नवीन लेखन...

स्त्री ईश्वराची एक अप्रतिम कलाकृती

**  मादी व नर ह्यांत फक्त मादीचीच खऱ्या अर्थाने योजना केलेली. तीला जीवन चक्रासाठी मातृत्व दिले.  नराची संकल्पना नंतरची. एक सहाय्यक, मदतनीस, रक्षक, ह्या भूमिकेंमध्ये

**  मातृत्वाला अनुसरुन वात्सल्य, जीव्हाळा, प्रेम, माया, करुणा, त्याग वृत्ती, संसारीक कौटूंबीक ओढ दिली

**  जगदंबा सर्व श्रेष्ठ देवता. तीची तीन रुपे. शक्ती, धन, ज्ञान. हे महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती,  ह्यांच्या प्रतीकात्मक रुपाने दिसते.  जीवनाची त्रीकोणात्मक  रचना व्यक्त करणारी.

**  जन्मताच स्त्रीची सर्वांगीन ताकत जास्त असते. जीवनाच्या प्रत्येक पाऊलावर हे सिद्ध झालेले आहे की तीच्यात प्रचंड क्षमता व उरक शक्ती असते. बौद्धीक, शारीरिक, मानसिक शक्तीमध्ये तीचा वरचढपणा स्पष्ट झालेला आहे.ज्या वेळी संधी मिळाली, तीने आपली योग्यता सिद्ध  केली आहे.

**  स्त्रीचे मात्रत्व ह्याचा पुरुषांनी गैर फायदा घेतला. तीला दुय्यम स्थान दिले. तीला अबला केले अशक्त ठरविले. गरजेच्या चक्रांत अडकलेल्या स्त्रीला गुलाम बनविले. आत्याचार झाले. भोग वस्तू म्हणून तीची संभावना झाली. तीला सौंदर्याचे प्रतिक बनवून शोभेची वस्तू समजले गेले.

**  स्त्री आपले सौंदर्य हेच हत्यार समजू लागली. त्यांत ती फसली. पुरुषाना आकृर्षित करणे ह्यातच तीला मोठेपणा वाटू लागला. सौंदर्य, मादकता ह्या गैरसमजात ती राहीली. ह्याच कारणाने  ताला सतत दुय्यम स्थान मिळत गेले. आपल्या अंगच्या गुणाना ती विसरु लागली. मत्सर, राग इर्षा ह्या गुणाना ती जवळ करु लागली.

**   ज्या ज्या वेळी व्यासपिठ मिळत गेले त्या त्या वेळी तीने आपल्या कर्तव्याची, महानतेची झलक दाखविलीच. महान स्त्रीया प्रत्येक क्षेत्रात चमकल्या. जसे राजकारण, विज्ञान, शिक्षण, अर्थक्षेत्र, अध्यात्म, तत्वज्ञान, गिर्यारोहन, सैनिकी, अशा अनेक क्षेत्रांत त्यानी आपले कर्तव्य सिद्ध केलेले आहे.

**  समानतेच्या विचारांत ती  आजकाल प्रत्येक क्षणी कौटूंबीक आधार न मान्य करता राजश्रय अर्थात कायदे , कानून, ह्यांत गुंतली आहे. कायद्यानी तीला खूपच संरक्षण दिले असले तरी प्रत्येक वेळा ती ते शस्त्र विनाकारण पारजीत आहे. त्यामुळे एक प्रकारचा कौटूंबीक कलह निर्माण होत असल्याचे चित्र दिसू लागलेले आहे.

**   अनेक वर्षांची सहन केलेली दुय्यम जागा दुर्दैवी होती. परंतु ती तो बदल इतका शिघ्र करु इच्छीते , जे घातक ठरेल. तीच्यात सुडबुद्धीची भावना  येत असल्याची जाणीव होणे हे योग्य नाही. सारे चित्र मैत्रीपूर्ण बदलने जरुरीचे आहे. त्यासाठी घैर्य व धिरता असावी हे वाटते.

 

डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com

 

Avatar
About डॉ. भगवान नागापूरकर 2132 Articles
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..