नवीन लेखन...

आजचा आरोग्य विचार – भाग सोळा

१६. मौनात अर्थ सारे !

भारतीय पद्धतीच्या मलविसर्जनामधे एक प्रमुख भाग येतो, तो म्हणजे मौन.
मलविसर्जन करताना मौन पाळावे. अजिबात बोलू नये. अगदी स्वतःशी सुद्धा !

संध्या, जप, भोजन, दंतधावन, पितृकार्य, देवकार्य, मलमूत्र विसर्जन, गुरुंच्या सान्निध्यात असताना, दान आणि योग करीत असताना मौन पाळावे, असे शास्त्र वचन आहे.

मग करायचे काय ? तर सतत वर्तमानात रहायचे. ज्या कारणासाठी हा वेळ दिलेला आहे, त्याच कारणासाठी तो खर्ची घालावा. टाॅयलेटमधे गेल्यावर अन्य गोष्टींचा विचार अजिबात करू नये. या रिकाम्या वेळात दुसरा विचार करायला सुरवात केली की यावेळचे महत्त्वाचे काम, जे मलविसर्जन, तेच दुर्लक्षित रहाते. नंतर वेळ लागतो, समाधान होत नाही. आणि दिवसही फुकट जातो.

त्याऐवजी मलविसर्जन करताना एकदाच तिथे लक्ष ठेवून, पोट पूर्ण रिकामे होते आहे का, याकडे लक्ष असावे. यासाठी मौन आवश्यक आहे. स्वतःचे स्वतःशी सुद्धा मौनातच असावे.

आतमधे साधं मोबाईलवर बोलत बसलो तरी जे तोंड उघडं रहातं, तेवढा जंतुसंसर्ग होण्याची शक्यता जास्त. त्यामुळे भलाई यातच आहे की रिकाम्या हातानी आत जावं आणि लगेचच रिकामं होऊन यावं.

आजकाल काय होतंय, मलविसर्जन करताना, मोबाईलवर बोलणे, वाॅटसपवर चॅट करणे, वर्तमान पत्र वाचणे, दात घासणे, इ. सारख्या क्रिएटीव्ह कामासाठी वेळ वाचवला जातो. आजच्या भाषेत टाईम मॅनेजमेंट !

म्हणजे मलविसर्जन ही क्रिया उगाच ‘टाईमवेस्ट किंवा जस्ट टाईमपास’ स्वरूपाची गृहीत धरली तर दिवसभराच्या शरीराची शुद्धी एकाच खेपेत होत नाही. मग वारंवार जावे लागते. त्यात वेळ जातो तो वेगळाच हं !

सर्वसाधारणपणे दोन वेळा भोजन सेवन केले तर दोन वेळेस मलविसर्जन करावे लागते. अन्न जसजसे वरून खाली सरकत जाते, तसतसा त्यातील पोषक अंश शोषून घेत घेत उरलेला मल पुढे पुढे सरकवला जातो.

या शरीराचे पण स्वतःचे एक टाईम मॅनेजमेंट आहे. त्याकडे आधी लक्ष द्यावे. एकदा का दुसऱ्या गोष्टीत गाडी रेंगाळली की, ट्रॅफीक जॅम व्हायला वेळ लागत नाही. असं वारंवार व्हायला लागलं की गाडीच्या अॅव्हरेजवर परिणाम होणारच !

म्हणून ज्या वेळी जे काम व्हायला पाहिजे ते काम त्याच वेळी, गुपचुप, त्याच जोरासरशी करून घ्यावे, म्हणजे मागून औषधांचा जोर द्यावा लागत नाही.

वैद्य सुविनय दामले.
कुडाळ, सिंधुदुर्ग.
9673938021

Avatar
About (वैद्य) सुविनय दामले 453 Articles
वैद्य सुविनय दामले हे कुडाळ, सिंधूदुर्ग येथील सुप्रसिद्ध आयुर्वेदाचार्य आहेत. ते आयुर्वेद या विषयावर विपुल लेखन करतात तसेच व्याख्यानेही देतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..