नवीन लेखन...

अमेरिकन जीवनशैली : १

पहाटेचे चार वाजले आहेत. झोप झाली आहे. इथे येऊन आठवडा झाला आहे. जेटलॅगचा त्रास अजून होत आहे. वेळी अवेळी डोळे चुरचुरू लागतात. विलक्षण दुखू लागतात. झोप अनावर होते. इथल्या निसर्गचक्राशी शरीराने अद्याप जुळवून घेतलेले नाही. ते एकदा झाले की हा त्रास थांबेल. समर सुरू होण्यापूर्वी आम्ही इथे आलो आहोत. इथले हवामान लहरी आहे. परवा थंडगार वारे सुटले होते. बोचरे वारे वाहात होते. बॅकयार्ड मध्ये सारा कचरा वाऱ्याबरोबर फिरत होता. दार उघडून बाहेर जावे असे चुकूनही वाटत नव्हते. काल हवा बदलली. उकाडा जाणवू लागला. पण काही वेळच. मुंबई सारखे इथे नाही. आता तिथे उन्हाळा असह्य होत असेल. तापमान मापकाचा पारा चढत आहे. सकाळी नऊ नंतर अंगातून घामाच्या धारा वाहू लागतात. पंखे अपुरे वाटतात.. आणि इथे त्याच्या अगदी उलट.

तिथे पहाटे पाचपासून शहराला जाग येते.. दूधवाले, पेपरवाले, गाड्या पुसणारे, चाकरमानी, विद्यार्थी, जॉगिंग करणारे – साऱ्यांची लगबग सुरू होते. झाडझुडपांमधील पक्षी मंजुळ सूरात गाऊ लागतात, दूरवर कोंबड्याने दिलेली बांग ऐकू येत असते. मशिदीवरील लाऊड स्पीकरवरून मौलवीचा आवाज घुमू लागलेला असतो. वातावरणात भिन्नभिन्न आवाज उमटत असतात आणि कोलाहल क्रमश: वाढत जाणारा असतो. या साऱ्याचा आपल्याला जन्मापासून सराव असतो, नव्हे तो आपल्या जगण्याचा अतूट भाग असतो.

इथे ते काही काही नाही. रस्त्याच्या दुतर्फा इतकी वाहने पार्क केलेली. पण कुठूनही त्यांचा “फर्रर्र” अवाज नाही. सभोवती इतके टुमदार बंगले, पण माणसं दिसत नाहीत. सर्वत्र डोळ्यांना सुखावणारी हिरवळ.. इथे अतिशय स्वच्छता आणि निसर्गाचा, वनस्पतींचा काहीसा उग्र वास..

या शांततेची, या वातावरणाची आपल्याला सवय नाही.

मन असे बेचैन होते आहे…

— डॉ. अनंत देशमुख

(अनघा प्रकाशन ने प्रकाशित केलेल्या ओ अमेरिका ह्या पुस्तकामधून)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..