नवीन लेखन...

न्यायव्यवस्था

नमस्कार मित्रांनो,

भारत देशातील न्यायव्यवस्थेबाबत आज जरा बोलावसं वाटतं. मित्रहो आपल्या देशातील न्यायव्यवस्थेबद्दल सर्वांचे आप-आपले मत आहेत आणि तसे स्वातंत्र्य सुद्धा भारतीय घटनेने दिलेले आहेत.

1877803“न्यायव्यवस्था” म्हणाल तर माणसासमोर एकच विचार येतो कि, आपल्याला या न्याय व्यवस्थेमुळे आपले हक्क सुरक्षित राहून, आपल्याला न्याय मिळेल. भारता सारख्या बलाढ्य देशात अनेकदा असं दिसून येतं कि, काही प्रकरणात या न्याय व्यवस्थेमुळे अन्याय केल्या जातो. मी असं म्हणत नाही कि, भारतीय न्यायव्यवस्था योग्य नाही, परंतु हि न्यायव्यवस्था जरा पांगळी झालेली आहे, असं वाटत नाही का? कदाचित मी जे बोललो कि, न्यायव्यवस्था पांगळी झालेली आहे, यावर नक्कीच तुम्हाला माझा राग आला असेल. शक्य आहे, कारण याबाबत मला विरोध किंवा टीका करण्याचा अधिकार नाही. कारण न्यायव्यवस्थेवर बोलण्याचा अधिकार कुणालाच नाही आहे, न्यायव्यवस्थेद्वारे घेतलेला निर्णय सर्वोपरी आहे, असंच आपण ऐकतो.

चला तर मग या न्यायव्यवस्थेचा अपमान न करता मी अभिमानाने या न्यायव्यवस्थेची गौरव गाथा म्हणतो आणि या न्यायव्यवस्थेपासून मला किती आनंद मिळतो ते व्यक्त करतो. आपल्या भारत देशात काही महान व्यक्तिमत्वाचे गरीब हितचिंतक आप-आपल्या सोयीनुसार, भारताच्या पांगळी नसलेल्या (तुमच्यामते) न्यायव्यवस्थेला खांदा देतात आणि आपले हित साध्य करून घेतात.  त्यामुळे सर्व गरीब हितचिंतक आनंद व्यक्त करतात. भारतातील गरीब जनताच काय तर पाकिस्तान मधील गरिबांनाही या न्याय व्यवस्थेमुळे न्याय मिळतो आणि हि आपल्याला गौरव करण्याची बाब आहे. उगाच आपण या गरीब लोकांना गुंड , असामाजिक तत्व , आतंकवादी अश्या अनेक वाईट नावाने उच्चारतो, हे तर त्यांचे महान व्यक्तिमत्व आहे. त्यांना न्याय किंवा दया किंवा सूट मिळायलाच हवी आणि आपली न्यायव्यवस्था या सर्व महान व्यक्तींना त्यांचे योग्य हक्क मिळवून देते. हो कधी-कधी चुकीने एखाद्या वेळी एखाद्या गरिबाला फाशी किंवा शिक्षा देण्यात येते पण काय करणार चूक मानवच करतो, मग त्या न्यायव्यवस्थेमध्ये माणसंच निर्णय घेत असतात आणि माणसं देव नाहीत त्यामुळे चूक होणे साहजिकच आहे. पण असला प्रकार फार कमी दिसून येतो, नाहीतर या न्यायव्यवस्थेद्वारे कुण्याही गरिबावर अन्याय होत नाही आणिश्रीमंत लोकांना, गरीब बेईमान लोकांना बरोबर शिक्षा मिळत असते.

या महत्वाच्या गरीब महानुभाव हितचिंतक लोकांना न्याय मिळवून देण्यात महत्वाचा वाटा असतो तो वकील या पदाचा, वकील म्हणजे कुणाला कसं वाचवायचं आणि कुठल्या खटल्यात कसे न्याय मिळवून द्यायचे हे या वकील वर्गाला योग्यप्रकारे माहित असते कारण त्याचीच शिक्षा त्यांनी घेतलेली असते. सर्वच वकील बेईमान नसतात पण काही असतात जे या गरीब हितचिंतकाच्या हित करण्याचे नकारतो आणि या देशातील श्रीमंत लोकांना मदत करण्याचा प्रयत्न करतात पण बघितलं तर जास्तीत जास्त वकील लोकं इमानदार आहेत आणि ते या देशातील हितचिंतकांचे हित साध्य करतात, कसलेही प्रकरण असुद्या श्रीमंत लोकं या गरीब महान लोकांवर कितीही आरोप लावत असेल किंवा साक्ष देत असेल तरी हे महान वकील सर्व दुखी गरीब लोकांना न्याय मिळवून देण्याचे कार्य करतात आणि ते पैसे अजिबात घेत नाही, कारण फार इमानदार असतात ते असं म्हणायला हरकत नाही. तुम्हाला काय वाटतं ?

