नवीन लेखन...

असावे घरकूल आपुले छान….

कुटुंब म्हटले की अन्न, वस्त्र, निवारा या अगदी प्राथमिक गरजा आल्याच. त्यातील निवार्‍याची गरज म्हणजे घराची गरज.

घराची म्हणजे चार भिंती, दारं, खिडक्या आणि डोक्यावर छप्पर. खरं तर घराचे किती विविध प्रकार आहेत पण अजूनही घर म्हटलं की बालपणी चित्रकलेच्या वहीत काढलेले समोर चौकोनी भिंत, भिंतीला मधे दार, बाजूला दोन खिडक्या, वर दोन्ही बाजूने उतरते छपर असंच घर डोळ्यापुढे उभं राहातं. हा जणू ‘घर’ या शब्दाचा सिम्बॉलच.

प्रत्येकाला घर हे सुंदरच हवं असतं. आपली परिस्थिती, आपला आवाका यांच्या बेरीज-गुणाकारात बसणार्‍या स्वत:च्या एका छानशा घराचे स्वप्न प्रत्येकजण जपत असतो. हे स्वप्न तर पूर्ण झाले.. घर तर झाले पण पुढे काय ?

‘आपलं घर’ , ‘माझं घर’ शब्द जरी उच्चारले तरी मनाला केवढा विसावा वाटतो. घर म्हणजे आपलं सर्वस्व. आपण कुठेही बाहेर गेलो, परदेशात गेलो, मोठमोठ्या पंचतारांकित हॉटेल्समध्ये राहून आलो तरी दोन चार दिवस आनंदात जातात पण नंतर कधी एकदा घरी पोहोचतो ही ओढ निर्माण होते.

पंचतारांकित हॉटेल्सच्या खोल्यांप्रमाणे घरातील खोली इतकी सुसज्ज आणि सजवलेली नसते पण चार दिवस फिरून आल्यावर गादीवर पाठ टेकवताना जो आराम मिळतो तो प्रचंड सुखावह असतो. कारण त्यामागे स्वत:च्या घराची, त्यातील स्थैर्याची भावना आधार देणारी असते. तुमचं साधं जुन्या बांधकामाचं घर असो, वनरुम किचन फ्लॅट असो किंवा मोठा बंगला असो. प्रत्येकाला शेवटी आपलं घरच सुख देतं.

तुमचं घर तुम्हाला दिवस रात्र इतकं सुख देतं मग त्या घराची तुम्ही किती काळजी घेता? आपल्या रोजच्या धावपळीच्या जीवनक्रमात स्वत:कडे पहायला वेळ नसतो. तरीसुद्धा घर झाडून पुसून स्वच्छ ठेवलेलंच असतं. पण इतकं पुरेसं असतं का? त्यावर तुम्ही म्हणाल “अहो दिवसभर कितीही आवरलं ना, तरी घरातला पसारा संपतच नाही.” अगदी योग्य आहे तुमचं हे म्हणणं. पण दिवसभर घर आवरायचंच कशाला? रोजचा अर्धा-एक तास खूप झाला. फक्त त्यासाठी नियोजनाची गरज आहे.

प्रत्येकाला आपलं घर खूप सुंदर हवं असतं. आपण बराच खर्च करून घराला आकर्षक इंटिरिअर करून घेतो. अगदी पैसे खर्च करुन इंटिरिअर केले नाही तरीही आपल्या आवडीनुसार घर सजवता येतेच. घर छान सजवलंय पण ते नीटनेटकं ठेवलेलं नाही…. अस्ताव्यस्त पसारा घरभर पसरलेला आहे.. अशा घरात राहताना निश्चितच प्रसन्न वाटणार नाही.

आपल्या घरात आपणच पसारा करतो आणि मग तो पसारा दिवसभर घरातील एकटी स्त्री आवरत असते. स्त्रिया आजकाल कामानिमित्त बाहेर पडतात. मग घर आवरायला वेळ कुठे मिळणार ? घर वेळेवर आवरलं नसलं तर त्या पसार्‍यात आयत्यावेळेला महत्वाच्या वस्तू सापडत नाहीत. मग गोंधळ, चिडचिड आणि वेळेचा अपव्यय…. पुन्हा अव्यवस्थितपणाचा शिक्का तो वेगळाच.

हे सगळं टाळण्यासाठी घर आवरायला मिळतो सुट्टीचा एकच दिवस.. तो म्हणजे रविवार ! म्हणजे विश्रांती नाहीच ! उलट बाहेरच्या कामापेक्षा त्यादिवशी घरातलीच कामं करुन जीव थकून जातो. “पण काय करणार? बरं कंटाळा आला म्हणून कामं टाळून चालत नाही. कामं तर सगळी होणं गरजेचं आहे.

मग त्याचं जर आपण छानसं नियोजन केलं तर ? रविवार खरा सुट्टीचा वार होईल. घर नेहमीसाठी प्रसन्न राहील.

— सौ. निलिमा प्रधान

Avatar
About सौ. निलीमा प्रधान 21 Articles
सौ. निलीमा प्रधान या खाद्यसंस्कृती, वास्तुशास्त्र आणि इतर अनेक विषयांवर लेखन करतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..