नवीन लेखन...

वेदांतील प्राण्यांची नावे ही आयुर्वेदिक औषधी वनस्पतींची नावे

वेदांतील प्राण्यांची किॅवा अवयवांची नावे ही आयुर्वेदिक औषधी वनस्पतींची नावे आहेत.

वेदांमध्ये(संहिताभागात) पशुहत्या किॅवा मांसभक्षण आहे असा मिथ्या आरोप करणारे तथाकथित विद्वान नेहमी वेदांतील पशुंची किॅवा त्यांच्या अवयवांची नावे पुढे करतात.

वेदांत ऋषभ, गौ, श्वान, हस्ति, अज असा शब्द आढळला की लगेचच त्याचा बैल,गाय, कुत्रा, हत्ती किॅवा बोकड असा बालिश अर्थ काढून त्याची किॅवा त्याच्या अवयवांची हत्या असा सोयीस्कर अर्थ काढून मोकळे होतात हे लोक. पण ही नावे त्या पशुंची किॅवा त्यांच्या अवयवांची नसून तीच नावे असणार्या आयुर्वैदिक औषधी वनस्पतींची आहेत हे खालील यादीत मी सविस्तर दिलं आहे. ही नावे आले की सर्वसामान्य मनुष्य लगेचच तसा अर्थ घेऊन मोकळा होतो. पण वास्तविक आयुर्वेदाचा अभ्यास केला व त्याचे शब्दकोश अभ्यासले, की जे भावप्रकाश निघण्टु वगैरे नावाने प्रसिद्ध आहेत, त्यात ही नावे औषधी वनस्पतींचीच आहेत हे सिद्ध होते. विशेष म्हणजे पशुंच्या नावाची किॅवा अवयवांची सारखीच नावे असणारी आयुर्वैदक वनस्पती आढळतात व तोच वनस्पती अर्थ त्या वैदिक ऋचेचा घ्यायचा हे उघड आहे. ह्याचे कारण सरळ आहे की

“मा हिॅस्यात सर्वभूतानि”

कोणत्याही प्राण्याची हत्या करु नका

ही वेदांचीच आज्ञा ! तत्पूर्वी

वेदांत मांस शब्दाचा अर्थ

मांस शब्दाचा अर्थ आपण जसा आज घेतो तसा तो नसून मांस म्हणजे फळाच्या आतला जो गर असतो त्यालाच मांस हा शब्द आहे. शतपथ ब्राह्मणांमध्ये सुद्धा मांस शब्दाचा अर्थ “परमान्नं तु पायसम्” असा दुध व तांदळाची खीर किॅवा दुधाचे पदार्थ असा सांगितलाय. पण स्वत:च्या सोयीनुसार अर्थ काढणे ही आजकाल एक फॅशन आहे. असो.

जो वेद साक्षात् परमेश्वराची वाणी तो वेदभगवान यज्ञांमध्ये कोणत्याही प्राणीमात्राच्या हत्येची आज्ञा का बरे देईल???
कारण यज्ञाचं वर्णन ऋग्वेदाच्या पहिल्याच सुक्तांत चोथ्याच ऋचेत खालील प्रकारे आलंय.

अग्ने यं यज्ञमध्वरं विश्वत: परिभूरसि ! स इद्देवेषु गच्छति !
ऋग्वेद – १.१.४

“यज्ञं अध्वरं” ह्या शब्दाचा अर्थ निरुक्तकारांनी दिला आहे

अध्वर इति यज्ञानाम – ध्वरतिहिंसा कर्मा तत्प्रतिषेध: – निरुक्त २।७

ध्वर म्हणजे हिॅसा व त्याचा जिथे निषेध तो अध्वर ! म्हणजे यज्ञ हा “अध्वर” म्हणजे अहिंसक असतो. वेदांमध्ये हा “अध्वर” शब्द अनेकवेळा आलेला आहे. शतपथ ब्राह्नणामध्ये तर तिसरे कांड “अध्वर” नावानेच आहे.

वेदांत “आलंभन” शब्दाचा अर्थ

आलंभन ह्या शब्दाचा विकृत अर्थ वध असा काढणारे लोक त्याच्या वास्तविक अर्थाकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष करतात. एक साधं प्रमाण घेऊयात

पारस्कर गृह्यसुत्रांत सांगितलं आहे की
अथास्य (ब्रह्नचारिण:) दक्षिणासं अधिह्रदयं आलभते ! (२.२.१६)

अर्थ – गुरु त्याच्या शिष्याच्या ह्रदयांस हात लावतो.

उपनयनाच्या वेळी “ह्रदयालम्भन” अशी एक क्रिया असते ज्यात गुरु स्वत:च्या शिष्याच्या म्हणजे त्या बटुच्या ह्रदयांस हात लावतो. इथे “आलंभन” चा अर्थ “स्पर्श” असाच अभिप्रेत आहे व वेदांतही तोच अर्थ आहे. पण पाश्चिमात्यांची टुकार व भिकार वेदानुवाद व विशेषत: मेकडाॅनेल व कीथ ह्यांच्या विकृत अशा “वैदिक इण्डेक्स” ह्या द्विखंडात्मक ग्रंथात , जो आम्ही स्वत: पूर्ण मुळ आंग्लभाषेत व हिंदीतही वाचला आहे व ज्यामध्ये “आलंभन” शब्दाचा “वध” असा विकृत अर्थ केला गेल्याने त्यालाच आपले लोक अंधपणाने प्रमाण मानतात. आता ह्यापेक्षा दुर्दैव कोणते??? हा आंग्लभाषेत व हिंदी भाषेतही पीडीएफ स्वरुपात डिजीटल लायब्ररीवर उपलब्ध आहे.

