तुरटी (Alum/Fitkari):
तुरटीला कोणत्याही परिचयाची गरज नाही. हे एक असे संयुग आहे जे जवळजवळ प्रत्येक घरात सहज आढळते. त्याला इंग्रजीत अलम म्हणतात. हे एक पांढरे, स्फटिकासारखे संयुग असून (पोटॅशियम ॲल्युमिनियम सल्फेट) ते अत्यंत गुणकारी आहे. पाणी शुद्ध करणे, जखमेवरून रक्त थांबवणे, दाढीनंतर त्वचेची काळजी, दुर्गंधी दूर करणे, आणि त्वचेवरील मुरुमे कमी करण्यासाठी याचा उपयोग होतो. यातील अँटी-बॅक्टेरियल गुणधर्मांमुळे हे एक उत्तम नैसर्गिक जंतुनाशक आहे, तसेच हे नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठीही वापरले जाते.
इतिहास:
मानवास सु. ३,०००–४,००० वर्षांपासून तुरटी माहीत असावी असा पुरावा आढळला आहे. प्राचीन ईजिप्तमध्ये मरूद्यानाच्या (ओॲसीसच्या) सभोवती नैसर्गिक स्वरूपातील अशुद्ध तुरटी सापडत असल्याचे व ती शुद्ध करण्याची कृती तेथील लोकांना माहीत होती. तुरटी तयार करण्याच्या कृतीचा पूर्वेतिहास ज्ञात नाही. प्लिनी (इ. स. २३–७९) या रोमन विद्वानांच्या Historia Naturalis या ग्रंथात ‘ॲल्युमेन’ चा (मूळ लॅटिन शब्द अर्थ तुरटी) उल्लेख अनेक लवणांचे मिश्रण असा केलेला आहे. भारतातील लोकांना प्राचीन काळापासून तुरटीचा उपयोग कापडावर रंग पक्का बसविण्याकरिता (रंगबंधक म्हणून) करता येतो हे माहीत होते, असे उल्लेख प्राचीन संस्कृत ग्रंथांत आढळून येतात. तुरटीचा उल्लेख वराहमिहिर (सहावे शतक) यांनी रंगबंधक म्हणून केलेला आहे. भारतात पूर्वी चीनमधून तुरटी येत असे, ती सौराष्ट्रातही तयार करीत असत.
तुरटीची इतर नावे:
तुरटीला संस्कृत भाषेत आढकी, काक्षी, मूत्स्ना, तुवरिका, मृत्तालक व सुराष्ट्रज अशी नावे आहेत. मराठी भाषेत तुरटीला फिटकारी, स्फटिकारी, फटकारी, शिब, झीक फटकी, चकचिन इ. नावे आहेत.
१. पोटॅश तुरटी:
ही सर्व तुरट्यांत महत्त्वाची असून तिची चव गोडसर तुरट व अम्लीय (आंबट) असते. ही तुरटी रंगहीन व गंधहीन असून ती कठीण, दुधी काचेसारखी पारभासी व अष्टकोनी वा घनाकार स्फटिकाच्या स्वरूपात किंवा पांढऱ्या चूर्ण रूपात मिळते. पोटॅश व अमोनियम तुरट्या हवेत स्थिर असतात, पण सोडियम तुरटी हवेने फुलारते आणि तिचे तुकडे होतात.
२. अमोनियम तुरटीचे स्फटिक रंगहीन असून तिला तुरट चव असते.
३. पण सोडियम तुरटी हवेने फुलारते आणि तिचे तुकडे होतात.
तुरटीचे प्रमुख उपयोग
१. पाणी शुद्धी: गढूळ पाण्यात तुरटी फिरवल्यास मातीचे कण खाली बसतात आणि पाणी स्वच्छ होते.
२. रक्तस्त्राव थांबवणे: दाढी करताना कापल्यास किंवा लहान जखम झाल्यास तुरटी लावल्याने रक्त त्वरित थांबते.
३. त्वचा आणि सौंदर्य:
४. मुरुमे: चेहऱ्यावरील मुरुमे आणि काळे डाग कमी करण्यासाठी तुरटी उपयुक्त आहे.
