नवीन लेखन...

शेरास सव्वाशेर

एका गावात एक जमीनदार वहात होता. त्याच्याजवळ खूप संपत्ती होती. परंतु तो जेवढा श्रीमंत होता तेवढाच अतिशय कंजूस होता. साधा एक रुपया खर्च करायचा म्हणजे त्याला फार मोठे संकट वाटायचे.

त्याचे घर प्रचंड मोठे होते. काम करायला नोकर- चाकरांची त्याला गरज वाटायची. मात्र नोकरांना पगार देणे त्याच्या जीवावर येई. म्हणून त्याने एक शक्कल लढविली होती. त्याच्याकडे कोणी नोकरी मागायला आला की तो त्याला एक अट घाली. कोणीही नोकरी मागायला आला की जमीनदार त्याला सांगे, ‘ हे पाहा, मी तुझे महिनाभर काम पाहीन व महिना झाला की मी तुला एक प्रश्न विचारेन. त्या प्रश्राचे माझे समाधान होईल असे उत्तर मिळाले तरच मी तुझा पगार देईन. ‘

असे म्हणून तो त्या नोकरांकडून महिनाभर काम करून घ्यायचा व नंतर असे काही विचित्र प्रश्र विचारायचा,की त्या प्रश्राचे त्याला पाहिजे असे उत्तर कोणीच द्यायचा नाही. आणि मग तुला उत्तर देता आले नाही म्हणून तो जमीनदार त्याला पगार देण्याचे टाळायचा. असे अनेक नोकर त्याच्याकडे येऊन गेले व महिनाभर फुकट काम करून निघून गेले.

या जमीनदाराला अद्दल घडविण्याच्या हेतूने शंकर नावाचा एक तरुण नोकर एकदा त्याच्याकडे आला. अटीनुसार त्याने महिनाभर काम केले.
महिन्याच्या शेवटी जमीनदाराने त्याला प्रश्र विचारले, माझ्या डोक्याचे वजन किती असेल?

शंकर म्हणाला, तीन किलो. त्यावर जमीनदार म्हणाला की, चूक, माझ्या डोक्याचे वजन त्यापेक्षा कमी आहे. तुझे उत्तर चुकले आहे. त्यामुळे तू घरी जाऊ शकतोस.

शंकर तेधून निघाला व थोड्या वेळाने एक मोठा सुरा व तराजू आणि तो तोलणारा माणूस घेऊन पुन्हा जमीनदाराकडे आला व त्याला म्हणाला, ‘तुमच्या डोक्याचे वजन तीनच किलो आहे हे माझे उत्तर बरोबर आहे. त्यासाठीच मला तुमच्या डोक्याचे वजन करून पहायचे आहे. तेव्हा मला परवानगी द्या.’

असे म्हणून शंकर सुरा पाजळत त्या जमीनदाराजवळ आला. तो आपले डोके कापून खरेच त्याचे वजन करणार अशी भीती वाटून जमीनदार गयावया करीत शंकरला म्हणाला की, तुझे उत्तर बरोबर आहे. तुझा पगार घेऊन जाऊ शकतोस.

त्यावर शंकर म्हणाला, मला तर माझा पगार द्याच; परंतु आतापर्यंत ज्यांच्याकडून तुम्ही फुकट काम करून घेतले होते त्यांनाही बोलावून त्यांचा पगार द्या.

जमीनदाराने त्याची हीही मागणी मान्य केली. कारण शंकर त्याला ‘शेरास सव्वाशेर’ भेटला होता.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..