“आलम्भन” हा शब्दांमध्ये “लभ” ह्या संस्कृत धातुचा पाणिनीनुसार अर्थ “प्राप्त करणे” असा आहे. “लभ्” ह्या धातुचा आणखी अर्थ “प्रेरणा” असाही होतो. हाच अर्थ इतर अनेक व्याकरणकारांनीही घेतला असल्याने म्हणूनच आलंभनचा अर्थ “आ” शब्द अधिक आल्याने “अत्यंत प्राप्ती” असा योग्य आहे. संस्कृतच्या अध्ययनासाठी जी वाराणशीतील संस्कृत पाठशाळा सर्वभारतात व जगातही प्रमाण मानली जाते, त्याच पाठशाळेने “धातुपाठ समीक्षा” नावाचा ग्रंथ प्रकाशित केलाय, त्यातही “लभ्” शब्दाचा अर्थ प्राप्ती असाच घेतला असून त्यात हिॅसा किॅवा वध असा कुठेही घेतला नाही.

तरीही उदाहरणार्थ यजुर्वेदांतली एक ऋचा पाहु

ब्रह्मणे ब्राह्नणमालभते, क्षत्राय राजन्यम् !
नृत्याय सूतं, धर्माय सभाचरम् !
यजुर्वेद – ३०.६

ब्रह्मणे ब्राह्मणं आलभते – ज्ञानासाठी ज्ञानीला प्राप्त करतो.
क्षत्राय राजन्यं आलभते – शौर्यासाठी शूरपुरुषांस प्राप्त करतो.
नृत्ताय सूतं आलभते – नाचण्यासाठी सूतांस प्राप्त करतो किॅवा बोलवितो
धर्माय सभाचरं आलभते – धर्माज्ञानासाठी किॅवा धर्मासाठी धर्मसभेस किॅवा सदस्यास प्राप्त करतो.

त्यामुळे “आलंभन” शब्दाचा अर्थ वध किॅवा हत्या असा घेणं विकृतीचा कळस आहे. ह्याप्रमाणेच “गवालंभ” ह्या शब्दाचा अर्थही गाईस प्राप्त करणे असा असून तिची “हत्या” असा कुठेही होत नाही.

आता वर सांगितलेली ही यादी किती मोठी आहे ते आपण पाहु. मी हिॅदी आयुर्वेदिक कोषातली नावे दिली आहेत, ती खालीलप्रमाणे.

खालील आधी वेदांतील पशुंची नावे व नंतर त्याची तेच नाव असलेली आयुर्वैदिक औषधी दिलेली आहे.

पशुनाम – वनस्पती नाम 

१. वृषभ – ऋषभस्कन्द
२. मेष – जीवशाक
३. श्वान – कुत्ताघास, ग्रन्थिपर्ण
४. कुक्कुट – शाल्मलीवृक्ष
५. मार्जार – बिल्लीघास, चित्ता
६. नर – सौगन्धिक तृण
७. मयूर – मयुरशिखा
८. मातुल – घमरा
९. बीछु – बीछुबूटी
१०. मृग – सहदेवी, इन्द्रायण, जटामासी, कपूर(कापूर)
११. सर्प – सर्पिणीबूटी
१२. पशु – अम्बाडा, मोथा
१३. अश्व – अश्वगन्धा, अजमोदा
१४. कुमारी – घीकुमार
१५. हस्ति – हस्तिकन्द
१६. नकुल – नाकुलीबुटी
१७. वपा – झिल्ली अर्थात बक्कल के भीतर का जाला
१८. हंस – हंसपदी
१९. अस्थि – गुठली
२०. मत्स्य – मत्स्याक्षी (मराठीत मत्स्याण्डी) हिचा उल्लेख रामायणात आहे ज्यावरून काही दीडशहाणे रामाला मांसाहारी म्हणतात) ?
२१. मांस – फल का गुदा, जटामासी (थोडक्यांत फळाचा किंवा वनस्पतीतला आतला गर)
२२. मूषक – मूषाकर्णी
२३. चर्म – बक्कल
२४. गो – गौलोमी
२५. स्नायु – रेशा
२६. महाज – बडी अजवायन
२७. नख – नखबूटी
२८. सिॅही – कटेली, वासा
२९. मेद – मेदा
३०. खर – खरपर्णिनी
३१. लोम – जटामासी
३२. काक – काकमाची
३३. ह्रद – दारचीनी
३४. वाराह – वाराहीकन्द
३५. पेशी – जटामासी
३६. महिष – महिषाक्ष, गुग्गुळ
३७. रुधिर – केशर
३८. श्येन – श्येनघंटी(दन्ती)
३९. आलम्भन – स्पर्श

जिज्ञासूंनी आयुर्वैदिक कोष मुंबई, किॅवा भावप्रकाश निघण्टु किॅवा इतर आयुर्वैदिक कोष पहावेत. प्रमाण मिळेल.

हे आहेत वनस्पती ! जर हा अर्थ घेतला नाही तर किती गोंधळ व अनर्थ होतो व झाला आहे, हे वेगळं सांगायची आवश्यकताच नाही.

शेवटी

नोsलुकोsप्यवलोकते दिवा किॅ सूर्यस्य दूषणम् !

तुकाराम चिंचणीकर
#पाखण्ड खण्डिणी
Pakhandkhandinee.blogspot.com

Avatar
About आरोग्यदूत व्हॉटसअॅप ग्रुप 116 Articles
आरोग्यदूत हा वैद्य सुविनय दामले यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्यविषयक बहुमोल माहितीची देवाणघेवाण करणारा एक अतिशय लोकप्रिय व्हॉटसअॅप ग्रुप आहे. या ग्रुपवरील निवडक पोस्ट वाचकांच्या सोयीसाठीप प्रकाशित करत आहोत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..