५. दुर्गंधी: अंडरआर्म्सची दुर्गंधी दूर करण्यासाठी तुरटीचा वापर नैसर्गिक डियोडोरंट म्हणून केला जातो.
६. त्वचा घट्ट करणे: त्वचेची छिद्रे घट्ट करण्यासाठी आणि त्वचेला टवटवीत करण्यासाठी तुरटीचा वापर होतो.
७. तोंडाचे आरोग्य: दात दुखी, हिरड्यांची सूज आणि तोंडाचा वास दूर करण्यासाठी तुरटीच्या पाण्याच्या गुळण्य फायदेशीर आहेत.
८. केस: केस धुताना पाण्यात तुरटी मिसळल्यास कोंडा कमी होतो.
९. खबरदारी: त्वचेवर खूप जास्त काळ तुरटी ठेवू नका, यामुळे त्वचा कोरडी होऊ शकते।
१०. उपयोग: कापड आणि लोकर उद्योगात रंगबंधक म्हणूनही याचा वापर होतो.
११. तुरटीच्या पाण्याने गुळण्या केल्यास दात आणि हिरड्यांचे आरोग्य निरोगी राहण्यास मदत मिळू शकते. तुरटीमध्ये अँटी-बॅक्टेरिअल आणि अँटी-सेप्टिक गुणधर्म आहेत, यामुळे तोंडामधील जंतूंचा खात्मा होण्यास मदत मिळते.
१२. तुरटी त्वचेसाठी सुरक्षित आहे. हे त्वचेला घट्टपणा आणते आणि मुरुम आणि डाग कमी करते.
१३. शस्त्रक्रियेनंतर जखमा भरून येण्यासाठी तुरटीचे पाणी उपयुक्त ठरू शकते.
तुरटीच्या उपयोगाच्या कांही धारणा ज्यांना कांही शात्रीय आधार नाही:
तुरटीत अनेक औषधीय गुण असले, तरी तंत्र शास्त्रानुसार, तुरटीचे काही उपाय आपणासाठी लाभदायक सिद्ध होऊ शकतात. तुरटीच्या या उपायांमुळे नैराश्य, नकारात्मकता यांसह अनेक समस्यांतून आपणस मुक्ती मिळू शकते, असे सांगितले गेले आहे.
व्यापार वृद्धीसाठी उपयुक्त:
तंत्रशास्त्रानुसार, व्यापार, व्यवसाय, उद्योग, दुकान, कार्यालय अशा ठिकाणी काही कारणास्तव वारंवार मंदीचा सामना करावा लागत असेल, तर एका काळ्या रंगाच्या वस्त्रात तुरटी ठेवून दुकान, कार्यालय यांच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ वरच्या बाजून बांधावी. असे केल्याने नकारात्मक ऊर्जा हळूहळू नाहीशी होते. निराशेचे मळभ दूर होऊन सकारात्मकतेचा संचार होऊ लागतो. इतकेच नव्हे तर यामुळे व्यापार, व्यवसाय, उद्योगात प्रगती होताना दिसते. तुरटीच्या या उपायामुळे टप्याटप्याने आपल्या सर्व समस्या कमी होऊ लागतात, असे सांगितले जाते.
कलह दूर करण्यासाठी तुरटीचे उपाय:
अनेक कुटुंबामध्ये वारंवार कलह होत असतो. भांडणे वाढत जातात. अशावेळी रात्री झोपताना पलंगाखाली एका भांड्यात पाणी घेऊन त्यात तुरटीचे तुकडे टाकावेत. सकाळी उठल्यावर हे पाणी पिंपळाच्या झाडापाशी ओतून टाकावे. असे केल्याने कुटुंबातील कलहाचे गढूळ वातावरण स्वच्छ होण्यास सुरुवात होते. बाथरूममध्ये तुरटीने भरलेली एक वाटी ठेवावी आणि दर महिन्याला ती बदलावी. याने नकारात्मक ऊर्जा दूर राहते. अनेक प्रयत्न करूनही कर्ज फेडण्यासाठी अपेक्षित यश मिळत नाही, अशा वेळी तंत्रशास्त्रात दिलेले तुरटीचे उपाय उपयुक्त ठरू शकतील, असे सांगितले जाते.
