नवीन लेखन...

दिशाहीन संवेदनशीलता!




प्रकाशन दिनांक :- 24/08/2003

‘नेमेचि येतो मग तो पावसाळा’ या उक्तीप्रमाणे येण्या-जाण्याची सराईत नियमितता पाळणारा स्वातंत्र्यदिन आला आणि गेलाही. 56 वर्षाच्या वहिवाटीने निर्माण झालेला तोच तोचपणा वगळता बाकी नवीन काही नव्हते. जिथे स्वातंत्र्यच दीन झाले आहे तिथे स्वातंत्र्यदिनात तरी उत्साह कुठला म्हणा! एक औपचारिकता, उरकून टाकायचा एक उपचार, या पलीकडे या दिवसाचे ना महत्त्व उरले ना औचित्य. स्वातंत्र्य संठाामात ज्यांनी प्रत्यक्ष भाग घेतला ती पिढी आता अस्तंगत झाली आहे. जे काही थोडेफार लोकं उरले आहेत ते हताश डोळ्यांनी स्वातंत्र्याचे निघालेले धिंडवडे पाहण्यापेक्षा अधिक काही करू शकत नाहीत. आजची पिढी स्वातंत्र्यातच जन्मली. स्वातंत्र्य मिळविण्यासाठी मागच्या पिढ्यांना काय यातना सोसाव्या लागल्या, याची जाणीव त्यांना असणे शक्य नाही. इतिहासाच्या पुस्तकाची लाख पारायणे केली तरी जाज्वल्य देशप्रेमाची जी धग मागच्या पिढ्यांनी अनुभवली, अनुसरली ती या पिढीत उतरु शकत नाही. छातीवर लाठ्या झेलण्याची, बंदूकधाऱ्या शिपायांसमोर निधड्या छातीने उभे राहण्याची प्रेरणा देणारी अतिव समर्पणाची भावना स्वातंत्र्योत्तर काळात क्रमश: लोप पावत गेली आणि आज तर ही भावना ऱ्हास होण्याच्या कडेवर उभी आहे.
मात्र मागच्या पिढ्यातील लोकं संवेदनशील होते आणि आज ती संवेदनशीलता लोप पावली आहे, असेही म्हणता येणार नाही. लोकं आजही संवेदनशील आहेत, परंतु ही संवेदनशीलता नेमकी कोणत्या संदर्भात जागृत असावयास हवी याची संवेदना मात्र हरविली आहे. बँक, रेल्वे, बस सेवा अगदी डॉक्टर्स मंडळीसारखे सेवाभावी कार्यातील लोकं अगदी एका रात्रीतून देशव्यापी संप घडवून आणू शकतात. ही मंडळी संवेदनशील असल्याशिवायच का हे शक्य होते? परंतु या लोकांच्या असल्या संवेदनशीलतेने फायदा कुणाचा होतो? फायदा कुणाचा होतो म
हणण्यापेक्षा, ज्या मातीत हे जन्माला आले, ज्या मातीने यांना जगण्याचा अधिकार दिला, ज्या मातीने यांच्या तसेच

