नवीन लेखन...

दादाजी कोंडदेव हे सामान्य चाकर नव्हते !!!



 संशोधन आणि अभ्यासशुन्य असलेल्या संभाजी ब्रिगेडने सभ्यतेचा निच्चांक गाठत छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुरुवातीच्या जीवनात एक अत्यंत महत्त्वाची असामी असणार्‍या दादाजी कोंडदेवांना एक सामान्य चाकर म्हणुन संबोधले आणि त्यांना दादोजी म्हणण्याऐवजी दादु असे निर्लज्जपणे म्हणतात. शिवाजी महाराजही त्यांना दादाजी म्हणत. पण

संभाजी ब्रिगेड मजाल पहा ! यातून संभाजी ब्रिगेडच्या व्यक्तीमत्वाच्या निच्चांकाची स्पष्टोक्ती होते.

खाली अस्सल पत्रांचे ४ नमूने दिले आहेत. या पत्रांच्या मूळ प्रती भारत इतिहास संशोधक मंडळ, १३२१ सदाशिवपेठ, भरतनाटयमंदीरा शेजारी, पुणे – ४११०३०. दुरध्वनी – (०२०) २४४७२५८१ येथे जतन करून ठेवल्या आहेत. बोरी केंद्रामधील शिवाजी महाराजांच्या पत्राच्या अस्सल प्रती संभाजी ब्रिगेडच्या गुंडांनी जशा जाळून टाकल्या होत्या तसे पुन्हा होऊ नये म्हणुन या पत्रांची मायक्रोफिल्मींग करून ठेवण्यात आली आहे.

अ] (खालील पत्रात दादाजी कोंडदेव हे कोंढाण्याचे सुभेदार होते हे अगदी स्पष्ट होते. त्याच बरोबर एखद्याचे इनाम सरदेशमुखीस दिले आणि पर्यायी त्यास अन्यत्र इनाम देण्याबद्दल उल्लेख आहे. असा इनाम देण्याचा अधिकार तर सरसेनापतीलासुद्धा नव्हता. मग या अधिकारावरून आणि निर्णयावरून दादाजी कोंडदेवांचे स्थान किती मोठे होते हे निर्विवाद स्पष्ट होते. अर्थात, ईर्षाळू संभाजी ब्रिगेडच्या खोटया व बिनबूडाच्या आरोपाप्रमाणे ते सामान्य चाकर नव्हते).

शिवकालीन पत्रसार संग्रह खंड.१.

पान.१०९, पत्र क्र. ५०७

इ.स.१६४५ डिसें.११

शके १५६७ पौष शु.२

सुहूर १०४६

जिल्काद २

खं.१६ ले.२०

अज दि. <दादाजी कोंडदेऊ सुभेदार कोंडाणा
बाबाजी जुंझारराऊ देशमुख तर्फ कानदखोरे

तुझे अंतुरली येथील इनाम सरदेशमुखीस दिल्हे. त्याबद्दल तुला दापोडा येथे इनाम देण्याविषयी लिहीलें आहे.

ब] (खालील पत्रात सुभेदार या उल्लेखासोबत त्यांचा प्रशासकीय निर्णय घेण्याचा अधिकार स्पष्ट होतो).

शिवकालीन पत्रसार संग्रह खंड.१.

पान.१११, पत्र क्र. ५१३

इ.स.१६४६ एप्रिल.२

शके १५६८ चैत्र व.१२

सुहूर १०४६ सफर २५

सा.ले.८२

वाटपत्र

<दादाजी कोंडदेव
आपले भांबोरे वगैरे ७ गाव (कुळकर्ण व ज्योतिष) तुम्हास दिधले.

क] (हे खुर्दखत तर स्वयं छत्रपती शिवाजी महराजांनी पाठवले आहे. दादाजींचा उल्लेख स्वत: शिवाजी महाराज सुभेदार <दादाजी

शिवकालीन पत्रसार संग्रह खंड.१.

पान.११६, पत्र क्र. ५३४

इ.स.१६४७ आक्टो.१५

शके १५६९ आश्विन व.१२

सुहूर १०४८ रम २६

खं.२० ले.२३७

खुर्दखत

मुद्रा व सिक्का ‘प्रतिपच्चंद्र’

अजर.रा.< सिवाजी राजे
दरीविले गणेशभट बिन मल्लारीभट भगत मोरया हुजूर …… ……. जे आपणास इनाम जमीन चावर निमे ú॥ú दरसवाद मौजे मोरगौ त॥ म॥ देखील नख्तयाती व महसूल ब॥ फर्मान हुमायूनु व खुर्दखत वजीरानि कारकिर्दी दर कारकिर्दी व ब॥ खुर्दखत माहाराज साहेबु व सनद सुभा त॥ सालगुदस्ता सन सबा चालिले आहे. साल म॥ कारणे <दादाजी कोंडदेऊ सुभेदार

ड]

शिवकालीन पत्रसार संग्रह खंड.२.

पान.३९४, पत्र क्र. १४००

इ.स.१६७१ जून.२६

शके १५९३ ज्येष्ठ व.३०

सुहूर १०७२ सफर २८

त्रै.व.७ पृ.४६

तान्हाजी जनार्दन हवालदार व कारकून त॥ निरथडी प॥ पुणें प्रति राजश्री शिवाजी राजे….. परिंचाचे पाटीलकीसी कान्होजी खराडे नसता कथला करून घर तेथे बांधतात. तरी कथला करू न देणे. <वैकुंठवासी साहेबाचे

(मर्यादेयं विराजते)

शिवचरित्रसाहित्य यात असलेले काही संदर्भ.

* ७ ऑक्टोबर १६७५ – मावळचा सुभेदार महादाजी सामराजयाने कर्यात तरफेचा हवालदार महादाजी नरसप्रभू यांना पाठविलेले एक पत्र. यात शिवाजी महाराजांनी महादाजी सामराजांस पाठविलेल्या एक पत्राचा सार आहे…” साहेब (शिवाजी महाराज)कोणाला नवे करु देत नाही ,<दादोजी
<कोंडदेवाच्या

* २३ जुलै १६७१ – पुणे परगण्याच्या कर्‍हेपठार तर्फे वणपुरी. – “मागे <दादोजी कोंडदेवे


ऐसे यांचे>
हाली वर्तवणे, जो न वर्ते त्यास ताकीत करणे”

* १ नोव्हेंबर१६७८ –

कान्होरे रुद्र यांस – “मागे <दादोजी कोंडदेवे


हाली वर्तवणे, जो न वर्ते त्यास ताकीत करणे”

* दादोजी कोंडदेवांनी बाळ शिवबाचे पहिले लग्न १६-५-१६४० मध्ये लावले असा उल्लेख शिवदिग्विजकार बखरीत येतो.

— राजेश खिलारी

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..