्बल   विकार तो जडूनी
जर्जर- पिडीतां बद्दल   सहानुभूती आली मनी   ।।५।।

अनुभवासारखा   शिक्षक नाहीं कुणी
शहाणा करी अनेका   परिस्थीती समजावूनी   ।।६।।

डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com

About डॉ. भगवान नागापूरकर 1331 Articles
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

कोकणचा मेवा – टिकाऊ पदार्थ

ताज्या कोकणी मेव्याची चव अनुभवणे ही पर्वणीच असते. मात्र वर्षभर ...

कोकणचा मेवा – जामफळ

उन्हाळ्यातील उष्णता कमी करण्यासाठी निसर्गत: डोंगर उतारावर येणारे फळ म्हणजे ...

कोकणचा मेवा – फणस

प्रवासात सामानाचे वजन वाहून नेतांना कष्ट पडतात. पण कोकणातला फणस ...

कोकणचा मेवा – जांभूळ

कोल्हापूरकडे जातांना आंबा घाटाच्या परिसरात जांभळाची झाडे अधिक प्रमाणात आहेत ...

Loading…