नवीन लेखन...

ज्येष्ठ स्त्रियांकरिता आहार

वयाची साठी ओलांडली की शरीराच्या क्रिया मंदावतात. शारीरिक क्रिया मंदावल्यामुळे शरीराला आहाराची कमी गरज भासते. अशा वेळी आवश्यतक तेवढाच पण संतुलित आहार घ्यायला हवा- जेणेकरून शरीराचं पोषण तर होईलच, पण शरीराला जडत्व मात्र येणार नाही. कसा असावा हा आहार? त्यांच्या वेळा कशा असाव्यात? ज्येष्ठांकरता असणाऱ्या आहाराचे विविध पैलू. …….

एकदा का रजोनिवृत्तीचा काळ व्यवस्थितपणे पार पडला, की साठीची चाहूल लागते. जीवनाच्या निवृत्तीकडे वाटचाल सुरू होते.

वृद्धत्व ही नैसर्गिक क्रिया आहे. शरीराची वाढ व वयात येणे होईपर्यंत शरीरातील जडणघडणीच्या क्रिया अधिक, तर पुढे विघटनाच्या क्रिया पेशींमध्ये अधिक होतात. म्हणून वृद्धत्व येते. साठीनंतर शरीरातील आवश्यसक पेशींचा ऱ्हास होत असतो. शरीरक्रमांमध्ये बदल घडून येत असतात. वयोपरत्वे ऐकणे, दृष्टी, चव, स्पर्श, वास वगैरे संवेदना कमी होऊ लागतात. शरीरात फिजिऑलॉजिकल पॅथॉलॉजिकल, मानसिक बदल होत असतात. याची कारणेही अनेक आहेत. शारीरिक हालचालींची कमतरता, भूक मंदावणे, आपली कोणाला गरज नाही याची सतत बोचणी असणे, एकटेपणाची भावना सतावणे, वगैरे! शारीरिक हालचाली कमी झाल्यामुळे बेसल मेटॅबोलिक रेट कमी होतो- ज्याकरिता आहाराचे प्रमाण कमी करणे महत्त्वाचे ठरते. तरीही तो संतुलित मात्र हवाच.

आहारात सकाळचा नाश्तार घेणे अत्यंत आवश्याक असते. तो सकाळी ८ ते ९ पर्यंतच घ्यायला हवा. त्यात आपले जुने पारंपरिक पदार्थ हवेत. दुपारचे जेवण एक वाजता. त्यात चौरस आहार- ज्यात वरण, भात, भाजी, पोळी, दही, कोशिंबीर, फळ असावे. संध्याकाळी ५ ते ६ मध्ये हलका कोरडा नाश्ता्- ज्यात चिवडा, लाह्या, सत्तू, गोपाळकाला, रताळी असे पदार्थ चांगले. रात्रीचे जेवण ८ ते ९ दरम्यान व दुपारसारखेच! रात्री दही व फळ खाऊ नये. झोपताना दूध, हळद, अंजीर घ्यावे.

अन्न घटकांची गरज

कॅलरीज – हे नेहमी श्रमांच्या तुलनेत असतात. साठीमध्ये चयापचयाची गती कमी होते. म्हणून पूर्वीपेक्षा निदान ३०० कॅलरीज तरी कमी घ्याव्यात. शीतपेये, ब्रेड, बिस्किटे, साखर, पेस्ट्री वगैरे टाळावे.

प्रोटिन्स – मानसिक ताणतणाव, इन्फेक्श्न, जुने रोग वगैरे असल्यास जरा अधिक, पण सहज पचणारे प्रोटिन्स घ्यावेत. भरपूर दूध, दही, ताक घ्यावे. डाळींमध्ये मुगाची डाळ पचायला सोपी. इतर कडधान्ये मोड आणून घेतल्यास चांगले.

कार्बोहायड्रेट्‌स – शरीरात इन्शुलिनच्या होणाऱ्या कमतरतेमुळे रक्तशर्करा कमी-अधिक होण्याचे प्रमाण वाढते म्हणून व कोलेस्टेरॉल, ट्रायग्लिसराईड्‌स रक्तातील वाढलेले असल्यासही आहारात साखर नसावी. त्याऐवजी संपृक्त कर्बोदके म्हणजे धान्ये, फळे, डाळी, दूध यांचे सेवन असावे. यातूनच चोथाही मिळतो. दातांचा त्रास असल्यामुळे पॉलिश तांदळाचे, ब्रेड-बिस्किटांचे अधिक आणि भाकरीचे कमी सेवन होते. यामुळे “ब’ जीवनसत्त्वे मिळत नाहीत; पण आहारात ज्वारी, बाजरी, गहू, सोजी, हातकुटाईचे तांदूळ, कंदमुळे, फळे हवीत. जिभेवर ठेवल्यावर विरघळणारे पदार्थ टाळावे.

