नवीन लेखन...

नवाकाळ दैनिकाचे संस्थापक संपादक कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर

सांगली हायस्कूलमध्ये कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांचे शिक्षण झाल्यानंतर तेथेच कांही काळ ते शिक्षकही होते. मराठी गद्य रंगभूमीचे जनक, लोकमान्य टिळकांचे सहकारी आणि नवाकाळ दैनिकाचे संस्थापक संपादक असलेल्या कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांचा जन्म २३ नोव्हेंबर १८७२ रोजी झाला. कॉलेजमध्ये शिकत असतांना नाट्यवाङ्मयाचा सूक्ष्म अभ्यास केला. तत्वज्ञान हा त्यांचा खास विषय होता. `सवाई माधवरांचा मृत्यू `हे नाटक लिहून त्यांनी आपल्या […]

ज्येष्ठ रंगकर्मी आणि अभिनेते अवतार किशन हंगल उर्फ ए. के. हंगल

`इतना सन्नाटा क्यों है भाई..?’ या संवादातून सिनेरसिकांचे काळीज पिळवटून टाकणारे `शोले’ चित्रपटातील इमामचाचा रोल केलेले ए. के. हंगल आजही शोले बघताना आपल्याला आठवतात. त्यांचा जन्म १ फेब्रुवारी १९१७ रोजी झाला. सुमारे २५० हून अधिक चित्रपटांमध्ये चरित्र अभिनेत्याची तसेच बुजूर्ग नागरिकाची व्यक्तिरेखा साकारणारे हंगल हंगल यांनी १९७१ साली वयाच्या ५० व्या वर्षी हृषिकेश मुखर्जींच्या गुड्डी या चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पदार्पण […]

मराठीतील प्रसिद्ध लेखक, समाजसेवक, चित्रकार आणि पत्रकार डॉ.अनिल अवचट

डॉ.अनिल अवचट यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील ओतूर येथे झाला. त्यांचा जन्म २६ ऑगस्ट १९४४ रोजी झाला. त्यांनी आपली एम.बी.बी.एस ची पदवी पुणे येथील बी. जे. मेडिकल कॉलेजमधून घेतली. आपल्या महाविद्यालयीन जीवनातही त्यांनी अनेक चळवळींमध्ये भाग घेतला. १९६९ मध्ये त्यांनी आपले पहिले पुस्तक पूर्णिया हे प्रसिद्ध केले. तेव्हापासून त्यांनी अनेक सामाजिक प्रश्नांवर लिखाण केले आहे. आतापर्यंत त्यांची […]

हिंन्दू संस्कृतीतील देवाचा उगम आणि शंकर-पार्वती-गणपती

विश्वातील सर्वात प्राचिन अश्या आपल्या हिंदू धर्मात ईश्वर एकच असला तरी त्याची अनेक रुपं मान्य केली आहेत. ईश्वर निर्गुण निराकार आहे हे मान्य करतानाच हिन्दू धर्माने, ईश्वराला सगुण साकार बनवूनही पुजलं आहे. आपला ईश्वर आपण जसा मुर्ती रुपात साकारतो, श्रद्धेने पुजतो, त्याच आणि तेवढ्याच श्रद्धेने आपण निसर्गातही देव शोधतो. ईश्वर सर्वव्यापी असून अवघे चराचर व्यापून वर दशांगुळे उरतो असं मानणाऱ्या आपल्या पूर्वजांनी, निसर्गातल्या विविध चल-अचल रूपातला ईश्वर स्विकारला त्यात नवल ते काय..! […]

ऋषिपंचमी

ऋषिपंचमी हे व्रत भाद्रपद शुद्ध पंचमी या तिथीला साजरे करतात. कश्यप, अत्रि, भरद्वाज, विश्वामित्र, गौतम, जमदग्नि आणि वसिष्ठ हे सप्तर्षी आहेत. ज्या ऋषींनी आपल्या तपोबलाने जगतातील मानवावर अनंत उपकार करून ठेवले आहेत, मानवाच्या जीवनाला योग्य दिशा दाखविली आहे,त्या ऋषींचे स्मरण या दिवशी केले जाते. मासिक पाळी,अशौच आणि स्पर्शास्पर्श यांचा स्त्रियांवर होणारा परिणाम या व्रताने,तसेच गोकुळाष्टमीच्या उपवासानेही कमी होतो. […]

