नवीन लेखन...

अभ्यागत !

मी कापूरबावडी पोलीस स्टेशनला प्रभारी अधिकारी असतानाची गोष्ट आहे.

त्या वेळी ठाण्याच्या घोडबंदर रोडला वस्ती अतिशय कमी होती. आजच्या सारखे कॉक्रीटचे जंगल माजलेले नव्हते. घोडबंदर रोडच्या एका बाजूस डोंगर व दुसऱ्या बाजूस खाडी पसरलेली आहे. डोंगराकडील कोकणी पाडा पासून पुढे बोरिवलीचे राष्ट्रीय अभयारण्य सुरु होते. त्यामुळे तेथील वाघ तसेंच बिबटे अशा वन्य प्राण्यांचा घोडबंदर रोड व त्याच्या परिसरात मुक्त संचार असे. अगदी कोलशेत खाडी तसेंच बाळकुम, माजीवाडा गावा पर्यंत रात्रीचे वेळी सह-कुटुंब फेर-फटका मारीत असत. सरकारनेच त्यांना बहाल केलेल्या अभयारण्याच्या लगतच हा टापू असल्याने दिवसा ढवळ्या देखील त्यांचा वावर राजरोस पणे सुरु असे.

घोडबंदर रोडला लागूनच परम पूज्य श्री. पांडुरंग शास्त्री आठवले गुरुजी यांनी स्थापन केलेले तत्वज्ञान विद्यापीठ आहे. विद्यापीठ परिसर विस्तीर्ण असून चारी बाजूंनी १५ फुट उंचीच्या कुंपणाने बंदिस्त आहे. विद्यापीठास एकच मुख्य दरवाजा आहे. त्याचे मागील बाजूस आदिवासी वस्ती प्रमुख असलेला कोकणी पाडा हा डोंगरी भाग सुरु होतो.

एके दिवशी सकाळी ६ वाजताच्या सुमारास मला पोलीस स्टेशन मधून ठाणे अमलदाराचा फोन आला. त्याने पोलीस स्टेशन हद्दीतील तत्वज्ञान विद्यापीठात एक वाघ घुसला असून तेथे एकच हलकल्लोळ झाला असल्याचे कळविले. संबंधित वन अधिकाऱ्यास देखील ही माहिती देण्यास तो चुकला नव्हता. मी त्यास ताबडतोब विद्यापीठाच्या प्रवेश द्वारावर पोलीस बंदोबस्त पाठवून बाहेरच्या कोणालाही आत सोडू नका असा आदेश दिला. मी लगेच जागेवर जात असून तेथे दोन पोलीस अधिकारी व निवडक ५ जणांचे हत्यारबंद पथक पाठविण्यास सांगितले.

अर्ध्या तासाच्या आतच मी तत्वज्ञान विद्यापीठात पोहचलो. विद्यापीठाच्या प्रवेश द्वाराजवळ नीट बंदोबस्त लावला. तेथे आधीच पोहोचलेल्या दोन अधिकारी व ५ कर्मचाऱ्यांच्या निवडक हत्यारबंद पथकासह मी विद्यापीठात शिरलो. तेथील व्यवस्थापकांनी मला सांगितले की सकाळी पाच वाजता एका वर्गात विद्यार्थी अध्यापनासाठी जात असता वर्गाचे दार उघडताच आतून अचानक एका वाघाने बाहेर झेप घेतली. त्यामुळे विद्यार्थ्यांची एकच घाबरगुंडी उडाली असून त्या वाघाची तेथे दहशत पसरली आहे. तो वाघ अजूनही आवारातच आहे असेही सांगितले.

सदर विद्यापीठास आधी वर्णन केल्या प्रमाणे एकच जाण्या-येण्यासाठी प्रमुख दरवाजा असून १५ फुटी भिंतीच्या कुंपणाने बंदिस्त आहे. विद्यापीठ परिसर भव्य असून अनेक वनस्पतीने व मोठ मोठ्या वृक्षांनी व्यापलेला आहे. आवारात सर्वत्र जवळ जवळ ४ फुट उंचीचे गवत वाढलेले होते. विद्यापीठात जगभरातून येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी भोजन व निवासाची चांगली सोय आहे. विद्यार्थ्यांच्या अध्यापनासाठी अनेक बैठे वर्ग बांधलेले आहेत. विद्यापीठात त्यावेळी अंदाजे १५० तरी विद्यार्थी शिक्षणासाठी रहात होते.

