नवीन लेखन...

आहारसार भाग ६

काय गहू खायचा नाही ?
मग आम्ही खायचे तरी काय ??
चपाती खायची नाही, म्हणजे जरा अतिच होतंय हं. ?
डब्यातून तर आम्हाला चपातीच न्यावी लागते.
नाऽही. चपातीशिवाय जमणारच नाही हो.
चपातीशिवाय जगणारच नाही मी.

हो, हो, कित्ती कित्ती प्रतिक्रिया.
जरा समजून घेऊया.
“पॅनिक” न होता.
गहू हा अत्यंत पौष्टिक आहार आहे. कफकर आहे. थंड हवेत तयार होणारा आणि त्याच थंड हवेत पचण्यायोग्य असा आहे.
जर गहू पचला नाही, तर तो उत्तम कफवर्धक, उत्तम आमनिर्मिती करणारा, अत्यंत चिकट, अश्या अवगुणांचा आहे.

साधी कणिक मळून झाली की हाताला किती चिकटून रहाते ? काढायची ठरवली तरी येत नाही. एवढी चिकट आहे. पोटातही तशीच चिकटून रहाणार. असे थरावर थर बसत गेले की ट्रॅफिक जाम होणारच !

पिठाची चक्की आतून खोललेली कधी बघीतली आहे का ?
नसल्यास जरूर बघा. आठवड्यातून एकदा तरी ती चक्की स्वच्छता करण्यासाठी उघडली जाते.
आतील दगडी जात्यावर ( त्याला जात्याचे पेड म्हणतात.) चिकटलेले पीठ बघा. सतत होणाऱ्या घर्षणामुळे, पीठ जळलेले असते काळे होते आणि अगदी घट्ट चिकटून बसते. निघता निघत नाही, एवढे घट्ट. छिन्नी हातोडा घेऊन ते काढावे लागते. नवीन टाकी घालावी लागते, तेव्हा कुठे ती चक्की परत तयार होते.
पोट म्हणजे एका प्रकारची अशी पीठाची चक्कीच असते. त्यावर पण असेच न पचलेल्या अन्नाचे, म्हणजेच आमाचे, चिकट थर, थरावर थर बसत जातात. यातूनच अन्य रोगांची तयारी सुरू होते.

आतमधे काय होत असेल, याची थोडी कल्पना यावी म्हणून पीठाची चक्की नजरेसमोर आणावी.

गव्हामुळे हा चिकटा कमी होण्याऐवजी आणखी वाढतच जातो.
पोटातून थेट रक्तवाहिन्यांपर्यत.

का नाही जाणार ?

टाकीतली घाण पाईपमधे येऊन अडकतेच ना. अगदी तश्शीच ! थराथर थर. आजच्या भाषेत यालाच म्हणतात कोलेस्टेरॉल.
हे कोलेस्टेराॅल फक्त तेलकट खाण्यानेच वाढते असं नाही.
( तेल खाणे आणि तेलकट खाणे यात फरक आहे हो, सांगेन नंतर.)

हा एक मोठ्ठा गैरसमज आहे की, “फक्त तेल, तुप खाण्यानेच कोलेस्टेराॅल वाढते.” म्हणून खाण्यातून जरी तेल तूप बंद केले तरी, रक्तातील कोलेस्टेराॅल मात्र कमी होत नाहीये. हे व्यवहारात पण दिसतेच आहे.

अत्यंत चिकट, पचायला जड, आणि फक्त थंड हवेतच पचणारा गहू, कोकणात, समुद्रकिनारी रहाणार्‍या लोकांनी खाल्ला, की गहूदेखील कोलेस्टेराॅलसदृश पदार्थ वाढवतोय, हे लक्षातच घेतले जात नाहीये. आणि आतमधे जाऊन साळसूदपणे तो आपले काम करतोय.

बरं. हा गहू एवढा प्रस्थापित झाला आहे, की त्यांच्याशी कोणता डाॅक्टर पंगा घेणार ?

गहू बंद करा असा प्रामाणिक सल्ला देणारा डाॅक्टरच बदलतील, पण आम्ही आपली आहार पद्धत बदलणार नाहीत, मग आपणच उगाच वाकड्यात का शिरा ?
असा सूज्ञ विचार तज्ञ डाॅक्टर मंडळी करत असतील.

शेवटी परिणाम कोणाला भोगायला लागताहेत ?
जरा विचार करा.

केवळ सणासुदीला पक्वान्न म्हणून, आहारात येणारा पंजाबी हरियाणवी गहू, कोकणी पानात भाताला बाजूला सारून, त्याची जागा स्वतः घेऊन बसलाय !

हे त्या बिचार्‍या कोकणी तांदळाला पण कधी कळलेच नाही. !

वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग
9673938021.
24.08.2016

Avatar
About (वैद्य) सुविनय दामले 453 Articles
वैद्य सुविनय दामले हे कुडाळ, सिंधूदुर्ग येथील सुप्रसिद्ध आयुर्वेदाचार्य आहेत. ते आयुर्वेद या विषयावर विपुल लेखन करतात तसेच व्याख्यानेही देतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..