नवीन लेखन...

बॉलिवूडची अभिनेत्री सोनाली बेंद्रे

बॉलिवूडची अभिनेत्री सोनाली बेंद्रेचा जन्म १ जानेवारी १९७५ रोजी झाला. सोनालीने करिअरची सुरुवात मॉडेलिंगपासून केली. सोनाली बेंद्रेने अभिनेत्री म्हणून १९९४ मध्ये आलेल्या झालेल्या ‘आग’ सिनेमातून पदार्पण केले होते. सोनालीला उत्कृष्ट नवोदित अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. मात्र, सोनालीचे फिल्मी करिअर काही खास राहिले नाही. तिने अनेक मेगाबजेट आणि मल्टीस्टार सिनेमांत काम केले. सोनाली सिनेमांत हवे तसे यश मिळवू शकली नाही […]

कृष्णधवल सिनेमा काळातील जेष्ठ नटी व गायिका उमा देवी खत्री उर्फ टूनटून

कृष्णधवल सिनेमा काळातील जेष्ठ नटी व गायिका उमा देवी खत्री उर्फ टूनटून यांचा जन्म १ जानेवारी १९२३ रोजी झाला. टूनटून यांचे खरे नाव उमा देवी खत्री होते. १९४०-४५ चा काळ होता, रम्य अशा दिवसातली ती सकाळची वेळ होती, संगीकार नौशादजी आपल्या आशियाना या घरात हार्मोनियमवर गाण्याचे स्वर काळ्या पांढरीच्या शृंगारात बसवत होते. इतक्यात त्यांच्या दारावर थाप पडली. पाठोपाठ आणखी […]

बहुप्रसव लेखक राजा राजवाडे

बहुप्रसव लेखक राजा राजवाडे यांचा जन्म १ जानेवारी १९३६ रोजी देवरूख जवळच्या निवे बुद्रुक येथे झाला. राजा राजवाडे यांच्या वडीलाचं देवरूखला हॉटेल होतं. व पूर्वापार चालत आलेली निवे गावात शेती होती. हा एक कौटुंबिक पार्श्वभूमीचा भाग आहे. बाबांचं मॅट्रिकपर्यंतच शिक्षण, देवरूखच्या‘न्यू इंग्लिश स्कूलमधून झाल्यानंतर, राजा राजवाडे पुढील शिक्षणासाठी मुंबईल आले. राजा राजवाडे यांचे शिक्षण मुंबईतील खालसा कॉलेज […]

रघुनाथ अनंत माशेलकर

वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन महामंडळ या संघटनेचे माजी अध्यक्ष रघुनाथ अनंत माशेलकर यांचा जन्म १ जानेवारी १९४३ रोजी झाला. रघुनाथ अनंत माशेलकर यांना रमेश माशेलकर या नावानेही ओळखले जाते. रघुनाथ माशेलकरांचा जन्म कोकणातल्या माशेल गावाचा. बालपण मुंबईत गेलं. मुंबईतल्या पालिकेच्या शाळेतल्या शिक्षकांनी माशेलकरांचं आयुष्य घडवलं. त्यांच्या आई, हे त्यांचं प्रमुख प्रेरणास्थान! शिवणकाम किंवा मिळेल ते काम करुन माशेलकरांच्या आई […]

ज्येष्ठ संवादिनीवादक अप्पा जळगावकर

तब्बल साठहून अधिक वर्षांच्या तपश्चर्येतून संवादिनी या वाद्याला प्रतिष्ठा मिळवून देणारे आणि अनेक दिग्गज गायक-वादकांना आपल्या अलौकिक प्रतिभेने समर्थ साथ देऊन मैफली रंगविणारे ज्येष्ठ संवादिनीवादक अप्पा जळगावकर यांचा जन्म १ जानेवारी १९२२ रोजी जालना येथे झाला. श्रुतीप्रधान भारतीय संगीतात मिंडयुक्त स्वर आणि श्रुती केवळ सारंगीसारख्या तंतुवाद्यातूनच मिळू शकतात, या कल्पनेने संवादिनीला दुय्यम वागणूक देण्यात येत असताना संवादिनीमधून स्वरविकास […]