हा वाघ आदले रात्री विद्यापीठाच्या उत्तर-पूर्व भागातील कोपऱ्यातल्या खचलेल्या भिंती वरून आत आला असावा असा अंदाज होता.

मी तेथे पोहचलो तेंव्हा मला असे दिसले की विद्यापीठातील विद्यार्थी ज्यात तरुणांचाच भरणा जास्त होता, ते विद्यापीठाच्या आवारात चारी बाजूने लाठ्या-काठ्या घेउन पेटत्या मशाली सह थाळ्या वाजवून दगडफेक करीत वाघाची हाकाटी करीत होते. त्यामुळे तो बावचळलेला वाघ गर्जना करीत इकडून तिकडे उड्या मारत होता. आवार चारी बाजूने बंदिस्त असल्याने त्यास बाहेर पडण्यास जागा सापडत नव्हती. त्या मुळे तेथे एकच गोंधळ माजला होता. वाघ चारी बाजूंनी कोंडल्या गेल्यामुळे कोंडी फोडण्यासाठी तो तेथील जमलेल्या विद्यार्थ्यांवर हल्ला करून विपरीत परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता माझ्या लक्षात आली.

मी प्रथम सर्व विद्यार्थ्यांना एकत्र केले. त्यांचेतील ३-४ निवडक मशालधारी आमचे बरोबर घेतले. बाकी सर्व विद्यार्थ्यांना त्यांचे त्यांचे खोल्यात जाण्यास सांगितले. माझ्याबरोबर असलेल्या हत्यारबंद पथकातील शिपायांना अगदीच प्रसंग आल्यास व जीवावरच बेतत असेल तर आणी तरच हत्याराचा वापर करण्यास बजावले. बाहेर बंदोबस्तास आणलेल्या कर्मचाऱ्यांना आत घेउन विद्यापीठाचे दार बंद करून घेतले. पलिते व थाळ्या धारी विद्यार्थी आणी पोलीस कर्मचारी यांच्या ३ तुकड्या केल्या.

ज्या ठिकाणी कुंपणाची भिंत खचून थोडी जागा झाली होती, व जेथून वाघ आत आला असण्याची शक्यता होती, ती दिशा सोडून इतर तीन दिशांनी मी तुकड्या नेमून व थाळ्या वाजवून हाकाटी सुरु केली. आता वाघाचे उड्या मारणे व गर्जना करणे थांबले. तो वाढलेल्या गवताच्या आधाराने दबा धरून शांत बसला. आम्ही जवळ जवळ अर्धा तास त्यास शोधत होतो पण त्याची अजिबात हालचाल दिसून आली नाही. काही काळ अजून गेल्या नंतर तर अशी शंका येऊ लागली की वाघ तेथून निघून तर गेला नाहीना? परंतु आमचे बरोबरचे विद्यार्थी खात्रीने सांगत होते की वाघ आवारातच आहे.

शोध घेत आम्ही एक लाईन करून जात होतो कारण आम्ही जात असलेल्या पाउल वाटेवर चांगलेच गवत वाढले होते. पुढे जात असताना मला माझा गुढगा कशाला तरी घासल्याचा भास झाला. पुढच्याच क्षणी मी जात असलेल्या ठिकाणा वरून माझ्या बाजूनेच, वाघाने मोठी झेप घेतली व तेथे पुढे असलेल्या एका रिकाम्या झोपडीवजा पडक्या घरा मागील गवतात जाऊन दडी मारली. तेंव्हा मला कळले की माझा गुढगा वाघाच्या अंगास घासला होता. ‘दबा धरून बसणे’ याचा खरा अर्थ मला त्या वेळी समजला व तो देखील दस्तूरखुद्द वाघा कडूनच. मी त्या वाघास पहिले. पूर्ण वाढ झालेला काळ्या-पिवळ्या रंगाचा पट्टेदार वाघ होता तो! मध्ये असलेल्या झोपडी मुळे पलीकडच्या वाघाची काहीच हालचाल आम्हास समजत नव्हती. मी एका पोलीस शिपायाला घेउन त्या झोपडीत शिरलो व अर्धवट बंद खिडकीतून पलिकडील वाघाच्या हालचालीचा कानोसा घेऊ लागलो. बराच वेळ थांबून देखील त्याची काहीच हालचाल दिसून येत नव्हती. तेंव्हा

