नवीन लेखन...

देव । नव्हे देवनिर्मितीत आनंद

बघा सध्याचा एक जिवंत प्रश्न !  “ देवा “ विषयी. देव आहे म्हणणारे अनेकजण आहेत तसेच देव ह्या संकल्पनेचे अस्तित्व पूर्णपणे नाकारणारे देखील अनेक आहेत. प्रत्येकजण आपल्या तर्क बुद्धीने देव ह्या संकल्पनेस मान्यता देतो. अथवा अमान्य करतो. ह्याचे प्रमुख कारण त्या अनंत, अविनाशी, विशाल, सर्व व्यापी शक्तीला खऱ्या अर्थाने कुणीच पाहिले नाही, समजले नाही, जाणले नाही. आधुनिक पद्धतीने बोलावयाचे तर त्याचा निश्चित Bio- data हा नक्की झालेला नाही. विद्वानांत त्यांत मत भिन्नता आहे. मात्र सर्व जण एक मानतात की ही कोणती तरी उर्जा शक्ती रुपांत आहे. म्हणजेच त्या परमेश्वराच्या आकलनाच्या ज्ञानाविषयी अजून तरी ज्ञान साधना, माहिती, समजण्याची जाणण्याची प्रक्रिया, ह्याच मार्गावर ती आहे. ज्ञान हे कधीच पूर्ण होत नसते. ते सतत शोध मार्गावरच चालत असते. हा शोधमार्ग म्हणजेच “ सत्य शोध “  हा आहे. आणि हे केव्हांही, कधीही  “ पुर्ण साध्य “  होणार नाही. कारण ती सतत बदलत जाणारी प्रक्रिया ठरते. तसेच विश्वास, श्रद्धा ह्या देखील.

माझा स्वतःचा एक समज आहे. कदाचित विवादास्पद असेल. पण हे माझे वैयक्तीक मत. अनेकजण ईश्वराच्या शोध प्रक्रियेच्या मार्गावर चालतात. प्रचंड प्रमाणांत ते त्यांत व्यस्त राहतात.  त्यानी  तो त्यांचा मार्ग बदलावा. ईश्वर आहे एक सत्य. तो विश्वाचे नियंत्रण करणारा. सारे मान्य. तुमचा विश्वास, श्रद्धा तेवढ्याच सिमीत ठेवा. ईश्वरा विषयी आदरभाव प्रेमभाव, ऋणी भाव इत्यादी मनात दृढ बाळगा.  येथेच थांबा. तुमच आयुष्य हेच मुळी निश्चित व मर्यादित आहे. हे देखील त्रिवार सत्य आहे. तेंव्हा ते आयुष्य, ते जीवन तुम्ही त्यानेच निर्माण केलेल्या विश्वामध्ये “ केवळ आनंद व समाधान  “  शोधण्यात खर्च करा. त्या जगाला जाणण्यात, त्याने निर्माण केलेल्या प्रत्येक कलाकृतीमध्ये तोच असतो हे समजून त्यांत एकरुप होण्यात खर्च करा. तुमचे जीवन त्या ईश्वराने निर्मिलेल्या प्रत्येक कलाकृतीमध्येच असावे.

तो ईश्वर कसा ? काय ? कोठे ? याच्या विवंचनेत नसावे. ईश्नर म्हणजेच निसर्ग समजा. आणि त्या निसर्गांत एकरुप होत आनंद लुटा. व समाधानी व्हा. परंतु आम्ही प्रचंड वेळ, पैसा, शक्ती ह्या सर्व बाबी फक्त त्या ईश्रर शोधांत,  खर सांगायच तर त्याच  “दर्शन प्राप्तीच्या “ प्रयत्न्यांत  खर्च करतो. आम्ही जास्त धार्मिक वृत्तीचे होऊ पहातो. कारण ‘ ईश्वरी शोध आणि मोक्ष ’ ही संकल्पना आमच्यावर प्रचंड प्रमाणांत अनेक तथाकथीत विद्वान मंडळीनी थोपली आहे. मी माझ्या मनांतून हे करीत नाही. परंतु त्या विचारांचा पगडा, संस्कार ह्या दबाव तंत्रा खालीच करतो. अनेकजण त्या ईश्वरशोध व दर्शन या विचारांनी झपाटले जाऊन सारे आयुष्य त्यातच खर्च करतात.