या परिस्थितीत श्रीमंत व्यक्ती फक्त विचार करीत नि रडत बसतात कि , मला मिळाला नाही म्हणून. अहो त्या श्रीमंतांना न्याय कसे मिळेल कारण न्याय तर या गरीब हितचिंतकांनाच मिळेल ना कारण त्यांच्याकडे इमानदार वकील असतात जे इतकी मेहनत घेतात , गरीब लोकांचे मदतनीस साक्ष देत असलेल्या साक्षदारांना प्रेमाने  समजावण्यात येते कि साक्ष देऊन श्रीमंत लोकांचं भलं करू नका म्हणून. मग न्याय हा गरिबांनाच मिळेल ना. आता श्रीमंत लोकांना रडत ओरडत बसण्याशिवाय कामच कोणते आहेत? हे गरीब महानुभाव देशहिताचा किती विचार करतात, ते तर माहित आहेच सर्वांना.

एकदा पाकिस्तानमधून काही गरीब लोकं भारतात घुमायला आले असतांना त्यांना भारतातील बेइमान पोलिसांनी गोळीबार करून शहीद केले आणि एकाला अटक केली, एका बॉम्ब हल्याचा आरोप त्यांवर लावण्यात आला. हा कसला न्याय आहे? काय गरज होती या बेईमान पोलिसांना असं काही करण्याची? सोडून द्यायला हवं होतं ना त्यांना. ते महान लोकं होते. असो, पण या देशातील महान हितचिंतकांनी पूर्णपणे त्या पाकिस्तानी व्यक्तीची छानपैकी कोट्यावधी रुपये खर्च करून खातरदारी केली, रोज चिकन , मटन , आणि काय काय खाऊ घातले. काही वर्षांनी अचानक एकदिवस त्या व्यक्तीला फाशी दिल्याची बातमी ऐकली पण काहींना शंका आहे कारण त्या पाकिस्तानी व्यक्तीला डेंगू हा असल्याची बातमी मिडीया मध्ये दाखविण्यात आली होती. काय माहिती कि, त्याला फाशीवर लटकावले कि तो डेंगू या आजारेने मेला? काहीतरी चुकलं कदाचित, नाहीतर त्याच्यावर हा अन्याय झालाच नसता. शेवटपर्यंत या देशातील महान हितचिंतकांनी त्याची आवभगत केली असती, कितीही खर्च होऊ द्या. काही श्रीमंत लोकं उगाच म्हणतात कि, धन्य त्या मच्छराचे ज्याने त्या आतंकवाद्याला डसून मारून टाकले नाहीतर अजून किती रुपये त्याच्यावर या गरीब लोकांनि खर्च केले असते आणि त्याला पोसून ठेवले असते. हे एकच प्रकरण नाही असे अनेक प्रकरण आहे ज्यात फक्त नि फक्त या हितचिंतकांनाच न्याय मिळाला आहे, श्रीमंत आजही रडत बसलेले आहेत. आहे ना गर्व करण्याची बाजू ? म्हणून मी या न्याय व्यवस्थेला मनापासून मानतो आणि पूर्ण सन्माम करतो.

या देशातले श्रीमंत लोकं उगाच ओरडतात कि, न्यायव्यवस्थेत न्याय होत नाही म्हणून अहो या श्रीमंतांनी समजायला नको का? कि, हे सर्व हितचिंतक आहेत आणि देशाच्या हिताचेच कामं करतात म्हणून. न्यायव्यवस्थेत देशाचे हितचिंतक लोकं पोलिस, वकील, जज, राजकारनिक यांचेही हित बघितात. असं नाही कि, कुणाचे लक्ष ठेवत नाही म्हणून. कारण ते महान व्यक्तिमत्व असतात मग न्यायालयाला त्यांचे म्हणणे मानावेच लागतं. देशातील हे काही महान लोकं देशाच्या हिताचेच कामं करीत आहेत.

आता कोणत्याही श्रीमंताने या गरीब महान लोकांना गुंड, आतंकवादी,म्हणू नये कारण काही साक्ष राहत नाही, साक्षदार असले तर आपोआपच काय होतं तर काय माहित , साक्षदार आपली साक्ष बदलवून देतात किंवा आपोआप ते अपघातात किंवा वेगवेगळ्या कारणाने मरून जातात मग श्रीमंत लोकांचे खटले चुकीचे नाही का? हितचिंतकांचे नेहमी हित होते कारण ते महान कामं करतात, याबद्दल श्रीमंतांना बोलण्याचा काहीच अधिकार नाही , हे त्यांनी लक्षात घ्यायला हवं. जो पर्यंत हि न्यायव्यवस्था जिवंत आहे तो पर्यंत कुण्याही गरिबावर अन्याय होणार नाही. कुठला हि हितचिंतक दोषी ठरू शकणार नाही, हे नक्की.

म्हणून मी म्हणतो, आपली न्यायव्यवस्था हि  उच्च व उत्तम दर्ज्याची आहे, मला या न्यायव्यवस्थेविरोधात बोलण्याचा काहिएक अधिकार नाही.

आता मी एकच ठरविलेलं आहे कि,

“जे जे होते ते ते पहावे नि

आपले डोळे बंद करावे. ”
—————————————*************************——————————————
आवडल्यास नावासहित share करू शकता.
धन्यवाद!

शशीकांत शांडीले (SD), नागपूर
भ्रमणध्वनी -९९७५९९५४५०
दि. ०१/०१०/२०१५

 

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..