इतर कर्मचार्‍यांना त्या बाजूस दगडी फेकावयास सांगितले व वाघाची काही हालचाल दिसते का ते न्याहाळू लागलो. थोड्याच वेळात गवतात हालचाल झाली. तो वाघ हलकेच दबत दबत चार पावले मागे गेला व डोळ्याचे पाते लवते न लवते तोच त्याचे समोर ८-१० फुटांवर असलेल्या पंधरा फुट उंच भिंतीवरून पलीकडे झेप घेत बाहेर रस्त्यावर गेला. एव्हाना दिवस बराच वर आला होता. बाहेर चांगलीच रहदारी सुरु झाली होती.

जेथून वाघाने भिंत पार केली तेथे आम्ही सर्व जण कोंडाळे करून जमलो. आम्ही सुटकेचा श्वास सोडतो न सोडतो तोच पुढच्या क्षणाला आमच्या पुढ्यातच त्या बाहेर गेलेल्या वाघाची उडी पडली. आम्हास काय होत आहे हे समजण्याच्या आतच त्या वाघाने त्याच्या वाटेत येणाऱ्या एका शिपायाच्य पायावर “ चल हो बाजूला ” अशा दटावणीच्या अविर्भावात पंजा मारला व पुढे गेला. सुदैवाने त्या शिपायाची विजार ढगळ असल्याने केवळ पायापाशी विजार फाटण्यावरच निभावले. या प्रसंगाने आम्ही सर्वच अवाक झालो. वाघ बाहेर जातो काय अन क्षणात परत आत येतो काय हे सर्वच अतर्क्य होते. नंतर लक्षात आले की दिवस उजाडल्याने बाहेर वाहनांची बरीच रहदारी सुरु झाली होती व त्या मुळे त्या वाघास बाहेरच्या पेक्षा आतच जास्त सुरक्षित वाटले असावे.

आता पुन: एकदा नव्याने वाघास बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु झाले. त्या वाघाला बाहेर जाण्या साठीचा मार्ग मोकळा ठेवून परत तीन बाजूंनी थाळ्या वाजवत हाकाटी सुरु केली. आता डोक्यावर उनेही वाढू लागली होती. तो वाघ देखील जेरीला येऊन अस्वस्थ झाला होता व बाहेर पडण्याचा निकराने प्रयत्न करीत होता.

त्याला पडक्या भिंतीकडील बाजूने बाहेर पडण्याचा पर्याय ठेवून व इतर तीन दिशांनी कोंडी करून हाकाटी केल्याचा परिणाम झाला. त्या वाघाने पडक्या भिंतीच्या दिशेने छलांग लावून भिंत पार करण्याचा प्रयत्न केला पण भिंतीवर अर्धवट पंजा आपटल्याने तो खाली पडला. बहुदा त्यामुळे त्याच्या पंजास इजा देखील झाली. त्या वाघाने पुन: एकदा निकराचा प्रयत्न करून ती पडकी भिंत एकदाची लांघली व मोकळ्या दिशेने जंगल वाटेस लागला. आम्ही या वेळी त्यास जंगलाकडे जाताना प्रत्यक्ष पाहिल्यामुळे विद्यापीठातून वाघ निघून गेल्याची खात्री झाली व या नाट्यावर पडदा पडला.

अशा रितीने परम पूज्य श्री. पांडुरंग शास्त्री आठवले गुरुजी यांच्या तत्वज्ञान विद्यापीठात मोठ्या आशेने स्वध्यायासाठी आलेल्या त्या अभ्यागतास विन्मुख होऊन परत जंगलाचाच आधार घ्यावा लागला.

त्या नंतर बरेच दिवस पर्यंत विद्यापीठ परिसरात शेपटी वर करून फिरणाऱ्या कुत्र्या सारख्या प्राण्याच्या चाहुलीने देखील वाघोबा आला रे. . . ची आवई उठून त्याचे पडसाद पोलीस स्टेशन मध्ये उमटत होते.