कुमारी/कोरफड

हिचा वापर आपण घरगुती उपचारांमध्ये सर्रास करत असतो.तशी हि आपल्या सर्वांचीच अगदी जीवाभावाची सखी म्हटले तरी वावगे ठरणार नाही.कारण प्रत्येकाच्या घरात अंगणात हिचे एखादे तरी रोप आढळतेच. हिचे क्षुप ०.३३-०.६५ मीटर उंच असते.पाने ३०-४० सेंमी लांब व ७-१० सेंमी रूंद असतात.हि टोकाकडे निमुळती होत जातात.पाने मांसल असतात त्यांच्या कडा काटेरी असतात व पृष्ठ भागावर पांढरे ठिपके […]

निर्गुण्डी

हि उग्र वासाची गुल्म वनस्पती आहे.हिचे २-४ सेंमी उंचीचे क्षुप असते.ह्याच्या पानांच्या कडा दंतुर अथवा अखंड असतात.पाने मागच्या बाजुस पांढरी लव युक्त असतात व गुळगुळीत असतात.साधारेण पणे एका वृन्तावर ५-१५ सेंमी लांबीच ३-५ पत्रके असतात.फुले लहान व गुच्छ युक्त पांढरी किंवा निळी असतात.फळ गोल व पिकल्यावर काळे दिसते. ह्याचे उपयुक्तांग आहे पाने,बिया,पंचांग,मुळ. आता आपण ह्याचे गुणधर्म […]

गणेश.. तिनच अक्षरांचं वैशिष्ट्य

‘गणेश’ हे नांव तयार करणारी मराठी वर्णमालेतील ‘ग’, ‘ण’ आणि ‘श’ ही तीन अक्षरं अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आहेत. ह्या तिनही अक्षरांमध्ये त्यांचा काना स्वतंत्र, म्हणजे मुख्य अक्षरापासून किंचित अंतर राखून अदबीने उभा आहे. ह्या तिनच अक्षरांचं हे वैशिष्ट्य. ह्या तीन अक्षरांव्यतिरिक्त बाकीची अक्षरं कान्याचा आधार घेऊन किंवा कान्यात गुरफटून किंवा ‘ळ’सारखी काना(कणा)हीन होऊन उभी आहेत.. गणेश नांव […]

आहारसार भाग 7

आहाररहस्य-आहारसार भाग 7 गहू कोकणी माणसांनी, कोकणात तर खाऊ नयेच. पण जिथे पिकतो तिथे सुद्धा तो खावा की नाही, अशी परिस्थिती आहे. या संदर्भात काही गोष्टींची माहिती जरूर असावी. 1.भारतात सर्वात जास्ती गव्हाचे उत्पादन पंजाब, हरयाणा मधे होते. 2. भारतात सर्वात जास्ती रासायनिक खते आणि विषारी कीटकनाशके पंजाब मधे वापरली जातात. 3. भारतात सर्वात जास्त कॅन्सर […]

१७ – दीनदयाळू अतिव कृपाळू

दिनदयाळू अतिव कृपाळू हे श्रीगणराया होउन कनवाळू, बालावर ठेव छत्रछाया ।।   आत्मतुष्ट मी, नीतिभ्रष्ट मी, अति मी गर्विष्ठ स्वार्थपूर्ति मोहिनी चेटकिण, करते आकृष्ट यत्न न केले परमार्थाच्या मर्मा जाणाया ।।   कळत-नकळतां पळत राहिलो मृगजळ पाहुन मी हात रिक्त, विषयासक्ती झाली ना परी कमी उशीर झाल्यावर उमगे –  जीवन गेले वाया ।।   पश्चात्तापीं दग्ध […]

1 3 4 5 6 7 27
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..