नवीन लेखन...

क्षमतेचा ऱ्हास !




गरज ही शोधाची जननी म्हटली जाते. अगदी आदिम अवस्थेत असल्यापासून माणूस त्या अर्थाने ‘गरजवंत’च होता. संरक्षण आणि उपजीविका या दोन गरजांनी माणसाला त्याच्या नैसर्गिक क्षमतेपेक्षा अधिक काहीतरी मिळविण्यासाठी प्रेरित केले. सुरुवातीच्या काळात त्याचा बौद्धिक विकास फारसा गतिमान नव्हता. खरेतर हा सुरुवातीचा काळ तसा खूप मोठा होता. पुढे कधीतरी लाखो वर्षांनंतर त्याला आगीचा शोध लागला. त्यानंतर चाकाचा आणि मानवी प्रगतीने हळूहळू गती घ्यायला सुरुवात केली. या शोधांचा उपयोग करून मानवाने आपले भौतिक आयुष्य सुखकर करण्याचा प्रयत्न केला. पुढे हजारो वर्षांनंतर वाफेच्या इंजिनाचा शोध लागल्यावर मानवाच्या या शोधयात्रेला खऱ्या अर्थाने गती मिळाली. खरेतर मानवी प्रगतीच्या दृष्टीने हे विविध शोध तसे उपकारकच ठरले. जगण्याचा संघर्ष त्यामुळे सहनीय झाला; परंतु या शोधांमुळे एक नुकसान निश्चितच झाले. माणूस हळूहळू परावलंबी होऊ लागला. यंत्रांचा किंवा इतर बाह्य सुविधांचा वापर मानवी क्षमतांना पूरक ठरला असता तर फारशी काळजी करण्याचे कारण नव्हते; परंतु तसे होत नाही. यंत्रांच्या वापरामुळे मानवी क्षमतांचा हळूहळू ऱ्हास होत आहे. हा ऱ्हास केवळ शारीरिक क्षमतेपुरता मर्यादित नाहीतर त्याच्या मानसिक आणि बौद्धिक क्षमतेवरही विपरीत परिणाम होत आहे. कॅलक्युलेटरचा शोध लागण्यापूर्वी प्राथमिक शाळांमध्ये पावकी-दीडकी तसेच 99 पर्यंत पाढे शिकवले जायचे. ते वापरून लोक मोठमोठी आकडेमोड क्षणार्धात करायचे. मात्र कॅलक्युलेटर आल्यानंतर साध्यात साधी बेरीज, वजाबाकी, गुणाकारही आता कठीण वाटतात. स्वत: काही करण्यापेक्षा कुणाकडून तरी करून घेण्याकडे मानवाचा कल वाढत आहे. देशात सेवाक्षेत्राचा मोठ्या प्रमाणात विकास होण्यात लोकांमध्ये बळावत चाललेल्या या मानसिकतेचा मोठा हिस्सा आहे. जे काम एरवी आपण सहज
रू शकलो असतो तेच इतर कुणाकडून करून घेण्यात आपल्याला मोठेपणा वाटू लागला आहे. ड्रायव्हर आला नाही म्हणून पोहोचायला उशीर झाला हे कारण आता