तंत्रशास्त्रानुसार, तणाव कमी करण्यासाठी आठवड्यातून तीन वेळा पाण्यात तुरटी टाकून आंघोळ करावी. तसेच तुरटी आणि मिठाचे पाणी एकत्र करून घराची स्वच्छता केल्यास वास्तुदोष दूर होतो, असे सांगितले जाते. यामुळे नकारात्मकता दूर होते. घरात नवीन ऊर्जा आणि सकारात्मकतेचा संचार होतो, असे सांगितले जाते.
मानसिक ताणावर तुरटीचे उपाय:
तंत्रशास्त्रानुसार, तणाव कमी करण्यासाठी आठवड्यातून तीन वेळा पाण्यात तुरटी टाकून आंघोळ करावी.
टीप: आरोग्याशी संबंधित गंभीर समस्यांसाठी तज्ञांचा सल्ला घ्यावा. वेगवेगळ्या तुरटीचें इतर उवयोग:
१. पोटॅश तुरटीचा उपयोग रंगबंधक म्हणून, आगकाडीचा गुलाव्यतिरिक्त भाग अग्निरोधी करण्यासाठी, पाणी शुद्ध करण्यासाठी इ. कामांसाठी करतात.
२. तुरटीच्या लाहीचा उपयोग चर्मपूरणात परिरक्षक म्हणून, व्रण व जखमा धुण्यासाठी.
३. हिरड्या फुटण्यावर स्तंभक (आकुंचन करणारी) म्हणून, गुळण्या करण्यासाठी, बाह्योपचारात रक्तस्रावरोधी म्हणून.
४. तसेच उत्तर भारतात उंट व म्हशी यांच्या पिण्याच्या पाण्यात मिसळण्यासाठी इ. कामांसाठी वापरतात.
५. अमोनियम तुरटीचा उपयोग पोटॅश तुरटीसारखाच करतात.
६. त्यांशिवाय तिचा उपयोग बेकिंग चूर्णात (भिजविलेल्या पिठात कार्बन डाय–ऑक्साइड निर्माण व्हावा म्हणून यीस्टऐवजी वापरण्यात येणाऱ्या रासायनिक द्रव्यांच्या चूर्णात) करतात.
७. सोडियम तुरटीचा उपयोग पाणी शुद्ध करण्यासाठी, रंगबंधक म्हणून व बेकिंग चूर्णात करतात.
८. क्रोम तुरटीचा उपयोग कातडी कमावण्यासाठी व कापड उद्योगात रंगबंधक म्हणून करतात.
९. फेरिक तुरटीचा रंगबंधक म्हणून आणि औषधी उपयोगासाठी (स्तंभक, गुळण्या करण्यासाठी आणि अंतर्गत रक्तस्राव थांबविण्यासाठी) वापर करतात.
तुरटी वापरण्याचे काही दुष्परिणाम:
१. संवेदनशील त्वचा असलेल्या लोकांना जळजळ आणि खाज येऊ शकते.
२. तुरटी पावडर डोळ्यांत गेल्यास जळजळ होऊ शकते.
३. तुरटीच्या वासामुळे श्वसनाच्या समस्या उद्भवू शकतात.
४. तुरटी गिळल्याने मळमळ, उलट्या आणि इतर पचन समस्या उद्भवू शकतात.
५. तुरटीचा दररोज वापर टाळावा. आठवड्यातून एकदा किंवा दोनदाच त्वचेवर ते वापरणे चांगले.
रासायनिक सूत्र:
आम्ही शाळेत असताना तुरटीच्या रासायनिक सूत्रांच्या प्रश्नांची नेहमी भीती वाटायची कारण एकतर ते अवघड असायचे व दुसरे प्रत्येकात पाण्याचे अणु वेगळे असायचे. पोटॅश तुरटीचे सूत्र K2SO4·AI2(SO4)3·24H2O किंवा KAI (SO4)2·12H2O असे लिहितात. अमोनिया तुरटीचे सूत्र (NH4)2SO4·Al2(SO4)3·24H2O किंवा (NH4)AI(SO4)2·12H2O असे आहे.
डॉ. दिलीप केशव कुलकर्णी
मोबा ९८८१२०४९०४
०१.०५.२०२६


Leave a Reply