दुष्टपणा
दगड टाकतां पाण्यावरी, तरंगे त्याची दिसून आली । दगड होई स्थीर तळाशी, बराच वेळ लाट राहीली…१, जेव्हा कुणीतरी क्रोध करी, वातावरण दूषित होते । क्रोध जातो त्वरीत निघूनी, दूषितपणा कांहीं काळ राहते…२, निर्मळपणा दिसून येई, स्थिर होवून जातां जल । पुनरपि पडता खडा क्रोधाचा, सारे होवून जाते गढूळ…३, स्थिर होण्यास वेळ लागतो, गढूळ होई क्षणांत मन […]