नवीन लेखन...

जॉर्जला सोडा; नाहीतर खेळ खल्लास





कुठल्या गोष्टीचा वापर लोक कशासाठी करतील याचा नेम नाही. बरोब्बर 35 वर्षांपूर्वी उजेडात आलेली ही घटना –
अ‍ॅशेस मालिकेतील तिसरा सामना. स्थळ हेडिंग्ली, लीड्स. पाचव्या दिवसाअखेर (आणि 4 दिवसांच्या खेळाअखेर कारण त्या काळात रविवार हा विश्रांतीचा आणि प्रभूप्रार्थनेचा दिवस असल्याने रविवारी खेळ होत नसे. निकालाची शक्यता असल्यास सामना एक दिवसाने लांबविण्यातही येत असे.) परिस्थिती : यजमानांना पराजित करण्यासाठी पाहुण्या कांगारूंना 445 धावांचे लक्ष्य. त्यांची सुरवात 3 बाद 220 अशी. म्हणजे शेवटच्या दिवसाचा खेळ दिलखेचक ठरणार असल्याची हमी.
सकाळी सकाळी ग्राऊन्समनने खेळपट्टीवरील आच्छादने काढली आणि तो सर्दच झाला…खेळपट्टी खणून ठेवण्यात आलेली होती जागोजागी. धक्का पण तो पडला ब्रिटिश. खेळपट्टी दुरुस्त करून खेळापुरती योग्य करविण्यास किती वेळ लागेल याचे गणित तो करू लागला. ते शक्य असल्याची जाणीव त्याला झाली पण…काही खड्ड्यांमधून पेट्रोल-डिझेल भरून ठेवलेले होते! खेळ खल्लास. मैदानाच्या भिंतींवर घोषणा होत्या – ‘जॉर्ज डेविस निर्दोष आहे.’
कप्तान टोनी ग्रेग आणि इअन चॅपलने पट्ट्याची ही अवस्था पाहिली आणि ती खेळण्यायोग्य नाही हे ओळखले. बाजूचाच सरावपट्टा वापरण्याचा विचार झाला पण खेळपट्टी साधारण सारख्याच दर्जाची असण्यास त्यामुळे बाधा येणार होती. उपाहाराच्या वेळेपर्यंत पाऊसही सुरू झाला आणि खेळ होण्याच्या सर्व शक्यता मावळल्या. ओवलवरील चौथ्या सामन्यानंतर एक सामना खेळविण्याचाही विचार झाला पण पाहुण्या संघातील अनेक खेळाडू नोकरदार असल्याने हे शक्य झाले नाही.
जॉर्ज डेविस या मिनिकॅब चालकाला 1974मध्ये सशस्त्र दरोड्याच्या गुन्ह्याखाली 20 वर्षांची शिक्षा झाली होती. एका वर्षापासून त्याच्या सुटकेसाठी निदर्शने सुरू होती. अखेर 1976मध्ये त्याची सुटका झाली. 1

978मध्ये एक बॅंक लुटण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी त्याला 15 वर्षांची शिक्षा झाली. कुठलीही खेळपट्टी न खोदताच 1984मध्ये त्याची

सुटका झाली. तीनच वर्षांनंतर पुन्हा एका चोरीचे कर्म वठवून तो ‘निजधामास’ गेला!

19 ऑगस्ट 1975 रोजी

दिलेल्या एका मुलाखतीत जॉनच्या मेव्हण्याने सांगितले – ‘लोकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी आम्ही खेळपट्टी उखडलेली आहे. आपल्याला अ‍ॅशेस केव्हाही परत मिळतील. आम्ही केलंय तरी काय? जमिनीचा एक तुकडा खोदला. तो परमपवित्र आहे काय?’

या घटनेनंतर प्रमुख सामन्यांसाठीची सुरक्षाव्यवस्था आणखी मजबूत करण्यात आली पण अगदी इंग्लंडमध्येच अशासारखी घटना पुन्हा घडलीच.

— डॉ. आनंद बोबडे

Avatar
About डॉ. आनंद बोबडे 232 Articles
सोलापूर येथील डॉ. वैशम्पायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून एमबीबीएस. क्रिकेटमधील विक्रम, मराठी-इंग्रजी शब्दकोडी, साहित्य व साहित्यिकांवरील लेख, महफिल-ए-ग़ज़ल हे सदर सोलापरच्या दैनिक संचार मध्ये गाजले. "जागत्या स्वप्नाचा प्रवास - सचिन तेंडुलकर १९८९ ते २०१०..." हे सचिनच्या कामगिरीचा सर्वांगीण आढावा घेणारे पुस्तक (पूजा प्रकाशन, ठाणे).

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..