नवीन लेखन...

बाळासाहेबांचं स्मारक झालेच पाहिजे !



स्वातंत्र्यपूर्व काळात लोकमान्य बाळ गंगाधर टिळक तर स्वातंत्र्योत्तर हिंदूह्रिदयसम्राट बाळासाहेब ठाकरे या लोकोत्तर नेत्यांचा अंत्यविधी शासकीय इतमामात सार्वजनिक ठिकाणी करण्यात आला.लोकमान्य टिळकांचा अंत्यविधी गिरगाव चौपाटीवर करून त्याच ठिकाणी त्यांचा पूर्णाकृती पुतळारूपी स्मारकाची उभारणी झालेली आहे. त्यासारखेच बाळासाहेबांचे स्मारक शिवाजीपार्कात व्हावे अशी लोकभावना आहे. टिळकांचे खरे नावं ‘केशव’ असे असले तरीही ते ‘बाळ’ या टोपण नावाने प्रख्यात होते. बाळ गंगाधर टिळक आणि बाळ केशव ठाकरे या दोन नावांत ‘बाळ’; या दोघांचा जन्म दिनांक ‘२३’ व इंग्रजी वर्णाक्षरात ‘BT’ म्हणजेच ‘B for Bal & T for Tilak/Thackeray’ अशी समानता या लोकोत्तर महान नेत्यांमध्ये सुयोगाने पहावयास मिळते.

बाळासाहेबांनी शब्दांच्या फटकाऱ्यांनी मराठी द्वेष्ट्यांना शिस्तीचे धडे शिकवून मराठी माणसाला सन्मान मिळवून दिला. प्रत्येकाला मान देवून सन्मान मिळवला. स्वत: रस्त्यावर उतरून अन्यायाविरुद्ध लढायला शिकवले. बाळासाहेबांचा स्पष्टवक्तेपणा व रोख-ठोक विचार मराठीजणांना भावला. एकदा केलेल्या वक्तव्यांवर ते ठाम राहिले. त्यावर कधीही दिलगिरी व्यक्त केली नाही. त्यामुळे बाळासाहेबांच्या नावाचा इतिहास अनंतकाळ पुज्यनिय असेल व अभिमानाने वाचला जाईल.

शिवाजीपार्कवरील बाळासाहेबांच्या स्मारकास ‘वेकॉम’ संस्थेचा, मैदान प्रेमींचा व स्थानिकांचा विरोध आहे. कुणी म्हणतो महापौर बंगल्याच्या उद्यानातील जागेत तर कुणी म्हणतो मनोहर जोशींच्या मालकीच्या कोहिनूर मिलच्या जागेत बाळासाहेबांचे स्मारक बांधावे. त्यातून मुंबई उच्च न्यायालयाने ‘वेकॉम’ संस्थेच्या जनहित याचिकेत माहे मे, २०१०ला याचिका निकाली लागेपर्यंत हंगामी आदेश देऊन Noise Pollution (Regulation and Control ) Rules, 2000 कायद्या ुसार शिवाजी पार्क मैदानाचा परिसर ‘सायलेन्स झोन’ म्हणून घोषित केला आणि सार्वजनिक कार्यक्रमांना बंधने घातली. शिवाजीपार्क मैदान हे ‘पब्लिक प्ले-ग्राउंड(सार्वजनिक क्रीडा मैदान)’ आहे की ‘रिक्रिएशन ग्राउंड(मनोरंजन, करमणुकीच्या कार्यक्रमांचे मैदान) आहे; याबाबतचा वाद न्यायालयात प्रलंबित आहे. या मैदानवर दुर्गापूजा, कालीपूजा, रावणाचे दहन यासारखे धार्मिक कार्यक्रम तर जाणता राजा, विविध वस्तू विक्री व प्रदर्शनासारखे सांस्कृतिक कार्यक्रम तसेच शिवसेनेचे दसरा मेळावे सुद्धा वर्षानुवर्षे होत असल्याने शिवाजी पार्क मैदान हे रिक्रिएशन ग्राउंड असल्याचे स्पष्ट होते. शिवाजीपार्कचे मूल्यमापन करतांना बाळासाहेबांना विसरता येणार नाही कारण याच मैदानावर प्रचंड मोठ्या जनसमुदायाच्या जाहीरसभा बाळासाहेबांनी गाजवलेल्या असल्याने शिवाजीपार्क मैदान आणि बाळासाहेब यांच्यात गेल्या ४६ वर्षांचे अतूट नातं आहे. शिवाजीपार्काचे क्षेत्र समुद्रासारखे विशाल आहे. त्यामुळे जसे समुद्रातील मटकीभर पाणी काढल्याने समुद्राच्या पाण्याचे क्षेत्र कमी होणार नाही तसेच या मैदानाच्या चतकोर किंवा त्याहून कमी-अधिक भागाचा स्मारकासाठी वापर झाल्याने शिवाजीपार्क खेळण्यासाठी अपुरे पडणार नाही. तेव्हा विरोधकांनी संयम ठेवून, सामंजस्य दाखवून निदान बाळासाहेबांच्या स्मारकासाठी विरोध करू नये.

शिवाजीपार्क मैदानाच्या आरक्षणामुळे बृहन्मुंबई मनपा कायद्याच्या कलम ४३५ नुसार शिवाजीपार्कात स्मारक उभारणीसाठी परवानगी देता येत नाही. आरक्षण पूर्णता अथवा एखाद्या भागापुरते उठवावे लागेल. हायकोर्टाची आरक्षणे उठवण्यास स्थगिती असल्याने न्यायालयाची अनुमती आवश्यक, अश्या प्रकारचे अडथळे असलेत तरीही ‘शिवाजीपार्क मैदान’ हे रिक्रिएशन ग्राउंडच आहे असे महापालिका व सरकारचं म्हणणे आे. न्यायालयाने अद्यापि मैदान आरक्षणाच्या स्वरूपाबाबत शिक्कामोर्तब केलेले नाही. रिक्रिएशन ग्राउंडमध्ये सामाजिक व विधायक कारणाच्या वापराकरिता अनुमती देण्याचा मुख्यमंत्र्यांना स्वैच्छाधिकार आहे. परिणामी मुख्यमंत्री महोदयांनी स्वैच्छाधीकार वापरून शिवाजीपार्क मैदान हे स्मशानभूमी नसतांना त्याठिकाणी अंत्यविधीला अनुमती देऊन बाळासाहेबांना सन्मानित केले. त्याच निकषावर त्या मैदानातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याशेजारी लोकमान्य टिळकांच्या स्माराकासारखेच बाळासाहेबांच्या स्मारक बांधणीला अनुमती द्यावी आणि लक्षावधी शिवसैनिक व विविध जातीधर्मातील अनुयायांच्या बाळासाहेबांप्रती असलेल्या श्रद्धेचा व भावनांचा आदर करावा.
पत्रलेखकांना बाळासाहेबांनी संदेश दिलेला होता की पत्रलेखकांनी ‘असे करावे का?, असे केले तर.. होईल का?” अशा प्रकारचे मुळमुळीत पत्रलेखन करू नये. पत्रलेखकांनी रोख-ठोक विचार मांडावेत. त्याच्या संदेशाचे अनुपालन करून माझ्या या पत्राद्वारे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो….साहेब जय महाराष्ट्र….!

सुभाष रा. आचरेकर, वांद्रे(पूर्व).

— सुभाष रा. आचरेकर

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..