यांच्या कुटुंबीयांच्या पोटापाण्याचा प्रश्न सोडवला,

त्या मातीला, त्या देशाला यांची संवेदनशीलता कितपत उपयुक्त ठरते? लोकं कोणत्याही प्रश्नावर पेटून उठतात. लोकांच्या भावना इतक्या उथळ आहेत की, त्या भडकवायला ठिणगीचीही गरज भासत नाही आणि त्यातली दुर्दैवाची बाब ही आहे की, ज्या प्रश्नावर खरोखर पेटून उठायला पाहिजे त्या प्रश्नावर बोलायलादेखील कुणाजवळ सवड नसते.
स्वातंत्र्यदिन नुकताच पार पडला. आता काही दिवस ठिकठिकाणी स्वातंत्र्यदिन किती उत्साहात पार पडला, त्यानिमित्त कोणते कार्यक्रम झाले, कोणत्या नेत्याने झेंडा फडकवला याच्या रसभरीत सचित्र बातम्या साऱ्याच वर्तमानपत्रात छापून येतील. सोबतच, राष्ट्रध्वजाचा कुठे कसा अपमान झाला याही बातम्या असतील. राष्ट्रध्वजाच्या अपमानाने प्रक्षुब्ध झालेले लोकं पोटतिडकीने निषेध व्यक्त करतील. क्रांतिकारकांचे दाखले देत स्वातंत्र्याची किंमत सांगायचा प्रयत्न करतील; चांगली गोष्ट आहे. राष्ट्राप्रती, त्याच्या सन्मानाप्रती प्रत्येकाने जागरूक असायलाच पाहिजे, परंतु ही जागरूकता पाखंडी असायला नको. दुर्दैवाने ती तशीच असते. राष्ट्रध्वजाच्या अपमानापोटी घसा खरवडणाऱ्या या लोकांचे राष्ट्रप्रेम वर्षातून केवळ दोन दिवस ऊतू जाते. वर्षातील उर्वरित 363 दिवस या लोकांचे राष्ट्रप्रेम कुठे लोप पावते, कुणास ठाऊक?
आपल्याकडे काही गोष्टींना अवास्तव महत्त्व दिले जाते. त्यामुळे बरेचदा मूळ हेतू बाजूलाच राहतो. राष्ट्रध्वज हे राष्ट्राच्या सन्मानाचे प्रतीक आहे हे मान्य, परंतु प्रतिकाचा सन्मान म्हणजेच राष्ट्राचा सन्मान किंवा प्रतिकाचा अपमान म्हणजे देशद्रोह असे सरसकट म्हणता येणार नाही. राष्ट्रध्वजाच्या अपमानाच्या घ
ना बरेचदा घडतात आणि त्यातील बहुतांश घटना या अपघाताने घडलेल्या असतात, परंतु हे समजून घेतल्या जात नाही. या चुकून घडलेल्या अपघाताचे भांडवल केल्या जाते. देशप्रेम कशाशी खातात हेही ज्यांना माहीत नाही असे लोक रस्त्यावर उतरतात, निदर्शने होतात, मोर्चे निघतात, राष्ट्रीय संपत्तीची नासधूस केली जाते. आपले बेगडी राष्ट्रप्रेम प्रगट करण्याची संधी काही लोकांना मिळते आणि त्याचा ते पुरेपूर लाभ उचलतात. आपली देशभक्ती सिध्द करण्याचा एकच मापदंड आपल्या देशात आहे आणि तो म्हणजे समोरची व्यक्ती देशद्रोही असल्याचे दाखवून देणे. ‘भला उसकी कमिज मेरे कमिज से सफेद कैसी,’ म्हणणारे लोकं आपली कमिज सफेद करण्याऐवजी समोरच्याची कमिज घाणेरडी कशी करता येईल, या उद्योगाला लागतात. आपल्याकडे राष्ट्रध्वजाच्या संदर्भातले नियम खूप कडक आहेत आणि लोकांच्या भावनादेखील त्याबाबतीत नको तितक्या टोकाच्या आहेत. पृथ्वीच्या पाठीवरील सर्वात बलवान राष्ट्रात, अमेरिकेत मात्र मला वेगळाच अनुभव आला. अमेरिकेत राष्ट्रध्वज कुणीही, कधीही आणि कुठेही लावू शकतो. बरेचदा तर ते फाटतातदेखील. एका ठिकाणी तर चक्क छतावरची उडालेली पाण्याची टाकी झाकण्याकरिता चोहोबाजूने राष्ट्रध्वजाचा वापर केलेला मी पाहिला. विशेष म्हणजे ते राष्ट्रध्वजही फाटले होते. कदाचित राष्ट्रध्वजाच्या बाबतीत तेथील नियम कडक नसतील. होऊ शकते त्यांना राष्ट्रध्वजाचे पावित्र्य आपल्या इतके कळलेले नसेल. राष्ट्रध्वजाचा आदर कसा करावा हेदेखील त्यांना कळत नसेल. पण याचा अर्थ अमेरिकी नागरिकांमध्ये राष्ट्रभक्तीची भावनाच नाही, असा नव्हे. राष्ट्रप्रेमाने भारलेल्या लोकांशिवाय एखादे राष्ट्र बलवान होऊच शकत नाही आणि अमेरिका हे किती शक्तिशाली राष्ट्र आहे, हे सांगण्याची गरज नाही. ज्या देशातील जनता अपघाताने घडलेल्या राष्ट्रध्वजाच्या अनादरावर प
टून उठते त्या भारत नामक देशाला आज जगात कुठलेच स्थान नाही आणि ज्या देशातील लोकांना भारतीय निकषांनुसार झेंडा कुठे, कसा फडकवावा हेदेखील कळत नाही, ती अमेरिका आज जगातील सर्वात बलाढ्य राष्ट्र म्हणून ओळखले जाते. या दोन देशाच्या स्थितीतील या फरकाचे कारण देशभक्तीच्या व्याख्येतील फरकात दडले आहे. आमच्यासाठी तिरंग्याची शान त्याच्या काटेकोर नियमाने फडकण्यापुरती मर्यादित आहे तर अमेरिकन आपल्या राष्ट्रध्वजाची शान आपल्या देशाचा विकास साधून आपल्या देशाला बलाढ्य करून वाढवित आहेत.
आपले राष्ट्र, आपला राष्ट्रध्वज, आपली राष्ट्रीय चिन्हे, आपले राष्ट्रपुरुष सगळ्यांनाच प्रिय असतात. सगळ्यांनाच त्यांच्या