मी कापूरबावडी पोलीस स्टेशनला प्रभारी अधिकारी असतानाची गोष्ट आहे. त्या वेळी ठाण्याच्या घोडबंदर रोडला वस्ती अतिशय कमी होती. आजच्या सारखे कॉक्रीटचे जंगल माजलेले नव्हते. घोडबंदर रोडच्या एका बाजूस डोंगर व दुसऱ्या बाजूस खाडी पसरलेली आहे. डोंगराकडील कोकणी पाडा पासून पुढे बोरिवलीचे राष्ट्रीय अभयारण्य सुरु होते. त्यामुळे तेथील वाघ तसेंच बिबटे अशा वन्य प्राण्यांचा घोडबंदर रोड व त्याच्या परिसरात मुक्त संचार असे. अगदी कोलशेत खाडी तसेंच बाळकुम, माजीवाडा गावा पर्यंत रात्रीचे वेळी सह-कुटुंब फेर-फटका मारीत असत. सरकारनेच त्यांना बहाल केलेल्या अभयारण्याच्या लगतच हा टापू असल्याने दिवसा ढवळ्या देखील त्यांचा वावर राजरोस पणे सुरु असे.

घोडबंदर रोडला लागूनच परम पूज्य श्री. पांडुरंग शास्त्री आठवले गुरुजी यांनी स्थापन केलेले तत्वज्ञान विद्यापीठ आहे. विद्यापीठ परिसर विस्तीर्ण असून चारी बाजूंनी १५ फुट उंचीच्या कुंपणाने बंदिस्त आहे. विद्यापीठास एकच मुख्य दरवाजा आहे. त्याचे मागील बाजूस आदिवासी वस्ती प्रमुख असलेला कोकणी पाडा हा डोंगरी भाग सुरु होतो.

एके दिवशी सकाळी ६ वाजताच्या सुमारास मला पोलीस स्टेशन मधून ठाणे अमलदाराचा फोन आला. त्याने पोलीस स्टेशन हद्दीतील तत्वज्ञान विद्यापीठात एक वाघ घुसला असून तेथे एकच हलकल्लोळ झाला असल्याचे कळविले. संबंधित वन अधिकाऱ्यास देखील ही माहिती देण्यास तो चुकला नव्हता. मी त्यास ताबडतोब विद्यापीठाच्या प्रवेश द्वारावर पोलीस बंदोबस्त पाठवून बाहेरच्या कोणालाही आत सोडू नका असा आदेश दिला. मी लगेच जागेवर जात असून तेथे दोन पोलीस अधिकारी व निवडक ५ जणांचे हत्यारबंद पथक पाठविण्यास सांगितले.

अर्ध्या तासाच्या आतच मी तत्वज्ञान विद्यापीठात पोहचलो. विद्यापीठाच्या प्रवेश द्वाराजवळ नीट बंदोबस्त लावला. तेथे आधीच पोहोचलेल्या दोन अधिकारी व ५ कर्मचाऱ्यांच्या निवडक हत्यारबंद पथकासह मी विद्यापीठात शिरलो. तेथील व्यवस्थापकांनी मला सांगितले की सकाळी पाच वाजता एका वर्गात विद्यार्थी अध्यापनासाठी जात असता वर्गाचे दार उघडताच आतून अचानक एका वाघाने बाहेर झेप घेतली. त्यामुळे विद्यार्थ्यांची एकच घाबरगुंडी उडाली असून त्या वाघाची तेथे दहशत पसरली आहे. तो वाघ अजूनही आवारातच आहे असेही सांगितले.

सदर विद्यापीठास आधी वर्णन केल्या प्रमाणे एकच जाण्या-येण्यासाठी प्रमुख दरवाजा असून १५ फुटी भिंतीच्या कुंपणाने बंदिस्त आहे. विद्यापीठ परिसर भव्य असून अनेक वनस्पतीने व मोठ मोठ्या वृक्षांनी व्यापलेला आहे. आवारात सर्वत्र जवळ जवळ ४ फुट उंचीचे गवत वाढलेले होते. विद्यापीठात गभरातून येणार्‍या विद्यार्थ्यांसाठी भोजन व निवासाची चांगली सोय आहे. विद्यार्थ्यांच्या अध्यापनासाठी अनेक बैठे वर्ग बांधलेले आहेत. विद्यापीठात त्यावेळी अंदाजे १५० तरी विद्यार्थी शिक्षणासाठी रहात होते.हा वाघ आदले रात्री विद्यापीठाच्या उत्तर-पूर्व भागातील कोपऱ्यातल्या खचलेल्या भिंती वरून आत आला असावा असा अंदाज होता.