सहज खपून जाते. साधं

एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायचे झाले तरी बऱ्याच लोकांना ड्रायव्हरच्या कृपेवर अवलंबून राहावे लागते. स्वत: ड्रायव्हिंग शिकला असता तर ही अडचण आली नसती. परंतु दुसऱ्यांवर अवलंबून राहायची किंवा आपल्या सुखासाठी दुसऱ्यांना राबवून घ्यायची मानसिकता इतकी रुळत आहे की आपण काही चुकीचे करत आहोत किंवा आपले काही चुकत आहे असे कुणाला वाटतच नाही. वरवर पाहता या सगळ््यामध्ये काही गंभीर बाब आहे असे दिसत नाही. आहेत भौतिक साधने उपलब्ध तर का नाही. त्यांचा वापर करावा हा तर्क नेहमी दिला जातो. परंतु इतरांवर मग ती यंत्रे असो की मनुष्यबळ असो, अत्याधिक विसंबून राहिल्यामुळे आपण आपली नैसर्गिक क्षमता हळूहळू गमावत आहोत याचे भान आपल्याला राहिलेले नाही. साधा वीजपुरवठा खंडित झाला की आपली कोण तारांबळ उडते! पंखे, एसी, कुलर बंद झाले की जिवाची घालमेल होते. विजेवर आपण किती मोठ्या प्रमाणात विसंबून आहोत हे आजकाल नेहमीच खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे आपल्याला प्रकर्षाने जाणवते. उद्या संपूर्ण जगातील वीजपुरवठा किंवा विजेचे उत्पादनच थांबले तर मानव समाज पुन्हा पाषाणयुगात जाईल की काय अशी भीती वाटते. आपल्या असंख्य अडचणींचा सरळ संबंध आपल्या वाढलेल्या गरजांशी आणि या गरजा पूर्ण करणाऱ्या भौतिक साधनांशी आहे. या गरजा कमी करून आणि पर्यायाने या गरजा पूर्ण करणाऱ्या साधनांचा वापर मर्यादित करून आपण बऱ्याच अंशी सुखी तर होऊ शकतोच, शिवाय आपल्यातील नैसर्गिक क्षमतांनाही आपण न्याय देऊ शकतो. या क्षमता कायम टिकविणे हेच आज आपल्यापुढील एक आव्हान आहे. एखाद्या विषयावर, प्रश्नावर विचार, चिंतन करून काही मार्ग शोधण्यापेक्षा त्या समस्येवर कुठे
ेडिमेड उत्तर मिळते का हे आधी शोधले जाते. संगणकासारखे अतिशय प्रभावी माध्यम त्यासाठी उपलब्ध आहे. परंतु सगळे काही रेडिमेड मिळविण्याच्या प्रयत्नात आपण आपली विचार करण्याची क्षमताच तर घालवून बसत नाही ना? याचाही विचार व्हायला हवा. साधी घरकाम करणारी बाई आली नाहीतर आपले संपूर्ण वेळापत्रक कोलमडावे इतके आपण परावलंबी झालो आहोत का? कपड्यांना इस्त्री करण्यासाठी लाँड्रीवरच जाणे भाग आहे का? अनेक साध्या साध्या गोष्टी आहेत की ज्यासाठी आपण इतरांवर इतके अवलंबून असतो की, त्यांची मग ती माणसे असो अथवा यंत्रे, मदत मिळाली नाहीतर आपण हतबल होऊन जातो. अनेक गोष्टी आपण सहज आत्मसात करू शकतो. त्या आपण केल्याच पाहिजे. इतरांवर कमीतकमी कसे विसंबून राहता येईल याचाच आपण विचार करायला हवा. आपल्या अत्याधिक परावलंबित्वामुळे आपण केवळ आपलेच नुकसान करीत नसतो तर आपण ज्या संस्थेसाठी काम करतो मग ती सरकारी असो, सार्वजनिक असो अथवा खासगी असो, त्या संस्थेचेही नुकसान करीत असतो. पर्यायाने आपण देशाचेही नुकसान करीत असतो. शे-पन्नास वर्षांपूर्वी वाहतुकीच्या एवढ्या सोयी नव्हत्या. त्या काळी माणसं डोक्यावर ओझे घेऊन कोस-दोन कोस अंतर अगदी सहज चालून जायचे. आज शंभर-दोनशे मीटर अंतरावर जायचे असले तरी आपल्याला वाहन लागते. बुडाखाली वाहन नसेल तर आपण घराबाहेरही पडत नाही. पायी चालण्याची आपली क्षमता आपण हळूहळू गमावत आहोत असे तुम्हांला वाटत नाही का? वाहतुकीच्या साधनात वापरल्या जाणाऱ्या इंधनासाठी आपण दुसऱ्या देशांवर अवलंबून आहोत. हे इंधन आयात करण्यासाठी आपल्याला प्रचंड प्रमाणात विदेशी चलन खर्च करावे लागते. अशा परिस्थितीत एक किलोमीटरपर्यंतच्या अंतरासाठी कुठलेही वाहन न वापरता पायी किंवा सायकलसारख्या साधनाचा वापर करण्याचे सगळ््यांनीच ठरविल्यास त्यातून इतक्या मोठ्या प्रमाणात विदेशी चलनाची बच
होईल की त्या पैशातून कित्येक खेड्यांमध्ये सिंचनाची कायमस्वरूपी सोय करता येईल. कित्येक खेड्यांमध्ये दवाखाने, शाळा उभारता येतील. तसेही डॉक्टरांनी सांगितल्यावर सकाळ-संध्याकाळ दोनचार किलोमीटर पायी फिरणाऱ्यांची संख्या आता लक्षणीयरीत्या वाढत

आहे. डॉक्टरांना असे सांगण्याची पाळी येऊच नये असे

वाटत असेल तर आत्तापासूनच एकदोन किलोमीटर अंतरावर काही कामासाठी जायचे असेल तर शक्यतो पायी जाण्याची किंवा सायकल वापरण्याची सवय आपण आपल्याला लावून घेतली तर स्वत:सोबतच देशाचाही खूप मोठा फायदा होईल. सहज म्हणून पायी फिरणाऱ्यांनी सहज पायी न फिरता जिथे एरवी वाहनाचा उपयोग केल्या गेला असता अशा ठिकाणी पायी किंवा सायकलने जाण्याचा निश्चय केला तर आपल्या प्रकृतीसोबतच देशाचीही प्रकृती सुधारण्यास मदत होईल. सांगायचे तात्पर्य, ज्या भौतिक सुविधा आपल्याला उपलब्ध आहेत त्या आपल्यासाठी आहेत, आपण त्या सुविधांसाठी नाही याचे भान प्रत्येकाने बाळगायला हवे. आपण वस्तूंचे गुलाम होता कामा नये. या न दिसणाऱ्या, न जाणवणाऱ्या गुलामीमुळे आपले खूप नुकसान होत आहे. या वस्तू किंवा सुविधा आपल्या विकासाला पूरक ठरण्याऐवजी त्या आता आपल्या पायातल्या बेड्या ठरू लागल्या आहेत. त्यांच्याशिवाय आपण अपंग होऊ पाहत आहोत. संसाधनांचा वापर करून विकास साधणे वेगळी गोष्ट आहे; परंतु या साधनांच्या अतिआहारी जाऊन आपल्या अंगभूत क्षमतांचा संकोच करून घेणे समर्थनीय ठरू शकत नाही.

— प्रकाश पोहरे

Avatar
About प्रकाश पोहरे 436 Articles
श्री. प्रकाश पोहरे हे विदर्भातील “देशोन्नती” या लोकप्रिय दैनिकाचे मालक तसेच मुख्य संपादक आहेत. त्यांचे “प्रहार” या सदराअंतर्गत संपादकीय लेख फार लोकप्रिय आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..