नवीन लेखन...

किमान लग्न तरी वेळेवर लावा!

लग्न किती उशिरा लागले हे कळावे एवढ्याचसाठी लग्नाचा मुहूर्त काढल्या जात असावा. खरेतर एखादा विशिष्ट मुहूर्त जेव्हा काढला जातो तेव्हा त्याचा अर्थ त्यावेळी त्या शुभकार्यासाठी ठाह-योगाचे पाठबळ वधू-वराच्या पाठीशी असते. लग्नाचा मुहूर्त काढणारे ही श्रद्धा बाळगूनच असा मुहूर्त निश्चित करीत असावेत आणि तशी त्यांची श्रद्धा असेल तर त्यांनी त्या विशिष्ट मुहूर्तावर लग्न लावलेच पाहिजे.
[…]

हिरा आणि काच!

चकाकणाऱ्या वस्तूला सोने समजण्याचा मोह सगळ्यांनाच कधी ना कधी होत असतो. त्यामुळे प्रत्येकाला कधी ना कधी या फसवणुकीला तोंड द्यावेच लागते. आपल्या वैयत्ति*क आयुष्याचे आणि समाजाचेही सर्वाधिक नुकसान अशा नकली काचेच्या तुकड्यांमुळेच होत असते.
[…]

छोट्या पडद्याचे प्रदुषण !

सुदृढ, निकोप आणि यशस्वी आयुष्य जगण्यासाठी सकारात्मक आणि चांगले विचार आपल्यापर्यंत पोहोचणे गरजेचे असते. दुर्दैवाने आज जे विचार विविध माध्यमांतून लोकांपर्यंत पोहोचविले जात आहेत ते कमालीचे नकारात्मक आणि विषात्त* आहेत. या वैचारिक प्रदूषणासाठी सर्वाधिक जबाबदार आहे तो ‘इडियट बॉक्स’ अर्थात छोटा पडदा!
[…]

नाव नक्षल्यांचे चांगभले अधिकार्‍यांचे!

गडचिरोली-चिमूर आणि भंडारा-गोंदिया मतदारसंघात आणि विशेषत: त्या मतदारसंघातील नक्षलप्रवण क्षेत्रात मतदान हे पवित्र वातावरणात किंवा कर्तव्य म्हणून नव्हे तर दहशतीच्या वातावरणात पार पडले. या मतदारसंघातील मतदानाची टक्केवारी इतर मतदारसंघातील मतदानापेक्षा अधिक राहिल्यामुळे पोलिस आणि प्रशासन खूश असले तरी हा प्रकार योग्य नव्हता. भीती दाखवून किंवा दडपशाही करून मतदारांना बाहेर काढायचे असेल तर मग नक्षली आणि पोलिसांमध्ये फरक तो काय राहिला?
[…]

निष्ठेची किमत!

जीवनात तत्त्वांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. तत्त्वं नसती आणि त्यांचे पालन करणारी माणसे नसती तर माणुसकी हा शब्दही कदाचित जन्माला आला नसता. दुर्दैवाने अलीकडच्या काळात तत्त्वांना अडगळीत टाकून स्वार्थ साधून घेणाऱ्या लोकांना खोटी का होईना प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे.
[…]

पेराल ते उगवणारच !

आपला शेजारी देशही असाच सूडाच्या भावनेने पेटलेला आहे. केवळ भारताला धडा शिकविण्यासाठी या शेजारी देशाने आतंकवादाच्या आगीचा खेळ करायला सुरूवात केली. एका मर्यादेपर्यंत त्यात तो देश सफलही झाला, परंतु आता त्या देशाने पेटविलेल्या आगीचे चटके त्यांनाच सहन करावे लागत आहेत.
[…]

उत्साह हरवला!

खरेखुरे परिवर्तन घडविण्याची क्षमता कोणत्याही विद्यमान पक्षामध्ये, नेत्यामध्ये नाही, नव्या वाटा चोखाळण्याची धमक कुणी दाखवत नाही आणि कुणी तशी धमक दाखवत असेल तर इतर सगळे मिळून त्याची शिकार करतात, या सगळ्या पृष्ठभूमीवर लोकांमधला निरूत्साह वाढत असेल तर खरोखरच गंभीरपणे विचार करण्याची वेळ आली आहे.
लोकसभा निवडणूक आता अगदी हाकेच्या अंतरावर येऊन ठेपली आहे. बहुतेक सगळ्या पक्षांचे उमेदवार घोषित झाले आहेत.
[…]

नटव्यांची लोकशाही!

राजकीय पक्षांनीच आपले उमेदवार निवडताना त्याचा त्या मतदारसंघाचा अभ्यास, त्याचा जनसंफ, मतदारसंघातील प्रश्नांबद्दल त्याला असलेली जाण आणि विकासाबद्दलची त्याची तळमळ या गोष्टींचा विचार करूनच उमेदवारी द्यायला हवी. सगळ्याच राजकीय पक्षांनी हे पथ्य पाळले तर निवडून येणारा उमेदवार, मग तो कोणत्याही पक्षाचा असला तरी त्या मतदारसंघाचा योग्य प्रतिनिधी ठरेल; परंतु दुर्दैवाने तसे होत नाही.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध पक्षांमध्ये सुरू असलेले युत्या-आघाड्यांचे राजकारण आता जवळपास शेवटाला गेले आहे.
[…]

तीन पायांची शर्यत!

‘दि ठोट इंडियन सर्कस’ अशा सार्थ शब्दांत ज्या प्रक्रियेचे वर्णन केले जाते, त्या लोकसभा निवडणूक प्रक्रियेस सुरुवात झाली आहे. निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम घोषित करणे आणि मतमोजणीनंतर नवे सरकार सत्तारूढ होणे, असा साधारण तीन महिन्यांचा हा सोहळा असतो. निवडणूक आयोगाने पंधराव्या लोकसभेच्या निवडणूक कार्यक्रमाची घोषणा केली आहे.
[…]

डॉक्टरांनो धंदा करता जोखीमही स्वीकारा!

रुग्णांच्या नातेवाईकांकडून डॉक्टर्स तसेच रुग्णालयातील इतर कर्मचारी वर्गाला मारहाण होण्याचे प्रकार अलीकडील काळात खूप वाढले आहेत. या घटना बहुधा सरकारी इस्पितळाच्या संदर्भातच असतात. अशी एखादी घटना घडली की लगेच त्या इस्पितळात असतील नसतील तेवढे सगळे कर्मचारी काम बंद आंदोलन करतात.
[…]

1 6 7 8 9
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..