मी तेथे पोहचलो तेंव्हा मला असे दिसले की विद्यापीठातील विद्यार्थी ज्यात तरुणांचाच भरणा जास्त होता, ते विद्यापीठाच्या आवारात चारी बाजूने लाठ्या-काठ्या घेउन पेटत्या मशाली सह थाळ्या वाजवून दगडफेक करीत वाघाची हाकाटी करीत होते. त्यामुळे तो बावचळलेला वाघ गर्जना करीत इकडून तिकडे उड्या मारत होता. आवार चारी बाजूने बंदिस्त असल्याने त्यास बाहेर पडण्यास जागा सापडत नव्हती. त्या मुळे तेथे एकच गोंधळ माजला होता. वाघ चारी बाजूंनी कोंडल्या गेल्यामुळे कोंडी फोडण्यासाठी तो तेथील जमलेल्या विद्यार्थ्यांवर हल्ला करून विपरीत परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता माझ्या लक्षात आली.

मी प्रथम सर्व विद्यार्थ्यांना एकत्र केले. त्यांचेतील ३-४ निवडक मशालधारी आमचे बरोबर घेतले. बाकी सर्व विद्यार्थ्यांना त्यांचे त्यांचे खोल्यात जाण्यास सांगितले. माझ्याबरोबर असलेल्या हत्यारबंद पथकातील शिपायांना अगदीच प्रसंग आल्यास व जीवावरच बेतत असेल तर आणी तरच हत्याराचा वापर करण्यास बजावले. बाहेर बंदोबस्तास आणलेल्या कर्मचाऱ्यांना आत घेउन विद्यापीठाचे दार बंद करून घेतले. पलिते व थाळ्या धारी विद्यार्थी आणी पोलीस कर्मचारी यांच्या ३ तुकड्या केल्या.

ज्या ठिकाणी कुंपणाची भिंत खचून थोडी जागा झाली होती, व जेथून वाघ आत आला असण्याची शक्यता होती, ती दिशा सोडून इतर तीन दिशांनी मी तुकड्या नेमून व थाळ्या वाजवून हाकाटी सुरु केली. आता वाघाचे उड्या मारणे व गर्जना करणे थांबले. तो वाढलेल्या गवताच्या आधाराने दबा धरून शांत बसला. आम्ही जवळ जवळ अर्धा तास त्यास शोधत होतो पण त्याची अजिबात हालचाल दिसून आली नाही. काही काळ अजून गेल्या नंतर तर अशी शंका येऊ लागली की वाघ तेथून निघून तर गेला नाहीना? परंतु आमचे बरोबरचे विद्यार्थी खात्रीने सांगत होते की वाघ आवारातच आहे.

शोध घेत आम्ही एक लाईन करून जात होतो कारण आम्ही जात असलेल्या पाउल वाटेवर चांगलेच गवत वाढले होते. पुढे जात असताना मला माझा गुढगा कशाला तरी घासल्याचा भास झाला. पुढच्याच क्षणी मी जात असलेल्या ठिकाणा वरून माझ्या बाजूनेच, वाघाने मोठी झेप घेतली व तेथे पुढे असलेल्या एका रिकाम्या झोपडीवजा पडक्या घरा मागील गवतात जाऊन दडी मारली. तेंव्हा मला कळले की माझा गुढगा वाघाच्या अंगास घासला होता. ‘दबा धरून बसणे’ याचा खरा अर्थ मला त्या वेळी समजला व तो देखील दस्तूरखुद्द वाघा कडूनच. मी त्या वाघास पहिले. पूर्ण वाढ झालेला काळ्या-पिवळ्या रंगाचा पट्टेदार वाघ होता तो! मध्ये असलेल्या झोपडी मुळे पलीकडच्या वाघाची काहीच हालचाल आम्हास समजत नव्हती. मी एका पोलीस शिपायाला घेउन त्या झोपडीत शिरलो व अर्धवट बंद खिडकीतून पलिकडील वाघाच्या हालचालीचा कानोसा घेऊ लागलो. बराच वेळ थांबून देखील त्याची काहीच हालचाल दिसून येत नव्हती. तेंव्हा इतर कर्मचाऱ्यांना त्या बाजूस दगडी फेकावयास सांगितले व वाघाची काही हालचाल दिसते का ते न्याहाळू लागलो. थोड्याच वेळात गवतात हालचाल झाली. तो वाघ हलकेच दबत दबत चार पावले मागे गेला व डोळ्याचे पाते लवते न लवते तोच त्याचे समोर ८-१० फुटांवर असलेल्या पंधरा फुट उंच भिंतीवरून पलीकडे झेप घेत बाहेर रस्त्यावर गेला. एव्हाना दिवस बराच वर आला होता. बाहेर चांगलीच रहदारी सुरु झाली होती.

