नवीन लेखन...

देवा

देवा तुझे जरी सुंदर आकाश
मी तुझा प्रकाश
अंधारी का——————ll १ ll

सुंदर वेलींना सुंदर हि फुले
माझीच का मुळे
खुडलेली ——————-ll २ ll

साखरेचे खाई त्याला तूच देशी
मी का रे उपाशी
तुझ्या घरी ——————ll ३ ll

भिकारी तुही तुझ्या आईविना
माझ्या का वेदना
जाणेनाशी ——————ll ४ ll

काठीला तुझ्या आवाजच नाही
तरी त्राही त्राही
करावे मी- —————–ll ५ ll

जगावीशी असा मला कशासाठी
रोज गाठीभेटी
मरणाच्या- —————-ll ६ ll

कोणाचा मी कोण मला ना ठाउकें
सारे जग मुके
बोलेचिना —————–ll ७ ll

आवडतो तुज जो आवडे सर्वांना
मी कुठे उणा
सांग बाप्पा —————ll ८ ll

किती देवराया पाहशील अंत
मी हा गुणवंत
झाकोळलो —————ll ९ ll

….. मी मानसी

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..