नवीन लेखन...

आजचा आरोग्य विचार – भाग दोन

हल्ली लवकर उठणे विसरायलाच झालं आहे. लवकर उठून करायचंय तरी काय, हे विचारणारी नवीन पिढी ! त्या पिढीला शिकवण्यासाठीच दीपावलीसारखा सण आमच्या संस्कृतीने आम्हाला दिला. अभ्यंग स्नान कसे करावे हे आम्हाला शिकवले. वेस्टर्न लोक याबाबतीत अनभिज्ञच आहेत. ते एकवेळ लवकर उठत असतीलही. पण तेल लावून आंघोळ म्हणजे अभ्यंग स्नान करत असतील ? शक्य नाही. इथेच भारतीय संस्कृतीचे मोठेपण आणि सुसंस्कृतपण दिसून येते.

लवकर उठण्यासाठी आधी लवकर निजले पाहिजे. निजणे म्हणजे झोपणे. “हल्ली आम्ही फार जागरणं करीत नाही. साडेबारा एकच्या दरम्यान झोपतोच.” असं म्हणणारी रात्री वाॅटसप चॅट करणारी आणि एफबी हाताळणारी पिढी. यांच्यातील एखादा लवकर म्हणजे चुकुन एखाद्या रात्री दहा अकरा वाजता झोपला तर ‘आजारी वगैरे आहे की काय?’ अशी शंका घेणारी ही पिढी.

या पिढीला लवकर झोपण्याचे महत्त्व कसे समजावून सांगणार ?
पाश्चात्यांच्या काम करण्याच्या वेळा ‘फाॅलो’ करणारी आयटी क्षेत्रातली मंडळी, त्यांच्या उदरभरणासाठी आपले आयुष्य अक्षरशः पणाला लावत असतात. हे लक्षात यायला पण वेळ नाहीये. झोप ही रात्रीच्याच वेळी घ्यायची असते. ही वेळ चुकवली तर पचन बिघडते. निसर्गाचा हा नियम आहे. दिवसा काम रात्री आराम. सर्व पशुपक्षी ( निशाचर सोडून ) हाच नियम पाळतात. दिवसभर केलेल्या कामाचा थकवा जाणवू लागतो तेव्हा शरीराला विश्रांतीची गरज असते. तम गुणाची रात्र त्यासाठी नेमून दिलेली आहे. झोप तम काळातच घ्यावी. ती दिवसाच्या सत्व काळात घेतली तर शरीरातील मनातील सात्त्विकता कशी वाढेल ?

ज्यांना उदरभरणासाठी रात्रौचे जागरण करावेच लागते, त्यांनी त्यांच्या नियत झोपेच्या तुलनेमधे अर्धा वेळ झोप दिवसा पूर्ण करावी, अन्यथा त्यांना भविष्यात अनेक शारीरिक आणि मानसिक त्रास होऊ शकतात, हे आज विज्ञानाने पण मान्य केले आहे.

आहार, निद्रा आणि ब्रह्मचर्य हे शरीरस्वास्थ्याचे तीन उपस्तंभ मानलेले आहेत. शरीर, मन आणि आत्मा हे तीन मुख्य स्तंभ आहेत.

हे सर्व पुनः पुनः का सांगावे लागतेय, तर ही आपली संस्कृती आहे.
संस्कृतीचे रक्षण आणि जतन व्हायलाच हवे. काळ बदलला तरी संस्कृती मूल्य तशीच टिकून रहायला हवीत. हेच आपल्या पूर्वजांनी केले. तेच आपण करायला हवे. म्हणून तर परकीयांच्या एवढ्या प्रचंड आक्रमणानंतर देखील आपली भारतीय संस्कृती अजूनही दिमाखात जिवंत आहे.

मनुष्याला सुसंस्कृत बनवण्यासाठीचे शास्त्र आणि कृती म्हणजे संस्कृती! केवळ लिखित स्वरूपातच नाहीतर कृतीच्या स्तरावर देखील ती संस्कारीत होत गेली, म्हणून टिकून राहिली.

जगण्याचे नियम, जगण्याचा उद्देश्य, जगण्याची कला म्हणजे संस्कृती. ही सर्वांची एकच असावी. आणि ही जीवनपद्धती राष्ट्राप्रती अर्पित असावी. यासाठी सर्वांचा विचार उच्चार आणि आचार एकच असावा.

जसे शरीर मन आणि आत्मा हे तीन स्तंभ आहेत. तसेच राष्ट्राच्या शारीरिक मानसिक आणि आत्मिक शक्तींचा विकास हेच संस्कृती रक्षणाचे मुख्य ध्येय असावे.

यासाठीच ही भारतीय संस्कृती काय आहे हे पुढील पिढीला समजावून सांगणे हे आपले कर्तव्य आहे. ते आपण पार पाडूया.

वैद्य सुविनय दामले.
कुडाळ, सिंधुदुर्ग.
9673938021

Avatar
About (वैद्य) सुविनय दामले 453 Articles
वैद्य सुविनय दामले हे कुडाळ, सिंधूदुर्ग येथील सुप्रसिद्ध आयुर्वेदाचार्य आहेत. ते आयुर्वेद या विषयावर विपुल लेखन करतात तसेच व्याख्यानेही देतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..