नवीन लेखन...

मुंडण

मुंज, उपनयन, व्रतबंध हा सोळा संस्कारांपैकी दहावा संस्कार आहे. या संस्कारानंतर मुलगा गुरुग्रही विद्यासंपादनासाठी पाठवण्यात येतो. या संस्कारात एक विधी महत्वाचा आहे तो म्हणजे मुंडण. मुंडण का करायचे? याला शास्त्रीय आधार पुरातन ग्रंथात दिसत नाही, परंतु हि क्रिया उपनयन संस्कारमध्ये अनिवार्य आहे, त्याचा अर्थ जाणून घेण्याचा हा प्रयत्न आहे. पुरातन काळी गुरुकुल मधील सर्व मुले दररोज […]

हृदयरोग व आहार

हृदयाचा ठोका चुकला किंवा हृदयाची धडधड वाढली हे वाक्प्राचार आपल्या भावना व्यक्त करीत असतात. हा हृदयाचा लयबध्द ठेका जर चुकायला लागला, ताल बिघडला, तर आयुष्यात बरीच गडबड सुरु होते. प्राणवायूयूक्त रक्त संपूर्ण शरीराला पुरविण्याचे काम हृदयाचे असते. रक्तवाहिन्या रक्त वाहून नेतात . हृदयातील व निलांमधील झडपा सतत उघडझाप करीत असतात व त्यामुळे हे कार्य व्यवस्थित सुरु […]

स्मरणशक्ती वाढीसाठी

अगस्त्यच्या बियांची पूड तीन ग्रॅम ते दहा ग्रॅम पर्यंत गाईच्या धरोष्ण २५0 ग्रॅम दुधासोबत सकाळ-संध्याकाळ काही दिवसापर्यंत घेतल्याने स्मरणशक्तीत वाढ होते. शंखपुष्पीची ३-६ ग्रॅम पूड मधात घालून चाटावी आणि वरून दूध प्यावे. याच्या सेवनाने बुद्धीचा योग्य विकास होतो. ३-६ ग्रॅम शंखपुष्पी पूड साखर आणि दुधाबरोबर नेहमी सकाळी घेतल्याने स्मरणशक्ती वाढते. शंखपुष्पी २-४ ग्रॅम आणि वचा १ […]

नौशाद अली

हिंदी चित्रपटसंगीताचा सुवर्णकाळ ज्याला म्हटलं जातं त्याची सुरुवात नौशादजींनी केली. त्यांचा जन्म २५ डिसेंबर १९१९ रोजी झाला. नौशादजींनी १९४२ च्या शारदा पासून १९६८ च्या संघर्ष पर्यंत २६ वर्षात ५ हिरक महोत्सवी रतन, अनमोल घडी, बैजू बावरा, मदर इंडिया आणि मुघल-ए-आझम, १२ सुवर्णमहोत्सवी आणि तब्बल ३५ रौप्यमहोत्सवी चित्रपटाना संगीत दिले. त्यांच्या हिरक महोत्सवी चित्रपटांची नावं बघीतली तर पहिले दोन चित्रपट […]

अटल बिहारी वाजपेयी

अटल बिहारी वाजपेयींचा जन्म २५ डिसेंबर १९२४ रोजी झाला. अटलबिहारी वाजपेयी यांनी कानपूरमधून राज्यशास्त्रात एम.ए.ची पदवी मिळविल्यानंतर वाजपेयी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पूर्णवेळ कार्यकर्ता झाले. त्यांनी राष्ट्रधर्म, वीर अर्जुन आणि पांचजन्य या नियतकालिकांत पत्रकारिता केली. भारताच्या स्वातंत्र्यसंग्रमाताही ते सहभागी झाले. त्यांची राजकीय कारकीर्द म. गांधींच्या ‘चले जाव’ चळवळीपासून सुरु झाली. स्वातंत्र्यानंतर १९५१ मध्ये स्थापन झालेल्या ‘भारतीय जनसंघ’ या पक्षाच्या उभारणीत त्यांचा […]

चंद्रकांत रघुनाथ गोखले

चंद्रकांत रघुनाथ गोखले यांचा जन्म ७ जानेवारी १९२१ रोजी मिरज येथे झाला. हे मराठी नाट्यअभिनेते व चित्रपट अभिनेते आणि गायक होते. मराठी अभिनेत्री कमळाबाई गोखले या यांच्या आई होत्या. यांचे पुत्र मा.विक्रम गोखले हेदेखील अभिनेते आहेत. यांनी वयाच्या नवव्या वर्षी ’पुन्हा हिंदू’ या नावाच्या मराठी नाटकाद्वारे अभिनयक्षेत्रात पदार्पण केले. ७ दशकांहून अधिक काळाच्या कारकिर्दीत यांनी साठाहून अधिक मराठी नाटकांतून […]

मराठी लेखिका डॉ.सरोजिनी कृष्णराव बाबर

लोककला व लोकसंस्कृती या विषयांवर लिहिणार्या नावाजलेल्या मराठी लेखिका डॉ.सरोजिनी कृष्णराव बाबर यांचा जन्म ७ जानेवारी १९२० रोजी झाला. डॉ.सरोजिनी कृष्णराव बाबर यांनी मुंबई विद्यापीठातून बी.ए. पदवी मिळवली. पुढे त्यांनी एम.ए. व पीएच्‌.डी. पदव्याही मिळवल्या. “Contribuiton of Women writers in Marathi Literature” या प्रबंधावर त्यांनी पीएच्‌.डी. ही पदवी संपादन केली. स्वातंत्र्यपूर्व काळात स्वातंत्र्य चळवळीत त्यांनी भाग घेतला होता. महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीचा […]

नवरात्र स्पेशल

आजपासून देशभरात नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली आहे. मोठया प्रमाणात भाविक नऊ दिवस देवीचे व्रत व उपवास ठेवतात. व्रताच्या वेळी शरीराचं डिटॉक्सिफाय होणं खूप गरजेचं असतं. म्हणजे आपल्या शरीरातील सर्व विषारी द्रव्य बाहेर निघतील. पावसाळ्यात पित्त वाढतं, पचनक्रिया कमजोर होते. त्यामुळं उपवासानं पित्त कमी होण्यास मदत होते आणि पचनक्रियाही सुधारते. जर आपण ९ दिवस व्रत/उपवास ठेवणार असाल […]

प्रभाकर जोग

प्रभाकर जोग त्यांचा जन्म २५ डिसेंबर १९३२ रोजी झाला. प्रभाकर जोग यांचे वडील साखर कारखान्यांच्या तंत्रज्ञानातील जाणकार होते. आई-वडिलांपकी कोणी कलेच्या प्रांतात नव्हते, मात्र वडिलांना संगीत नाटकांची पहिल्यापासून आवड होती. पुण्याजवळच्या मांजरा फार्म येथे उमेदवारी करीत अस्ताना बालगंधर्वाचें नाटक पुण्यात आले की वडील सायकलवरून बारा किलोमीटरची रपेट करून पुण्यात येत असत, रात्रभर नाटक पाहून, परतीची सायकलवारी करून पुन्हा दुसऱ्या […]

1 25 26 27 28 29 43
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..