जेथून वाघाने भिंत पार केली तेथे आम्ही सर्व जण कोंडाळे करून जमलो. आम्ही सुटकेचा श्वास सोडतो न सोडतो तोच पुढच्या क्षणाला आमच्या पुढ्यातच त्या बाहेर गेलेल्या वाघाची उडी पडली. आम्हास काय होत आहे हे समजण्याच्या आतच त्या वाघाने त्याच्या वाटेत येणाऱ्या एका शिपायाच्य पायावर “ चल हो बाजूला ” अशा दटावणीच्या अविर्भावात पंजा मारला व पुढे गेला. सुदैवाने त्या शिपायाची विजार ढगळ असल्याने केवळ पायापाशी विजार फाटण्यावरच निभावले. या प्रसंगाने आम्ही सर्वच अवाक झालो. वाघ बाहेर जातो काय अन क्षणात परत आत येतो काय हे सर्वच अतर्क्य होते. नंतर लक्षात आले की दिवस उजाडल्याने बाहेर वाहनांची बरीच रहदारी सुरु झाली होती व त्या मुळे त्या वाघास बाहेरच्या पेक्षा आतच जास्त सुरक्षित वाटले असावे.

आता पुन: एकदा नव्याने वाघास बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु झाले. त्या वाघाला बाहेर जाण्या साठीचा मार्ग मोकळा ठेवून परत तीन बाजूंनी थाळ्या वाजवत हाकाटी सुरु केली. आता डोक्यावर उनेही वाढू लागली होती. तो वाघ देखील जेरीला येऊन अस्वस्थ झाला होता व बाहेर पडण्याचा निकराने प्रयत्न करीत होता.

त्याला पडक्या भिंतीकडील बाजूने बाहेर पडण्याचा पर्याय ठेवून व इतर तीन दिशांनी कोंडी करून हाकाटी केल्याचा परिणाम झाला. त्या वाघाने पडक्या भिंतीच्या दिशेने छलांग लावून भिंत पार करण्याचा प्रयत्न केला पण भिंतीवर अर्धवट पंजा आपटल्याने तो खाली पडला. बहुदा त्यामुळे त्याच्या पंजास इजा देखील झाली. त्या वाघाने पुन: एकदा निकराचा प्रयत्न करून ती पडकी भिंत एकदाची लांघली व मोकळ्या दिशेने जंगल वाटेस लागला. आम्ही या वेळी त्यास जंगलाकडे जाताना प्रत्यक्ष पाहिल्यामुळे विद्यापीठातून वाघ निघून गेल्याची खात्री झाली व या नाट्यावर पडदा पडला.

अशा रितीने परम पूज्य श्री. पांडुरंग शास्त्री आठवले गुरुजी यांच्या तत्वज्ञान विद्यापीठात मोठ्या आशेने स्वध्यायासाठी आलेल्या ्या अभ्यागतास विन्मुख होऊन परत जंगलाचाच आधार घ्यावा लागला.

त्या नंतर बरेच दिवस पर्यंत विद्यापीठ परिसरात शेपटी वर करून फिरणाऱ्या कुत्र्या सारख्या प्राण्याच्या चाहुलीने देखील वाघोबा आला रे. . . ची आवई उठून त्याचे पडसाद पोलीस स्टेशन मध्ये उमटत होते.

— अविनाश यशवंत गद्रे

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.

*

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..