निसर्गांत प्रत्येक अंगात, दृष्यांत, घटनेत, प्रसंगात सभोवतालच्या वातावरणात, सजीव आणि निर्जीव ठेव्यांत, इत्यादीत ईश्वर प्रतिबिंबीत होत असतो. त्यालाच जाणा आणि खरा ईश्वरी आनंद लुटा. एक महान तत्वज्ञान मान्यता पावलेले एकतो. “भिऊ नकोस. मी तुझ्या पाठीशी आहे.”  किती स्वच्छ व महान अर्थपूर्ण तत्वज्ञान आहे हे. “ मी तुझ्या पाठीशी आहे, म्हणजेच तू मला बघुच शकणार नाहीस. तू बघण्यासाठी वळशील तर पाठ वळेल, मी पण तुझ्या मागे गेलेलो असेन,  जशी माझी सावली माझ्या मागे सतत राहते, त्या प्रमाणे ”  तो तथाकथीत ईश्वर सदैव माझ्या पाठीशी आहे. आणि हा विश्वास तुम्ही पक्का केला,तर यात दोन गोष्टी साध्य होतात. एक तो सतत पाठीशी आहे, आणि दुसरा तो माझ्या हालचाली बघत असतो. माझे रक्षण करण्याचे त्याने अभिवचन दिले आहे. आपण त्याच्या वाक्याची सांगड घातली पाहीजे. तो  “भिऊ नको “ म्हणतो. तो हेच सुचवितो की तू तूझे कर्तव्य करीत जा. माझे लक्ष असेल. तुला तुझ्या  “योग्य, प्रयत्न्यानुसार, ज्ञानानुसार, अंतरीक भावनेनुसार, “  यश देण्याचा प्रयत्न असेल.  आम्ही मात्र हा मार्ग न अवसरता तो दयावान ईश्वर कसा, त्याचे दर्शन ह्यातच आयुष्य खर्च करतो. त्याच नाव घेत  ( नामस्मरण करीत ), गुणगान करीत, भजन पूजन करीत, बराचसा वेळ त्यांत दवडतो. यांनी कांही सांध्य होत नसते. मात्र आपण त्या ईश्वरानेच निर्मिलेल्या अनेक गोष्टीमधून आनंद घेण्याचे विसरुन जातो. नव्हे तो आनंद घेण्यासाठी थोडासा देखील आपल्याकडे वेळ शिल्लक राहत नाही.

2                 अनेक कलाकार, संगीतकार, चित्रकार, साहित्यिक, कवी, वैज्ञानिक, श्रमिक, खेळाडू, इत्यादी अनेक अनेक महान व्यक्तींचा विचार केला तर हेच दिसते.  ते त्यांच्या क्षेत्रांत विलक्षण पद्धतीने चमकले. यशस्वी झाले. कारण एकच. त्यानी निवडलेल्या क्षेत्रांत त्यानी स्वतःला झोकून दिले. सारे तन,मन, धन देखील त्यांत गुंतवले. त्यांनी तथाकथीत ईश्वर, परमेश्वर त्याचे दर्शन, त्याची दया, कृपा या भावनिक गुंत्यात वाहून गेले नाही. त्यांनी  त्यांच्याच निर्मितीला प्राधान्य दिले. निसर्ग, संसार, जग आणि हे संपूर्ण विश्व मंडळ ही त्याचीच निर्मिती समजून त्यामध्येच आनंद घेण्याचे सतत प्रयत्न केले. यांनाच ते ईश्वर मानीत गेले. ते मिळविण्याच जीव तोडून प्रयत्न केला. हीच त्यांची खरी ईश्वर भक्ती. आणि त्यानी केलेली साधना हेच ईश्वर दर्शन होय.  जे त्यानी साध्य केले तोच त्यांचा ईश्वर असे मला वाटते.

ईश्वरला खऱ्या अर्थाने  समजा,  त्याला सर्वस्व समजा. तुम्हास जाग येतांच एकदा नमन करा. आणि आता त्याला तो फक्त पाठीशी आहे हे समजून, विश्वासून, श्रद्धा ठेऊन मनाला त्याच्यासाठी नव्हे तर त्याने निर्माण केलेल्या विश्वासाठी सारी शक्ती, प्रयत्न खर्ची करा. समाज सेवा आहे, निसर्ग सेवा आहे, वातावरण सेवा आहे, कलाविश्व आहे, आणि अशाच गोष्टीमध्ये व्यस्त रहा. त्या ईश्वराला जाणण्यापेक्षा त्याने निर्मिलेल्या जगांत आनंद घ्या. हेच तर जीवनचे साध्य आहे.

