नवीन लेखन...

मराठमोळी गायिका साधना सरगम

साधना सरगम यांचे खरे नाव साधना घाणेकर. त्यांचा जन्म ७ मार्च १९७४ दाभोळ येथे झाला.बालपणापासून संगीताची आवड असलेल्या साधना यांच्या मातोश्री नीला घाणेकर या शास्त्रीय गायिका होत्या. नीला यांची संगीतकार अनिल मोहिलेंसोबत ओळख होती. तर अनिल संगीतकार जोडी कल्याणजी-आनंदजी यांच्यासाठी म्युझिक अरेंजिंगचे काम बघायचे. त्यांनीच साधना यांची कल्याणजी-आनंदजींसोबत भेट घालून दिली होती. त्यानंतर साधना सरगम यांनी १९७८ मध्ये आलेल्या फिल्म ‘तृष्णा’साठी कोरस गायले होते. त्या गाण्याचे बोल होते ‘पम परम पम बोले जीवन की सरगम’. या गाण्याला किशोर कुमार यांनी स्वरसाज चढवला होता. त्यानंतर साधना यांनी वयाच्या सातव्या व्या वर्षीपासून पंडित जसराज यांच्याकडे संगीताचे धडे गिरवले. १९८२ मध्ये आलेल्या ‘विधाता’ या चित्रपटातील ‘सात सहेलियां खडी खडी’ हे गाणे गाऊन साधना सरगम यांनी बॉलिवूडमध्ये धमाल केली होती. साधना सहा वर्षांच्या असताना त्यांनी दूरदर्शनसाठी ‘सूरज एक चंदा एक तारे अनेक’ हे बोल असलेले गीत गायले होते. हे गाणे त्यावेळी खूप गाजले होते. साऊथ इंडियन गाण्यासाठी नॅशनल अवॉर्ड मिळवणा-या साधना पहिल्या नॉन साऊथ इंडियन सिंगर आहेत. कल्याणजी-आनंदजी जोडीपासून ए. आर. रहेमानपर्यंत प्रत्येकाने त्यांचे कौतुक केले आहे. उदित नारायण यांच्यासोबत ‘जो जीता वही सिकंदर’ या सिनेमातील गाजलेले गाणे ‘पहला नशा पहला खुमार’ गाऊन प्रसिद्धीझोतात आलेल्या साधना सरगम यांनी वयाच्या अवघ्या चौथ्या वर्षापासून गायन सुरु केले होते. वयाच्या चौथ्या वर्षी साधना यांनी सवाई गंधर्व म्युझिक फेस्टिव्हलमध्ये गाणे सादर केले होते. साधना घाणेकरच्या साधना सरगम कशा झाल्या, याविषयी एका मुलाखतीत म्हणतात, ”सरगम हेच माझे जीवन आहे. माझ्या पहिल्याच गाण्यावेळी मी सरगम गायले. ते सर्वांना आवडले अन् माझे नाव साधना सरगम असे उच्चारले जाऊ लागले. माझ्या कामाची ही पावती होती. त्या म्हणतात मी आजवर 34 विविध भाषांत गायले आहे. पण मराठीत संस्मरणीय गाणी गाण्याची संधी माझ्या वाट्याला आलीच नाही. मी मराठी मुलगी असूनही मराठीतील गाणे गायले नाही, हे दु:ख मनात आहेच.

” सातसमंदर पार मैं तेरे पीछे पीछे गई’, ‘हर किसी को नहीं मिलता’, ‘मैं तेरी मोहोब्बत में’, ‘तेरी उम्मीद तेरा इंतजार’ आणि ‘नीले नीले अंबर पर’ अशी अनेक गाणी प्रसिद्ध आहेत.

साधना सरगम यांनी अंदाजे १५०० चित्रपटात २०००च्या वर हिंदीत गाणी गायली आहेत. ५०० हून अधिक तामिळ चित्रपटात १००० च्या वर तामिळ गाण्यांना त्यांनी आवाज दिला आहे. १९९४ ते २०१५ याकाळात साधना सरगम यांनी २५०० हून अधिक बंगाली गीत गायली आहेत. त्यांनी तेलुगु , कन्नड, मल्याळम, गुजराती, नेपाली आणि अनेक प्रादेशिक भाषेत गाणी गायली आहेत. साधना सरगम यांनी ३४ भाषांत गीते गायली आहेत. साधना सरगम यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. मध्यप्रदेश सरकारने त्यांना लता मंगेशकर अवॉर्डने सन्मानित केले आहे. याशिवाय त्यांना १९८८ आणि २००४ मध्ये फिल्मफेअर अवॉर्ड मिळाला आहे. साधना यांना साऊथच्या फिल्मफेअर अवॉर्डसोबतच पाचवेळा महाराष्ट्र स्टेट फिल्म अवॉर्डने गौरवण्यात आले आहे. शिवाय त्यांना ओडिशा स्टेट फिल्म अवॉर्डसुद्धा मिळाला आहे. आपल्या चार दशकाच्या करिअरमध्ये साधना सरगम यांनी आपल्या सुरेल आवाजाने रसिकांच्या मनात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे. साधना सरगम या गाण्यांसोबतच खाण्याच्यादेखील शौकीन आहेत. साधना यांना स्पायसी जेवण पसंत आहे. हॉट अँड सॉर सूप त्यांचे ऑलटाइम फेव्हरेट आहे. याशिवाय पुरणपोळी, आणि श्रीखंड त्यांना आवडतं. त्यांना स्वयंपाकाचीही विशेष आवड आहे.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट

साधना सरगम यांची काही गाणी
हर किसी को नहीं मिलता (जांबाज),
हंसते-हंसते कट जाएं रस्ते (खून भरी मांग),
नजर ने किया है इशारा (त्रिदेव),
हमने घर छोडा है (दिल),
राधा बिना है किशन अकेला (किशन कन्हैया),
जब कोई बात बिगड जाए (जुर्म),
इमली का बूटा (सौदागर),
बोल राधा बोल तूने ये क्या किया (बोल राधा बोल),
तेरी उम्मीद तेरा इंतजार (दीवाना),
कितना प्यार तुम्हें करते हैं (दिल का क्या कसूर),
प्यार के कागज पे (जिगर),
पहला नशा पहला खुमार (जो जीता वही सिकंदर),
सात समुंदर पार मैं तेरे पीछे पीछे (विश्वात्मा),
क्या मौसम आया है (अनाड़ी),
ठहरे हुए पानी में (दलाल),
वो मेरी नींद मेरा चैन मुझे (हम हैं राही प्यार के),
तेरे दर पर सनम (फिर तेरी कहानी याद आई),
सुबह से लेकर शाम तक (मोहरा),
आइए आपका इंतजार था (विजयपथ),
नहीं ये हो नहीं सकता (बरसात),
भंगड़ा पाले आजा आजा (करन-अर्जुन),
तुम हमपे मरते हो (हीरो नंबर वन),
दर्द करारा (दम लगाके हइशा)

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4233 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..