बाबतीत आदर असतो. सगळेच त्यांची शान जपण्याचा प्रयत्न करतात. आपणही

करतो. आपणही या सगळ्यांच्या बाबतीत संवेदनशील असतो, परंतु आपली चूक इथेच होते की, आपण प्रतिकांना नको तितके जपतो आणि ही प्रतिके ज्या विशाल, व्यापक संकल्पनेचे प्रतिनिधित्व करीत असतात त्या संकल्पनेचा मात्र पदोपदी अनादर करीत असतो. आपण राष्ट्रध्वजाचा सन्मान करतो, पण राष्ट्राचा विचार करीत नाही. आपण राष्ट्रीय पुरुषांच्या पुतळ्यांची, तसबिरींची अवमानना होताच पेटून उठतो, परंतु या पुरुषांच्या विचारांचा, तत्त्वांचा सरेआम मुडदा पाडताना आपल्याला काहीच वाटत नाही. ‘मेरा भारत महान’ ही घोषणा क्षणभर आपल्या अंगावर रोमांच उठवून जाते आणि दुसऱ्याच क्षणी ‘यहां थुंकना मना है’ च्या पाटीखाली आपण रंगीत पिचकारी टाकतो. राष्ट्रध्वजाचा अपमान झाला, संबंधिताला समज देऊन भागणार नाही, त्याच्यावर गुन्हाच दाखल व्हायला पाहिजे, असा आमचा आठाह असतो आणि काळाबाजार करणारे; भ्रष्टाचारी, देशाच्या संपत्तीची भरदिवसा लूटमार करणारे उजळमाथ्याने फिरतात तेव्हा मात्र आमचे देशप्रेम लाचार होऊन गप्प बसते. शेतकरी, कष्टकरी, उद्योजक असह
ाय्य होऊन आत्महत्या करताहेत, परंतु आमच्या संवेदनांना त्याची दखल घेण्याची गरज वाटत नाही. कारण परवाच आम्ही सरकारी नियमांचे काटेकोर पालन करीत राष्ट्रध्वज फडकावला, जमेल तसे राष्ट्रगीत म्हटले, एक सणसणीत सलामी दिली आणि त्या राष्ट्रध्वजासोबतच डौलाने आमची देशभक्ती फडफडली. इकडे खाली काय होत आहे, त्याची आम्हाला काळजी नाही. आम्ही राष्ट्रध्वज नियमानुसार फडकावला की आम्हाला देशभक्तीचे प्रमाणपत्र मिळाले. शेतकरी मरतोय हरकत नाही, उद्योगधंदे डुबताहेत काळजी नाही, विदेशी कंपन्या नंगा नाच घालताहेत, घालू द्या; भ्रष्टाचाऱ्यांना रान मोकळे मिळाले आहे, चालू द्या; उगाच आमची झोपमोड करू नका! हं, कुठे मंदिराची विटंबना झाली, कुठे मशिदीवर रंग पडला, कोणत्या धर्मठांथाचा अपमान झाला किंवा एखाद्या पुतळ्याला कोणी काही फासले की ताबडतोब सांगा, उभा देश पेटवून देऊ! आखिर सवाल प्रतिकों के सम्मान का है, उनकी अवमानना हम सहन नहीं करेंगे.
आमची संवेदनशीलता अशी दिशाहीन आहे. मनात क्रोध आहे, पण तो नको तिथे व्यक्त होणारा. मनात शांती आहे, परंतु ती सुध्दा नको तिथे आपले अस्तित्व दाखविणारी. मनात उत्साह आहे, पण तो भलतीकडेच ओसंडून वाहतोय. मनात देशभक्ती आहे, पण ती केवळ भक्ती म्हणून उरली आहे. देश कुठेतरी गहाण आहे.

— प्रकाश पोहरे

Wilde is one of a dozen or so authors who is so strongly associated with quotations, that they maths homework answers online are frequently credited with sayings that actually belong to other people

Avatar
About प्रकाश पोहरे 436 Articles
श्री. प्रकाश पोहरे हे विदर्भातील “देशोन्नती” या लोकप्रिय दैनिकाचे मालक तसेच मुख्य संपादक आहेत. त्यांचे “प्रहार” या सदराअंतर्गत संपादकीय लेख फार लोकप्रिय आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..