स्निग्ध पदार्थ – रिफाइंड तेल, वनस्पती तूप, लोणी, साय, चीज, मिठाई, तळलेले पदार्थ, पुऱ्या, पराठे कमी होणे अत्यंत आवश्य क असते. दिवसभरात ३ चमचे घाणीचे ताजे तेल आणि दीड चमचा तूप आहारातून मिळावे. वनस्पतींपासून निघणाऱ्या तेलात कोलेस्टेरॉल नसते. ते पशूंच्या स्निग्धात, वनस्पती तुपात असते. कोरोनरी हार्ट डिसीजने येणाऱ्या मृत्यूचे प्रमाण मेनोपॉजनंतर अधिक आहे. म्हणून वनस्पती तूपही टाळावे. मांसाहार घेऊ नये.

चोथा – साठीनंतर शरीराचे श्रम, हालचाली कमी होतात. म्हणून आतड्यांची कार्यक्षमताही कमी होते. आतड्यांतील स्नायूंचे आकुंचन-प्रसरण या क्रिया मंदावतात. अन्न पचणे कठीण होते. बद्धकोष्ठता सरसकट अनेकांमध्ये आढळून येते. याकरता गव्हाचा दलिया, पालेभाज्या, शेंगभाज्या, ज्वारी, बाजरी, फळे, ओवा, मेथीदाणा, नाचणी, हळीव, कारळी, कुळीथ, जवस यासारख्या गोष्टी रोजच्या आहारात असाव्यात.

कॅल्शिअम –. रोज १/२ ते ३/४ लिटर दूध हे दही-ताकाच्या रूपात घ्यायलाच हवे. कॅल्शियमवर प्रोटिन्स जीवनसत्त्व “क’चे शोषणही अवलंबून असते. अन्नाचे पचन सुलभ होते. याशिवाय नाचणी, खसखस, हळीव, सोयाबीन, खजूर, पालेभाज्या रोज खाव्यात. भात शिजवताना त्यात चिमूटभर मऊ असा खायचा चुना घालावा.

लोह – रक्तकण, हिमोग्लोबिन तयार होण्याकरिता या खनिजाची आवश्याकता असते. लोह सर्व पालेभाज्या, खजूर, बाजरी, नाचणी , मनुका, अंजीर, हळीव यात भरपूर असते. भाज्या, सलादवर लिंबू पिळूनच खावे.

जीवनसत्त्वे – अ, ई, क, बीटा कॅरोटिन यांना अँटीऑक्सिाडंट्‌स म्हणतात. ते पेशींचा ऱ्हास होणाऱ्या रोगांपासून आपला बचाव करतात. दूध, दही, तेलबिया, गव्हांकुर, गव्हाच्या रोपांच्या रसातून, लाल भोपळा, गाजर, पपई, रताळं, तीळ, खसखस, खरबूज, टरबूज बियांतून मिळतात. जीवनसत्त्व “ड’ हाडांच्या मजबुतीकरता, नितळ निरोगी त्वचेकरता आवश्यळक. ते दूध, सकाळच्या कोवळ्या सूर्यप्रकाशातून मिळतं. वृद्धांना हिंडणं-फिरणं कठीण होतं. तरी शक्यूतोवर सकाळच्या वेळी बाहेर येणं आवश्याक.

झिंक – वृद्धांमध्ये या खनिजाची कमतरता होते, म्हणूनही रोगप्रतिकार शक्ती कमी होते. म्हणून धान्ये, डाळी वगैरे सालासकट खावे.

बहुतेक ज्येष्ठांना उच्च रक्तदाबाच्या तक्रारी असतात. म्हणून आहारात मिठाचे प्रमाण कमी असणे आवश्यकक असते. हृद्रोकगातही ते कमीच हवे. जोडीला मॅग्नेशियम, पोटॅशियम हे क्षार वाढवायची गरज असते. त्याकरता हिरव्या भाज्या, पुदिना, कोथिंबीर, फळे, सुका मेवा या गोष्टी रोज खाव्यात.

हिरड्यातून रक्त येणे, झालेल्या जखमा चिघळणे, हेही वृद्धांमध्ये आढळते. म्हणून नैसर्गिक स्वरूपात “क’ जीवनसत्त्व घेणे फायदेशीर ठरते. मोतीबिंदू तयार होणे, पिकणे या गोष्टी “क’ जीवनसत्त्वाने लांबविता येतात. म्हणून आवळा, लिंबू, फळे, सलाद भरपूर खावे. तसेच फोलिक ऍसिड, जीवनसत्त्व ब ६ याचीही कमतरता दिसते. रक्तातील होमोसिस्टीनचे वाढलेले प्रमाण, या जीवनसत्त्वांची कमतरता तर हृद्रोागाची नांदी दर्शविते. सहसा हातापायांना मुंग्या येणे, चक्कर येणे वगैरे गोष्टी जीवनसत्त्व ब १२ ची कमी दाखवतात. याकरता रोज भरपूर भाज्या, फळे, ताक व अंकुरित कडधान्ये व यीस्टच्या गोळ्याही घ्याव्यात.

संजीव वेलणकर पुणे
९४२२३०१७३३
संदर्भ:- जयश्री पेंढरकर
आहारतज्ज्ञ

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4222 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..