नवीन लेखन...

जागतिक दुध दिन

शेतीला जोडधंदा म्हणून शेतकऱ्यांसह बेरोजगारांनी दुग्ध व्यवसायाकडे वळाले आहेत पण त्यात अजून ही वाढीची गरज आहे. ग्रामीण भागात दुग्ध व्यवसायाने यशोगाथा निर्माण केली आहे.

आज जागतिक दुध दिना निमित्त भारतातील धवल क्रांतीचे जनक डॉ. वर्गीस कुरियन यांची माहिती.

भारतीय ग्रामीण भागातील विकासात धवल क्रांतीचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. डॉ. कुरियन यांनी अनेक ग्रामीण भागात स्वाभिमानाने व स्वैराचाराने व्यवसायाला चालना दिली व दुधाचा महापूर घडवून आणला. स्वत: ला एक थेंब ही दुध आवडत नसणारे डॉ. कुरियन यांनी सहकार चळवळीतून धवल क्रांती साकारून दुग्ध व्यवसायातून ग्रामीण विकासाचे श्वासात आणि यशस्वी मॉडेल उभे केले. व्हर्गीस कुरीअन यांना जगात Milk Man म्हणून ओळखत असत.

डॉ. कुरियन यांचा जन्म २६ नोव्हेबर १९२१ साली केरळ राज्यातील कोझिकोड मध्ये झाला. व्हर्गीस कुरीअन सिरीअन ख्रिश्चन होते. चेन्नई च्या लोयोला महाविद्यालयात १९४० साली विज्ञानाची पदवी घेवून टिस्को जमशेदपूर येथे तंत्रज्ञ म्हणून रुजू झाले. त्यांनी दुग्ध अभियांत्रिकीच्या अभ्यासासाठी शिष्यवृत्ती मिळवली. आपल्या शिक्षणाचा उपयोग व्यावसायिक दृष्टीकोनातून नावारुपात आणण्याचे काम डॉ. कुरियन यांनी चोख केले. पशुपालन विषयातून विशेष प्रशिक्षण घेतल्यानंतर त्यांनी अमेरिका गाठली व १९४८ मध्ये त्यांनी मिशिगन युनिव्हर्सिटीतून मेकॅनिकल इंजिनीअरिंगची मास्टर्स डिग्री मिळवली.

त्यानंतर कुरियन यांनी सरकारी बाँडच्या पूर्ततेसाठी गुजरातच्या आणंद येथील सरकारी डेअरीमध्ये काम केले. हा बाँड पूर्ण झाल्यानंतर १९४९ मध्ये त्यांनी काइरा जिल्हा सहकारी दूध उत्पादन युनियन लिमिटेडमध्ये काम केले. या कामाचा धडाका व त्यांच्या नवनव्या कल्पना पाहून पटेल यांनी त्यांना डेअरी प्रक्रिया केंद्र उभारण्याची जबाबदारी सोपवली आणि यातूनच भारताला जगात ओळख देणाऱ्या ‘ अमुल ‘ ची निर्मिती झाली. ‘ अमुल ‘ चे सहकारी तत्त्वावरील दूध उत्पादनाचे तंत्र अल्पावधीतच संपूर्ण गुजरातमध्ये प्रसिद्ध पावले आणिजागोजागी या तत्त्वावर सहकारी संस्था उभ्या राहू लागल्या . त्यानंतर या निरनिराळ्या संस्था एकाच छत्राखालीआणण्यासाठी गुजरात को ऑप . मिल्क मार्केटिंग फेडरेशनची स्थापना करण्यात आली.

केवळ दोन संस्थांच्या सहभागाने सुरू झालेल्या या फेडरेशनमध्ये सध्या १६,१०० संस्था सहभागी झाल्या असून दूध उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या तब्बल ३० लाख २० हजारांपर्यंत पोहोचली आहे. कुरिअन यांनी तब्बल ३३ वर्षे देशाचे दूध धोरणे आखले व ते यशस्वीपणे पार पाडले. ६० च्या दशकात अवघे २ कोटी मेट्रिक टन असणारे दुधाचे उत्पादन २०११ मध्ये १२ कोटी २० लाख मेट्रिक टनांपर्यंत पोहोचले आहे आणि यामध्ये सर्वाधिक परिश्रम आहेत, ते कुरियन यांचेच. जगात दुधाची पावडर गाईच्या दुधापासून बनवली जाते.

व्हर्गीस कुरीअन आणि त्यांच्या सहकार्यांनी म्हशीच्या दुधापासून दुधाची पावडर बनविण्याचे तंत्र शोधले आणि ‘नेसले’ या बलाढ्य ब्रांड ला जागतिक बाजारपेठेत टक्कर दिली. भारत सरकारने १९६५ साली “भारतीय दुग्ध विकास महामंडळाची” स्थापना केली तीच मुळात कुरियन यांच्या आणंद येथील अमूल प्रकल्पाच्या धर्तीवर.

भारत सरकारने वर्गीस कुरीयन यांना १९६५ मध्ये पद्मश्री, १९६६ मध्ये पद्मभूषण, १९८६ला कृषी रत्न तर १९९९ मध्ये पद्मविभूषण अशा पुरस्कारांनी सन्मानित केले.

व्हर्गीस कुरियन यांच्या धवल क्रांती ने प्रेरित होवून प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक श्याम बेनेगल यांनी ‘मंथन ‘ हा सिनेमा बनवला. विशेष म्हणजे या चित्रपटाची निर्मिती हि सहकार तत्वावरच झाली होती. अमूल चे छोटे छोटे भागधारक शेतकरी या चित्रपटाचे निर्माते होते. स्मिता पाटील व नसिरुद्दीन शहाचा हा चित्रपट न्यूयॉर्क मध्ये २५ आठवडे चालला.

वर्गीस कुरीयन यांचे ९ सप्टेंबर २०१२ रोजी निधन झाले.

संजीव वेलणकर
९४२२३०१७३३

पुणे.

संदर्भ: इंटरनेट.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4222 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..