नवीन लेखन...

समालोचक अनंत सेटलवाड

अनंत सेटलवाड यांचे समालोचन एखाद्या शैलीदार फलंदाजाच्या फलंदाजीसारखे असे.
त्यांचा जन्म १९३५ रोजी झाला. इंग्रज भारतातून निघून गेल्यानंतरही क्रिकेट या देशात राहिले आणि रुजले. साठ, सत्तर आणि ऐंशीच्या दशकात एकीकडे भारतीय क्रिकेट संघाची वाटचाल धिम्या गतीने होत असताना, रेडिओच्या माध्यमातून हा खेळ घराघरांत पोहोचवण्याचे श्रेय भारतातील जाणकार आणि रसिक समालोचकांनाही दिले पाहिजे.

भारतीय चित्रपट संगीताचा होता तसाच हा समालोचनाचाही सुवर्णकाळ होता. बॉबी तल्यारखान, डिकी रत्नागर, अनंत सेटलवाड, सुरेश सरय्या असे काही समालोचक त्या सुवर्णकाळाचे मानकरी होते. कालांतराने या मंडळींमध्ये विजय र्मचटही दाखल झाले. प्रत्येकाची शैली निराळी होती. यातील एक होते अनंत सेटलवाड.

अनंत सेटलवाड यांना मोजक्या शब्दांतील समालोचनाची कला अवगत होती. विख्यात इंग्रज समालोचक जॉन अरलॉट यांनी रेडिओ समालोचनात नवीन मानदंड निर्माण करताना काही युक्त्या सांगितल्या होत्या. समालोचकाने श्रवणचित्र उभे केले पाहिजे आणि श्रोत्यांना एका नवीन, अनाम विश्वाची सफर घडवली पाहिजे, असे ते सांगत. सेटलवाड यांच्यासाठी ते ब्रह्मवाक्य होते. समोर उलगडत जाणाऱ्या घटनांचे चित्र नेमक्या शब्दांमध्ये उभे करण्याची त्यांची खासियत होती. अनंत सेटलवाड यांचा आवाज हेच अनेकांना आकर्षण होते आणि ते मधूनच हलक्या फुलक्या भाषेत बोलत. टिप्पणी करत आणि श्रोत्यांप्रमाणे सहकार्यांआचीही दाद मिळवत.

मर्चंट यांच्याबरोबर त्यांची विश्रांतीच्या काळातील चर्चाही ऐकण्यासारखी आणि माहितीपूर्ण असायची आणि वारंवार आनंदजी डोसा यांनी अचूक आकडेवारी पुरवल्याचाही ते उल्लेख करत. या तिघांचं समालोचन हा एक वेगळाच समाधान देणारा अनुभव होता. इंग्रजीवर विलक्षण प्रभुत्व आणि शब्दांचा खजिना अफाट. नामवंत वकील कुटुंबात जन्म आणि पब्लिक स्कूलमधील शिक्षणाचा तो एकत्रित परिणाम. अशा शब्दवंतांना कोणत्याही परिस्थितीचे मौखिक वर्णन करतानाही फार सायास पडत नाहीत.

सेटलवाड यांचे समालोचन एखाद्या शैलीदार फलंदाजाच्या फलंदाजीसारखे होते. धावा झटपट होत नाहीत किंवा षटकार-चौकारांची बरसातही झडत नाही. पण अशा फलंदाजाचे खेळपट्टीवरील अस्तित्वच सुखावणारे, रमवणारे असते. गोलंदाज चेंडू कसा टाकतो किंवा विशिष्ट फलंदाजाची उभी राहण्याची पद्धत कशी आहे या बाबी, गोलंदाजाने चेंडू फेकण्यासाठी धाव घेतल्यापासून तो प्रत्यक्ष चेंडू टाकेपर्यंत सेटलवाडांनी सांगितलेल्या असायच्या.

अनंत सेटलवाड यांचा आवाज आश्वासक होता. त्या काळात अनेकदा भारतीय संघाचे घरच्या वा दूरच्या मैदानांवर पतन होत असताना, अनंत सेटलवाड यांच्या आवाजामुळे क्रिकेट चाहत्यांचा उद्वेग काही प्रमाणात कमी व्हायचा.

एकदा एका सामन्यात वेस्ट इंडिजचे क्रिकेटपटू वेळकाढूपणा करत राहिले आणि हातातला सामना अनिर्णित राहिला. त्या वेळी अनंत सेटलवाड यांसेटलवाड यांच्या सबुरीच्या सल्ल्यामुळेच मैदानातील प्रेक्षक शांत राहिले आणि परिस्थिती हाताबाहेर गेली नाही. अनंत सेटलवाड यांचे ४ ऑगस्ट २०१९ रोजी निधन झाले.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4222 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..