नवीन लेखन...

अर्थसाक्षरता

नुकत्याच एका आंतरराष्ट्रीय संस्थेंने भारतात किती अर्थसाक्षरता किती आहे यावर एक सर्वे केला. खालील निष्कर्ष अतिशय धक्कादायक आहेत.

६७% भारतीय हे इंशुरंन्सला गुंतवणुक समजतात.

सोने हा गुंतवणुकीचा नाही तर हेंजिगचा अॅसेट क्लास आहे हे ९३% भारतीयांना माहीतच नाही.

रिटर्न्स हे महागाईवर मात करणारे हवेत म्हणजे नेमके काय? हे सांगणारे फक्त २% भारतीय निघाले.

म्युचल फंङ मध्ये गुंतवणुक करणारे २२% भारतीय SIP हे एका योजनेच नाव आहे अस समजतात.

अॅसेट अलोकेशन म्हणजे काय हे ८८% भारतीयांना ठाऊक नाही.

६३% लोक हे म्युचल फंङमध्ये गुंतवणुक केल्यावर म्युचअल फंडाची पॉलीसी घेतली अस म्हणतात. ते म्युचअल फंङ म्हणजे इंशुरंन्स मधीलच एक पॉलीसीसारखा प्रकार आहे अस समजतात.

टॅक्स फ्री हा बॉण्ड ८० C प्रमाणे सवलत देतो अस माननारे ७६% भारतीय आढळुन आले.

९२% लोक हे निवृत्तीजीवन आपल्या मुलांच्या भरवशावर सोङतात. जे ८% लोक निवृत्ती जीवनासाठी तरतुद करतात त्यातील ६१% लोकांनी निवृत्तीसाठी इंशुरंन्स पॉलीसीची निवङ केली आहे ज्यात परतावा ४.५% पेक्षाही कमी असतो.

संपुर्ण फायनान्शियल प्लॅनिंग करणाऱ्या व्यक्तीची संख्या ०.०४२% इतकी कमी आढळुन आली.

फक्त भारतात फक्त ५% लोक आरोग्य विमा घेतात. जपान मध्ये ९२% लोकांकङे आरोग्य विमा असुन तेथिल हॉस्पीटल्स मध्ये हा विमा नसेल तर उपचारच करता येत नाही. इतर प्रगतराष्ट्रात हेच प्रमाण ७९% आहे.

भारतात साधारण विमा घेणाऱ्यांची संख्या ३६% असुन त्यात मुदतीचा विमा घेणारे केवळ ७% लोक आढळुन आले. एलआयसी ही भारतातील सर्वात मोठी विमा कंपनी असुन ती ८५ लाख करोङ इतक्या मोठ्या निधीचे व्यवस्थापन पाहते. प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष २४ लाख लोकांना एलआयसी कङुन रोजगार मिळतो. आपल्या गुंतवणुकदारांना ४-५% परतावा देणारी एलआयसी ही भारतातील शेअरबाजारात गुंतवणुक करणारी सर्वात मोठी संस्थागत गुंतवणुकदार आहे .
पोस्टल लाईफ घेणाऱ्यांची संख्या त्या खालोखाल आहे. तिचा परतावा जवळपास ६% इतका आहे.

भारतातील म्युचअल फंङ इंङस्ट्री ही चागंली पारदर्शक असुन व सेबी ही उत्तम नियंत्रक असली तरी भारतातील फक्त ३% लोकच यात गुंतवणुक करतात.म्युचअल फंङ वितरकांचा प्रचंङ अभाव याच प्रमुख कारण असुन त्यांची संख्या संपुर्ण भारतभरात फक्त १.१० लाख इतकीच आहे. त्यातील फक्त २४००० प्रत्यक्ष काम करताना आढळतात. त्यांची वाढ व्हावी यासाठी बाजाराची नियंत्रक सेबी कुठलही पाऊल उचलत नाही. शिवाय त्यांना मोकळेपणाने काम करण्याच स्वातंत्र नाही. म्युचअल फंङ मध्ये एकुण गुंतवणुक ही १४.५ लाख करोङ रु. इतकी आहे.

५४ ईसी बॉण्ड, इंफ्रा बॉण्ड, पीएमएस, कार्पोरेट एफङी इ. फायनान्शियल प्रॉङक्टबद्दल फक्त ९% भारतीयांना माहिती आहेत.

भारतीय शेअरबाजार हा जगातील जुन्या शेअरबाजारा पैकी एक असुनही फक्त ४% लोकच शेअरबाजारात गुंतवणुक करतात. गेल्या ३७ वर्षात तब्बल १५.६८% इतका परतावा सातत्याने देवुनही बहुतांश भारतीय लोक याला सट्टा किंवा जुगार मानतात . भारतातील लोकांपेक्षा परदेशी गुंतवणुकदार येथे जास्त प्रमाणात गुंतवणुक करताना आढळतात. शेअरबाजारात गुंतवणुक ही संस्कृती रुजवण्यात सरकार व नियंत्रक सेबी सपशेल अपयशी ठरले आहेत अस मत सर्व्हे करणाऱ्या तज्ञांनी मांडले.

 

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..