नवीन लेखन...

आदिदेव श्री गणेशा !!

महाबली बालेश अससी तूच दुरजा,
महं महामती अंबिकेय श्री गणेशा,
अवतरी सुरेख अंगमळी गौरीनंदन,
शार्दुल मनोमया तुज साष्टांग वंदन…!!१!!

ॠध्दी सिध्दी द्वि सुंदर पत्नी,
पार्वती अलक्ष इष्ट जननी,
पाश-परशु-अंकुश हे शस्त्र,
आखूरथ वाहे, नेसे पितांबरी वस्त्र…!!२!!

यशस्वीन तु, भासे हरिद्ररूपी,
गोल लंबोदर, चतुर्भुज वाढवी किर्ती,
अवनीश मोहक कनिष्ठ इशानपुत्र,
शोभले पिता पुत्रासी नाव भालचंद्र…!!३!!

शिवानंदन म्हणुनी रूप प्रकटले,
वरद गजमुख, शुभ्र गजदन्त लाभले,
अथर्व अवनेश आदिदेव जाहले,
कवीश गणपती रूद्र प्रिय भावले…!!४!!

— कु. श्र्वेता काशिनाथ संकपाळ.
(१४-०९-२०१९)

(काही शब्दांचे अर्थ खालीलप्रमाणे :-

बालेश :- दुष्टांचा नाश करणारा
दुरजा :- ज्याचा कुणी विनाश करु शकत नाही असा
महं : ईशाधिपती
महामती :- बुध्दीची देवता
अंबिकेय :- पर्वतावर निवास करणारे ईश्र्वर
शार्दुल:- देवांचा महिपती
मनोमया :- भक्तांचे ह्रदय जिंकणारा
अलक्ष :- ईश्वर, देव
इष्ट :- आवडती या अर्थाने
आखूरथ :- मुषक (उंदिर) वाहन असलेला
यशस्वीन:- आनंद आणि यश घेऊन येणारा ईश्वर
हरिद्ररूपी :- सोनेरी त्वचा असलेला.
चतुर्भुज:- चार हात असलेला.
अवनीश:- सगळ्या जगावर राज्य करणारा.
कनिष्ठ:- लहान
इशानपुत्र:- शंकराचे नाव
वरद :- तेजस्वी
अथर्व:- सर्व अडथळे पार करणारा
अवनेश :- धरतीचा अधिपती.
आदिदेव:- ज्या देवतेची सर्वात आधी उपासना केली जाते असा
कवीश :-श्री. गणेशाचे नाव.
रूद्रप्रियं:- शिव प्रिय असा तो श्री गणेश ., ई.)

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..