जेष्ठ अभिनेते नाना पाटेकर

जेष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचा जन्म १ जानेवारी १९५१ रोजी झाला. नाना पाटेकर यांचे मूळ नाव विश्वनाथ पाटेकर. नाना पाटेकर यांचे वडील दिनकर पाटेकर हे चित्रकार होते. नाना मुंबईतील जे.जे. स्कूल ऑफ आर्ट’चे विद्यार्थी होते. नाना पाटेकर यांनी ’गमन’ या १९७८ मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटातून चित्रसृष्टीत पदार्पण केले. ही भूमिका इतकी छोटी होती की ते प्रेक्षकांच्या नजरेतही आले नाहीत. […]

बॉलिवूडची एक उत्कृष्ट अभिनेत्री विद्या बालन

बॉलिवूडची एक उत्कृष्ट अभिनेत्री विद्या बालनचा जन्म १ जानेवारी १९७८ रोजी झाला. बॉलिवूडची ‘उलाला गर्ल’ म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री म्हणजे विद्या बालन. विद्या बालन लहानपण मुंबई मध्ये गेले. तिला लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. एकदा तिने माधुरी दीक्षितला टीव्हीवर ‘तेजाब’ सिनेमातील ‘एक दो तीन’ या गाजलेल्या गाण्यावर डान्स करताना बघितले आणि तेव्हाच निश्चय केला, की ती अभिनेत्रीच होणार. विद्या डान्स […]

आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या प्रसिध्द चित्रकार प्रफुल्ला डहाणूकर

आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या प्रसिध्द चित्रकार प्रफुल्ला डहाणूकर यांच जन्म १ जानेवारी १९३४ रोजी बांदोडा-गोवा येथे झाला. प्रफुल्ला दिलीप डहाणूकर, माहेरच्या प्रफुल्ला सुब्राय जोशी. प्रफुल्ला डहाणूकर या एक मराठी चित्रकार होत्या. बॉम्बे आर्ट सोसायटी, आर्ट सोसायटी ऑफ इंडिया, आर्टिस्ट्सद सेंटर, जहांगीर आर्ट गॅलरी, नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट, गोवा कला अकादमी आदी अनेक कलासंस्थांच्या त्या अध्वर्यू होत्या. प्रफुल्ला […]

‘उर्दू शायर’, व स्वातंत्र्यसैनिक हसरत मोहानी

‘उर्दू शायर’, व स्वातंत्र्यसैनिक हसरत मोहानी यांचा जन्म १ जानेवारी १८७५ रोजी हसवा गावी (जि. फत्तेपूर) झाला. मौलाना … हसरत मोहानी! संपूर्ण स्वातंत्र्य मागणारी भारत देशातील पहिली व्यक्ती! साहित्य निर्मीतीतून समाजाला योग्य दिशा दाखवून ब्रिटिशांवर कोरडे ओढण्यासाठी अनेकदा कारावास भोगणारे कदाचित एकमेव शायर! सर्वात आधी “संपूर्ण स्वराज्या”ची मागणी करणार्यांचपैकी एक. टिळकांच्या मतासारखी मागणी असलेला. लोकमान्य टिळकांचे खास […]

पुणे शहरातून प्रसिद्ध होणाऱ्या सकाळ वृत्तपत्राचा वर्धापन दिवस

पुणे शहरातून प्रसिद्ध होणाऱ्या सकाळ वृत्तपत्राचा वर्धापन दिवस. सकाळ पुणे शहरातील अव्वल क्रमांकाचे दैनिक असून, त्याच्या आवृत्त्या सोलापूर, कोल्हापूर, मुंबई, नाशिक, जळगाव, औरंगाबाद, व नागपूर या शहरांतूनसुद्धा प्रसिद्ध होतात. सकाळ हे वृत्तपत्र डॉ. नारायण भिकाजी परुळेकर उर्फ नानासाहेब परूळेकर यांनी पुण्यात एक जानेवारी १९३२ रोजी सुरू केले. १९८७ पासून या वृत्तपत्राचा ताबा पुण्यातील उद्योजक प्रताप पवार […]

1 216 217 218 219 220
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..