नवीन लेखन...

ज्ञानाला विवेकाची जोड

ज्ञानाला विवेकाची जोड असेल तरच त्यातून प्रज्ञा निर्माण होऊ शकते. आणि जोपर्यंत प्रज्ञा ही व्यक्तीच्या व्यावहारिक आणि सामाजिक सुरक्षा आणि विकास यात रूपांतरित होत नाही तोवर ती कोळशामधील आग आहे एवढेच.

केवळ कोळसा खाली ठेवून अन्न शिजणार नाही. तर कोळसा पेटवल्यावर त्यातील अग्नी प्रज्वलित होणार.

त्याचप्रमाणे प्रज्ञा प्रज्वलित केल्यावरच इतर कार्य होऊ शकतात.

ज्याप्रमाणे व्यक्तिगत प्रज्ञा असते त्याचप्रमाणे समाजात देखील सामूहिक ज्ञान आणि सामूहिक प्रज्ञा हा भाग असतो.

हिंदू समाजात व्यक्तिगत प्रज्ञावाले अनेक असून त्यांच्या प्रज्ञा चार वेगळ्या दिशेने धावतात आणि सामूहिक प्रज्ञा हा भागच नाही. या उलट इस्लाम ख्रिश्चन यांच्यामध्ये सामूहिक प्रज्ञा आणि त्यातून स्वजन रक्षा आणि विकास आणि विस्तार हे सूत्र अत्यंत उत्तम रित्या चालते. त्यामुळे समर्थांनी सांगितल्याप्रमाणे “विद्या उदंड शिकला ,प्रसंग मान चुकतच गेला, मग तये विद्येसी कोण पुसे. ” अशी हिंदूंची गती झाली आहे. केवळ विराट ज्ञान चर्चा ,चिंतन आणि भूतकाळातील महानतेचे,भव्यतेचे गुणगान. प्रसंगमान काय होतंय ते बघायचं नाही.

हिंदू बहुल असलेले इंडोनेशिया हिंदू शून्य, मलेशिया हिंदू शून्य, अफगाणिस्तान हिंदू शून्य, पाकिस्तान हिंदू शून्य ,कश्मीर हिंदू शून्य, बांगलादेश हिंदू शून्य, केरळ अर्धा हिंदू शून्य, बंगाल पाव हिंदू शून्य आणि इतर राज्यातल्या अनेक भाग हिंदू शून्य .

1969 साली गुजरात मध्ये सर्व देवस्थानांच्या जमिनी कायदा काढून संपुष्टात आणल्या तसाच कायदा आता भाजपा राजवटीत आणू घातला आहे. कालच त्याच्याविरोधात महसूल मंत्र्यांकडे पत्र दिले. परंतु किती हिंदूंनी हे वृत्त वाचून स्वतःहून विरोधाचे पत्र पाठवले अथवा ईमेल केला? यातूनच दिसते की ज्ञानाचा अभाव.

कारण कित्येकांना असा कायदा येतो हेच माहिती नाही. आणि कायदा येतोय माहिती होऊन देखील काही करायची इच्छा नाही हा विवेकाचा अभाव तर प्रज्ञा येण्याचा प्रश्नच नाही.

राजेश मुधोळकर, ठाणे

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..