खऱ्या अर्थाने जे जगाला समजण्याचा प्रयत्न करतात, त्यांच्या विषयी सर्वानाच आदर प्रेम, वाटते. जे ईश्वराला समजण्यात प्रयत्नशील वाटतांत त्यांच्याकडे अंतरमनातून शंकेने बघीतले जाते. म्हणूनच आज देखील तथाकथीत साधू, संत, महंत, ह्या विषयी शंका व्यक्त केली जाते. कारण त्यांची भक्ती “ईश्वर दर्शन प्राप्ती व मोक्ष”  ह्याच ध्येयाने प्रेरित असते. मला ईश्वरा कडून कांही तरी हवंय. मग ते ऐहीक असेल वा आत्मिक असेल. मात्र त्याचा पाया ईश्वराकडून मागणी व प्राप्ती हाच हेतू.

ईश्वरी नाते म्हणजे व्यवहार नसतो. तपःशक्ती अर्थात् तपसाठा द्या आणि कांही तरी मिळवा. याचाच आधार घेऊन अनेक पौराणिक कथा रचिल्या गेल्या. दुर्दैवाने आजही त्या प्रचलीत आहेत. सत्याच्या आधार शोधतात. कां असे होते. एखाद्या ईश्वरी मार्गातील, अध्यात्म मार्गातील व्यक्ती बद्दल आदर वाटतो. त्याच्या सखोल ज्ञानाचे कौतूक वाटते. शब्द भाव, विचार, याना प्रचंड शक्तीनिशी ते वाक्याना वाकवितात. त्यांत माधुर्य आणतात. ते क्षणांत पटते. बुद्धीला समाधान देते. परंतु तरी देखील अंन्तमन सतत प्रश्नांकित राहते. कारण जे सांगितले जाते, ते खऱ्या खोलीने सत्यांत उतरत नाही. ते फक्त मानले जाते. शिवाय त्यांच्या तत्वज्ञानाची, विचारांची, झेप इतकी उंचावरची असते की त्याला थोडासा सुद्धा विरोध करणे वा शंका निर्माण करणे हेच तुम्हास एका “ अज्ञानाच्या घरांत” ढकलते. आणि अज्ञान । हे कुणालाही मान्य होत नसते. आम्ही त्याच्या स्वीकारांतच धन्यता मानतो. श्रद्धेला येथेच अंधश्रद्धेच्या दालनांत ढकलले जाते. जे कुणीही मान्य करीत नाही. मुख्य म्हणजे असा विचार द्दढ होतो की हे सारे मानले तर कुठे बिघडते. कांहीही नुकसान नाही. हा विचार तुमचे सान्तवन करतो. श्रद्धा ह्या देखील अशाच द्दढ होऊ लागतात. अप्रत्यक्ष तुमच्या जीवनावर अधिकार गाजवतात.

ईश्वराच्या कलाकृतीला अर्थात निसर्गाला मान्यता देऊन, त्यांत एकरुप होणे हे प्रचंड ताकतीचे, परिश्रमाचे, ध्येय धोरणाचे कार्य आहे. परंतु त्यांत अंतिम समाधान व नितांत आनंद भरलेला असतो. तो खरा आंतरिक असेल. ह्या उलट “ ईश्वरी शोध व मोक्ष संकल्पना” ह्या मुळातच बाह्यांगानी लादलेल्या, संस्कारलेल्या, थोपलेल्या असतात. देव आहे, देव असतो, ह्याचे बाळकडू समजण्याचे वारे वाहू लागण्यापूर्वीच तुमच्या मेंदूवर आघात केले जातात. बालकाचे मन हे केव्हांच मानित नसते. परंतु ते सतत बाह्य आघाताला शरण जाते. “ मी जे बघतो ते वेगळे व जे सांगितले जाते ते भिन्न “  हा त्या सततचा अनुत्तरीत प्रश्न. ह्या मुळेच त्याचे अध्यात्मिक मार्ग संशयाच्या चालीवर व ओढून ताणून तथाकथित समाधान- आनंद ह्या भावनांवर चकरा मारीत असतात.

डॉ. भगवान नागापूरकर

संपर्क – ९००४०७९८५०

bknagapurkar@gmail.com

 

 

Avatar
About डॉ. भगवान नागापूरकर 2132 Articles
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..