नवीन लेखन...

स्वास्थवर्धक जलपान

उत्तम आरोग्याची सूत्रे :

स्वास्थ्याच्या दृष्टीने अन्नाप्रमाणेच पाणीसुद्धा केव्हा, किती आणि कसे प्यावे याला फार महत्व आहे, कारण पाणी अन्नपचन, अभिसरण, मल-मूत्रविसर्जन, श्वसन इत्यादी शरीर क्रियांसाठी आवश्यक असते.

पाण्यामुळे शरीराचे तापमान घामाद्वारे नियंत्रित होते, शरीराला टवटवी येते, शौचास साफ होते. लघवी साफ होते म्हणून मुतखडा किंवा इतर मूत्ररोग होत नाहीत.

पाणी कॅलरीविरहित असल्यामुळे लठ्ठ व्यक्तींनी भरपूर पाणी प्यायला हवे. त्यांनी जेवणाच्या अगोदर ग्लासभर पाणी प्यावे त्यामुळे पोट भरल्यासारखे वाटेल आणि जेवणात थोडे अन्नाचे प्रमाण कमी होईल.
पाणी पचायलादेखील शरीराला वेळ लागतो म्हणून फ्रीजमधून काढलेले पाणी ताबडतोब पिऊ नये. असे थंड पाणी पचण्यासाठी ५/६ तास वेळ लागतो. शरीराला त्या पाण्याचे तापमान शरीराच्या तापमानाबरोबर आणायला नाहक ऊर्जा खर्च करावी लागते.

कोमट पाणी दीड ते दोन तासात पचते आणि उकळून थंड केलेले पाणी दोन ते अडीच तासात पचते म्हणून असे पाणी केव्हाही हितावह असते.

सकाळी पाण्याबरोबर चमचाभर लिंबाचा रस आणि दोन चमचे मध घेतल्यास लठ्ठपणा कमी होतो.

दिवदभरातून कमीत कमी तीन ते चार लिटर पाणी प्यावे, उन्हाळ्यात पाच ते सहा लिटर प्यायला हरकत नाही. उषःपान सोडून एकावेळी मात्र केव्हाही ग्लासभरच पाणी प्यावे.

जेवणानंतर पाणी पिऊ नये, त्यामुळे पाचक स्त्राव पातळ होऊन त्याची तीव्रता कमी होते. परिणामतः अन्नाचे पचन चांगले होत नाही. जेवणानंतर एक ते दीड तासांनी ग्लासभर पाणी जरूर प्यावे.

सर्दी झाल्यावर थंड पाण्याऐवजी गरम पाणी थोडे थोडे प्यावे, अॅसिडिटीचा त्रास असेल तर जेवणाच्या अर्धा तास अगोदर कपभर गरम पाणी प्यावे.

टॉप टीप :

एक लिटर स्वच्छ पाणी २०० मि.लि. राहील इतके उकळावे. याला आरोग्यजल असे म्हणतात. हे पचायला खूप हलके व अग्निवर्धक असते. सर्दी, खोकला, ताप, पोटाचे-पचनाचे विकार असणार्यांसाठी हे फार चांगले असते.

जेवणाची वेळ, मात्रा व पद्धती :

आपण काय खावे हे जितके महत्वाचे आहे तितकेच महत्वाचे ते केव्हा खावे, किती खावे आणि कोणत्या पद्धतीने खावे यालाही आहे.

भूक लागली खावे हा नियम असला तरी जेवणाच्या वेळा जर निश्चित करून घेतल्या तर साधारणपणे त्या वेळी भूक लागतेच; मात्र मधल्या काळात काही अकरबकर खाऊ नये.

कितीही व्यस्त असलात तरी ठरावीक वेळीच रोज भोजन करण्याचे लाभ अधिक आहेत. आपल्या सोईनुसार सकाळी १० ते १२ व संध्याकाळी ६ ते ८ या वेळात दिवसातून दोन वेळाच जेवावे. वेळी-अवेळी जेवल्यास पोटाचे विकार होतात. रात्रीचे जेवण शक्यतोवर झोपण्याच्या तीन तास अगोदर घ्यावे.

जेवताना चिंता, कामाबद्दलचे विचार बाजूला ठेवून मन प्रसन्न ठेवावे व जास्त बोलू नये. जेवणासाठी कमीत कमी १५ ते २० मिनिटे वेळ द्यावा, घाईत जेवू नये.
जेवणानंतर तीन ते चार तासापर्यंत काहीही खाऊ नये, पाणी मात्र भरपूर प्यावे. अन्न खूप स्वादिष्ट आहे म्हणून प्रमाणाबाहेर खाऊ नये. भुकेपेक्षा नेहमी दोन घास कमीच खावे. अन्न पोषणासाठी खावे, केवळ
स्वादासाठी नाही.

अन्न खूप चावून खावे म्हणजे अधिक लाळ त्यात मिसळली जाईल, ज्यामुळे अन्न पचन तर चांगले होईलच; पण तृप्तीही प्राप्त होईल व तणावमुक्तीही होईल.

गाजर, मुळा, काकडी, टमाटर, कांदा हे पदार्थ कच्चेच खावेत तसेच मोड आलेले धान्यही कच्चेच खावे. जे कच्चे खाता येईल ते शिजवून खाऊ नये व जे भाजून किंवा शिजवून खाता येईल ते तळून खाऊ नये.
लहान मुलांनी तीन-चार वेळा खायला हरकत नाही; पण इतरांनी फक्त दोन वेळाच जेवावे. साठीनंतर एक वेळ जेवण व एक वेळ फलाहार घ्यावा व अठवड्यातून एक दिवस फक्त लिंबू पाण्यावर उपवास करावा.

सकाळी उठल्याबरोबर भरपेट जेवण किंवा हेवी नाश्ता घेऊ नये. रात्री झोपल्यामुळे भोजन पचनात काही कसर राहून जाते, ती पूर्ण करण्यासाठी पोटाला काही वेळ मिळायला हवा.

अर्धे पोट अन्नासाठी, पाव पाण्यासाठी व राहिलेले पाव हवेसाठी मोकळे ठेवावे तेव्हा चलन-वलन चांगले होते आणि अन्न चांगले पचते. मिक्सर पूर्ण भरल्यावर जसा फिरत नाही, अर्धा खाली ठेवावा लागतो तेच तत्त्व पोटालाही लागू होते.

टॉप टीप :

अन्न हे परब्रह्म स्वरूप व ईश्वराचा प्रसाद समजून प्रसन्नता व आदर भावनेतून ग्रहण केल्यास अधिक तृप्ती व आनंद प्राप्त होतो.

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..